नको तेव्हा....

Submitted by आनंद पेंढारकर on 28 June, 2013 - 12:02

वेदनांचे गीत होते नको तेव्हा
नेमके ओठात येते नको तेव्हा

आवराया पाहतो या पसाऱ्याला
कां नवे नाते उगवते नको तेव्हा ?

वेळ काढुन घे रडूनी मनाजोगे
हासणे लादून येते नको तेव्हा

ओंजळीला भान नुरते मिटायाचे
सावरी अलगद उतरते नको तेव्हा

भोवती विळखा गुलाबी मखमलीचा
ऊन डोकावून जाते नको तेव्हा

आनंद पेंढारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय आवडली पाळलीतही छान
रदीफ -अनुसारी असे काहीसे म्हणावेसे वाटले Happy

खयाल छान असतात !! गझलियत जरा कमी जाणवते मला तुमच्या रचनांत ...मन मला हवय तितकं हेलावत नाही माझं पण तुम्ही छानच लिहिता हे नक्की

शेरात कथात्मकाता छान असते ... काव्यमयता जरा कमी करून नाट्यमयता कशी साधता येईल यावर विचार करून पाहू शकाल का .....तशी गरज नाही एक वेगळी शैली आपल्या हाती लागली असेल / आवर्जून हाताळत असाल तर मग तर अजिबातच नाही Happy मी आपलं सहज सुचलय ते बलतोय Happy
चूक भूल द्यावी घ्यावी .........

>>
ओंजळीला भान नुरते मिटायाचे
सावरी अलगद उतरते नको तेव्हा
<<
वा! Happy