'ती' एक बातमी!!

Submitted by निनाव on 27 June, 2013 - 19:11

सांज होता
वाट आंधळी
जनावरांची काया
भयाण करणारी

मात्र ,
जंगल म्हण्जे जनावरेच
नि शहर असायला माणसेच
असा काही नियम नाही

रक्त वाहिले का
कुणी पाहिले का
खोल किती जखमा
चौकशी चा चष्मा

घातले लोखंडी सळे
वय होते खुळे
सगळे मात्र कळे
तरी
निरपराध मी

रोज रोज तेच
रस्ते वेगळे नावे वेगळी
भुकेल्यांची ताटे भरली
उद्वेगांची गर्दी
निराशेत सरली

वेशी वर लखतरे
मोकाट जनावरे
लपलेली 'समोर'
मात्र 'न' दिसणारी

रडणारी ओरडणारी
सोसून छळ
प्राण सोडणारी
निष्पाप… निरागस
लक्ष वेधणारी
निर्लज्जांचे , बाधिरांचे,

पुन्हा एक बातमी
उद्या च्या अंकात
सांडलेल्या स्याहीनं
ओरबाडलेल्या कागदावर
लिहिणारी…

सांज होता
वाट आंधळी
जनावरांची काया
भयाण करणारी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users