“ भारताचा नेपोलियन अर्थात हेमू ”

Submitted by सारन्ग on 26 June, 2013 - 10:54

हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य भारताच्या इस्लामकालीन
कालखंडातील एक हिंदू राजा. ज्याला “भारताचा नेपोलियन” या नावाने देखील
ओळखले जाते. याने तब्बल २२ लढाया जिंकून सुद्धा पानिपतच्या दुसऱ्या
युद्धात दुर्दैवी पराभव पत्करावा लागल्यामुळे हेमुचे सामर्थ्य झाकोळले
गेले. इतिहासामध्ये कष्ट करून आणि स्वतःच्या अंगीभूत कौशल्याने
राजेपदापर्यंत पोहचलेले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक आहेत,
त्यातीलच हेमू एक.
१६ व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये सत्ता गाजवलेला हा एकमेव हिंदू राजा.
१६ व्या शतकामधला भारत हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर होता,
विशेषतः उत्तर भारतामध्ये मुघल आणि अफगाण यांमध्ये सत्तासंघर्ष सुरु
होता.त्यामानाने दक्षिण भाग हा विजयदेवरायाच्या हिंदू राजवटीखाली स्थिर
होता. १५२६ ची पानिपतची पहिली लढाई जिंकून जेव्हा बाबर गादीवर आला तेव्हा
त्याने भारतातील बहुतांशी हिंदू मंदिरे फोडली. त्यामुळे मुघलांना कोणीतरी
लगाम घालणे ही त्या काळाची गरज होती आणि ती जबाबदारी हेमू यशस्वीरित्या
पार पाडत होता.
हेमुचा जन्म १५०१ मधला. एका गरीब पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण
कुटुंबामधला. राजस्थानच्या पूर्वेस असणाऱ्या अल्वर जिल्ह्याच्या मच्चेरी
नामक गावामध्ये हा “भारताचा नेपोलियन” जन्माला आला. हेमुचे वडील राय
पूरनदास, हे पौरोहित्य करून कुटुंबाची गुजराण करत असतं. पण जसे मुघलांचे
वर्चस्व वाढू लागले, पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना मुघलांच्या जाचास
सामोरे जावे लावू लागले. त्यामुळे हेमूच्या वडिलांनी पौरोहित्याच व्यवसाय
बंद करून कुटुंबासह रेवाडीच्या कुतुबपूरमध्ये (सध्याचे हेमुनगर )
राहण्यास गेले. हे ठिकाण पूर्वी मेवातमध्ये येत असे, सध्या हे हरियाणात
येते. रेवाडी हे पूर्वीच्या काळातील इराक, इराणला जोडणाऱ्या दिल्लीच्या
रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण होते. सर्वात प्रथम हेमु शेरशाह सुरीला
खाद्यपदार्थ पुरवत असे. पुढे हेमू आणि हेमुचे वडील शेरशाह सुरीला शोरा (
Potassium Nitrate ) पुरवू लागले. शोरा ( Potassium Nitrate ) याचा उपयोग
दारूगोळा बनवण्यासाठी केला जात असे. या वेळेस हेमुचे वय १५ वर्षे होते.
पुढे हेमूच्या वडिलांचा वयाच्या ८२ व्या वर्षी धर्मांतर करण्यास विरोध
केल्याच्या कारणास्तव शिरच्छेद करण्यात आला. या ठिकाणी राहून तो हिंदी,
संस्कृत या भाषांबरोबरच पर्शियन, अरेबिक भाषांवर त्याने पकड
मिळवली.लहानपनासूनच त्याला व्यायामाची आणि कुस्तीची आवड होती. “इमाम
दस्ता” (हे एक लोखंडाचे मोठे भांडे असते आणि मोठ्या हातोड्याच्या
सहाय्याने यामध्ये मिठाचे चूर्ण केले जाते ) मध्ये मीठ चिरडून त्याने
स्वतःची ताकद आजमवण्यास सुरवात केली. मोठे झाल्यावर हेमुने देखील
व्यवसायात आपल्या वडिलांना मदत करण्यास सुरवात केली. लहानपणापासूनच मित्र
असलेल्या सहदेवच्या गावी हेमू घोडेस्वारीमध्ये निपुण झाला. सहदेव हा
जातीने राजपूत होता आणि हेमुने लढलेल्या प्रत्येक युद्धात याचा सक्रीय
सहभाग होता. (अपवाद पानिपतचे दुसरे युद्ध ). हेमू हा धार्मिक वातावरणात
लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील वृंदावनच्या वल्लभ संप्रदायाचे सदस्य
होते, याच बरोबर त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या होत्या. एकदा
असाच हेमू शोरा घेऊन गेला असता, शेरशाह सुरीच्या नजरेत आला. त्याच्या
व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन शेरशाह सुरीने त्याला स्वतःच्या सैन्यात
उच्च पदावर घेतले आणि येथूनच हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य
याच्या कारकिर्दीला सुरवात झाली.
शोरा विकण्यास सुरवात केल्यानंतर थोड्याच दिवसानंतर हेमुने तोफांसाठी
लागणाऱ्या तांबे आणि पितळाचे पत्रे पाडण्याचा कारखाना सुरु केला. यासाठी
त्याने गोव्याच्या पोर्तुगीजांची मदत घेतली. यासुमारास इ.स. १५४० मध्ये
शेर शाह सुरीने मुघल शासक बाबरचा मुलगा हुमायून याला भारतामधून हद्दपार
करण्यात यश मिळवले होते. इ.स. १५४५ मध्ये शेर शाह सुरीच्या मृत्युनंतर
त्याचा मुलगा इस्लाम शाहने राजधानी दिल्लीवरून ग्वाल्हेरला हलवली.
ग्वाल्हेर हे ठाणे पश्चिमेकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षित
होते. इस्लाम शाह सुरीने हेमुमधील व्यवस्थापकीय कौशल्ये आणि इतर गुण
ओळखून त्याला स्वतःचे वैयक्तिक सल्लागार बनवले. हेमुने इस्लाम शाह सुरीला
फक्त व्यापार आणि उदीम मधेच मदत केली नाही तर त्यावेळेसच्या उत्तर
भारतातील राजकारणामध्ये देखील हेमुचा सक्रीय होता. हेमुमधील हे गुण हेरून
इस्लाम शाह सुरीने हेमुला “ “शंगाही बाजार” अर्थात दिल्लीचा “बाजार
अधिक्षक” या पदावर नेमणूक केली. या पदानंतर थोड्याच दिवसात हेमुला ” या
पदाबरोबरच अंतर्गत सुरक्षेचा मुख्य अधिकारी म्हणून नेमण्यात आले आणि
त्याच्या पडला वजीरपदाबरोबरची मान्यता देण्यात आली. इ.स. १५५३ मध्ये
हेमूच्या आयुष्यात “शिशिर” आला. इ.स. १५५३ मध्ये शेर शाह सुरी मरण पावला
आणि आदिल शाह सुरी गाडीवर आला. आदिल शाह सुरी हा एक अतिशय विलासी,
दारूच्या आहारी गेलेला, स्त्री-लंपट शासक होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध
प्रजेमध्ये आणि सैनिकांत असंतोष वाढत गेला. आणि हे सर्व थांबवण्यासाठी
त्यला हेमुसारख्या कुशल प्रशासकाची आवश्यकता होती. आदिल शाह सुरीने हिंदू
योद्धा हेमू उर्फ हेम चंद्र विक्रमादित्याला साम्राज्याचा पंतप्रधान आणि
भूदल प्रमुख बनवले. आदिल शाह सुरी स्वतः चुनारला गेला, हि जागा त्याला
जास्त सुरक्षित वाटत होती. सेनाद्यक्ष झाल्यानंतर हेमूच्या हाताखाली
अफगानांची फौज आली. अशा प्रकारे राज्याचे सर्व प्रशासन हेमूच्या हाताखाली
आले होते. शासन हातात आल्यावर हेमुने कर न भरणाऱ्या छोट्या-मोठ्या
प्रदेशांना ताळ्यावर आणले. कमकुवत आदिल शाह सुरी विरुद्ध झालेले उत्तर
भारतामधले अनेक छोटे-मोठे उठाव हेमुने या किल्ल्याच्या आश्रयाने चिरडले.
इ.स. १५५३ ते १५५६ मध्ये किल्ला फार मोठ्या प्रमाणात सक्रीय राहिला. याच
सुमारास इब्राहिम खान, सुल्तान मुहम्मद खान, ताज कर्रानी, रख खान नूरानी
यांसारख्या मातब्बरांचा हेमुने पराभव केला आणि एकामागून एक करत साऱ्यांना
यमसदनास धाडले. इ.स. जुलै, १५५५ च्या छप्परघटाच्या युद्धामध्ये हेमुने
बंगालचा सुभेदार मोहम्मद शाहला पाणी पाजले आणि मोहम्मद शाहचा युद्धामध्ये
मृत्यू झाला. अशा प्रकारे बंगालच्या प्रचंड सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी
हेमुने सेनापती शाहबाज खांला नेमले. याच दरम्यान आदिल शाह सुरीचे मानसिक
संतुलन ढळले आणि हेमू व्यावहारिक दृष्ट्या राजा मानला जाऊ लागला. हेमुला
हिंदू तसेच अफगाणी सेनापतींचे मोठ्या प्रमाणवर समर्थन होते. जेव्हा हेमू
जुलै, १५५५ च्या छप्परघटाच्या युद्धामध्ये व्यस्त होता, त्याच सुमारास
हुमायूनने या संधीचा फायदा घेत पंजाब, दिल्ली आणि आग्र्यावर परत कब्जा
केला.
यानंतर साधारण ६ महिन्याच्या आसपास हुमायूनचा मृत्यू झाला आणि त्याचा १३
वर्षाचा मुलगा अकबर नाममात्र बादशहा झाला आणि बैरम खान राज्यकारभार
सांभाळू लागला. युद्धास अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली बघताच दिल्लीवर
स्वतःचा एकछत्री अंमल कायम करण्यासाठी आणि मुघलांना कायमचे हुसकावून
लावण्यासाठी, भला मोठ्या सेनेचा विशाल सागर घेऊन बंगालवरून, सध्याच्या
झारखंड, पूर्वेचा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या मार्गाने हेमुने दिल्लीकडे
कुच केली. हेमूच्या युद्धनीतीमुळे आणि रणांगणातील कौशल्यामुळे मुघल
सैनिकांमध्ये गोंधळ माजला. आग्र्याचा त्यावेळेचा सुभेदार इस्कंदर खान
उझबेक न लढताच आग्रा सोडून पळाला. हेमुने इटावा, काल्पी, बयाना सारख्या
सुभ्यांवर मोठ्या कौशल्याने आणि सफाईदारपणे विजय मिळवत, सध्याच्या उत्तर
प्रदेशच्या मध्य आणि पूर्व भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. ६
ऑक्टोबर १९५६ मध्ये दिल्लीजवळ तुघलकाबादजवळ झालेल्या एका दिवसाच्या
लढाईमध्ये हेमुने अकबरच्या फौजेला पाणी पाजले आणि दिल्लीपरत हस्तगत केली.
हेमुने सलग २२ लढाया लढल्या आणि जिंकल्या.
हिंदू राज्य :
हेमुने शतकानुशतके परकीय राजवटीत, परकीय शासकांच्या गुलामीमध्ये
जखडलेल्या भारताला मुक्त करून दक्षिण भारतामधील विजयनगर साम्राज्याच्या
बरोबरीने भारतामध्ये “हिंदू राज्य ”, “विक्रमादित्य ” या नावाने सुरु
केले. ७ ऑक्टोबर १५५६ मध्ये दिल्लीमधील जुन्या किल्ल्यामध्ये हेमुचा
राज्याभिषेक झाला आणि हेमू “सम्राट हेम चंद्र विक्रमादित्य ” या नावाने
ओळखला जाऊ लागला. राज्याभिषेक राजपूत आणि अफगान सेनानायकांच्या उपस्थितीत
आणि धार्मिक पद्धतीने पार पडला. या घटनेच्या निमित्ताने त्याने स्वतःची
छबी असलेली नाणी वापरात आणली. राजधानी परत एकदा दिल्लीला हलवण्यात आली
आणि सर्व राज्यकारभार जुन्या किल्ल्यामधून बघितला जाऊ लागला.
हेमुने परत एकदा मोठ्या फौजांची जमवाजमव केली. कोणत्याही अफगाण
सेनानायाकाला त्याच्या पदावरून न हटवता सैन्यामध्ये हिंदू अधिकाऱ्यांची
नेमणूक केली. केवळ कौशल्य, साहस आणि पराक्रमाच्या जोरावर हेमू, “सम्राट
हेम चंद्र विक्रमादित्य ” या नावाने देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ होता.
इतिहासकार अब्दुल फजलच्या मतानुसार हेमू दिल्लीनंतर काबूलवर आक्रमण
करण्याची योजना आखत होता.

हेमुची ऐतिहासिक हवेली :
एक साधा व्यापारी नंतर सेनेचा प्रधानमंत्री आणि शेवटी थेट सेनानायक
पर्यंत पोहचलेल्या हेमूच्या ऐतिहासिक कारकीर्दीच्या अनेक गोड-कडू आठवणी
या हवेलीबरोबर जुळलेल्या आहेत. महाभारतकालीन रेवाडीच्या कुतुबपुरमध्ये
असलेली दोन मजली हवेली आजही प्राचीन कलात्मक कारागीरीची साक्ष देते.
कलात्मक प्रवेशद्वार तसेच दुर्मिळ दगडांवर केलेली कलाकुसर आजही आपल्याला
प्रभावित करते. चारही बाजूंना असलेले नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते.
सज्जे आणि खोल्या बघून कधीकाळी असणाऱ्या या हवेलीच्या भव्यतेची आपणास सहज
प्रचीती येते. तळमजल्यावर छोटे-मोठे मिळून १२ कक्ष आहेत तर चार मोठी
सभागृहे आहेत. एक कक्ष खास स्वयंपाकासाठी राखीव असल्याचे आढळून येते.
येथे ३ तळघरे असून सध्या ती बंद अवस्थेत आहेत. विशेष गोष्ट अशी की या
ठिकाणी कोठेही खिडक्या नजरेस येत नाहीत. जेव्हाकी याच्या मागे-पुढे
त्याकाळी अंगण, बाग-बगीचे देखील होते. कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने
असे बांधकाम करण्यात आले असावे. या ३० फुट हवेलीचा पहिला मजला ९०० ते
१००० वर्ष जुना असल्याचा सांगितले जाते. या हवेलीचा दुसरा मजला एका
विशिष्ट प्रकारच्या विटांनी बनवला गेला आहे. या विटांना “लखौरी विटा”
म्हणतात. पाच इंच लांब, साडे तीन इंच रुंद आणि दिड इंच जाड असलेल्या या
विटांच्या बांधकामामध्ये पोर्तुगाली शैलीचे दर्शन होते. १५४० मध्ये या
हवेलीचा जीर्णोद्धार करण्यात आला. तळामध्ये असलेले २ सभागृहे आजही शाबूत
आहेत. त्यामधील एकाचे छत पडले आहे.
अर्थात सरकार या हवेलीच्या डागडुजीबाबत देखील उदासीनच आहे.
“ तो आला, त्याने बघितलं आणि त्याने जिंकलं” हे हेमूच्या बाबतीत तंतोतंत
खरे होते म्हणण्यापेक्षा त्याने ते खरं करून दाखवले हे जास्त योग्य होईल.
हेमू, सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य आणि हेमचंद्र भार्गव अशा विविध
नावांनी हेमू ओळखला जातो. पण सर्वात जास्त लोकप्रिय हेमुचं.
एक साधा शोरा विक्रेता म्हणून जीवन जगणारा हेमू, आदिल शाह सूरीचा
सेनापती, नंतर प्रधानमंत्री आणि शेवटी विक्रमादित्य बनतो तेव्हा खरचं या
अलौकिक राजाला आणि त्याच्या अलौकिक कर्तृत्वाला सलाम केल्याशिवाय राहत
नाही.
राज्याभिषेकानंतर लगोलग झालेल्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात हेमुला केवळ
आणि केवळ दुर्दैवाने पराभवाचा सामना करावा लागला. हेमुने त्याच्या
संपूर्ण आयुष्यात अनुभवलेला पहिला आणि शेवटचा पराभव. हेमुचं सैन्य आणि
हजारो हिंदूंची कत्तल अकबराकडून करण्यात आली.
ज्या प्रमाणे नेपोलियनने त्याच्या सैनिकांना त्यांच्या उज्ज्वल
भवितव्याची हमी दिली होती, त्याचप्रमाणे हेमुने देखील अनेक सैनिकांना
जमिनी आणि जडजवाहीर बक्षीस म्हणून दिले होते आणि त्यांना त्यांच्या
उज्ज्वल भवितव्याची हमी दिली होती.

हेमूच्या आयुष्यातील अखेरचे युद्ध - पानिपतचे दुसरे युद्ध :
पानिपतचे दुसरे युद्ध हे ५ नोव्हेंबर १५५६, रोजी सम्राट हेम चंद्र
विक्रमादित्त्य उर्फ हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाले. खरे पाहता, हे
युद्ध हेमू आणि अकबराचे सेनापती बैरम खान यांमध्ये झाले म्हणणे उचित
ठरेल. युद्धावेळी अकबराचे वय अवघे १४ वर्षे होते.
हेमूने दिल्ली जिंकल्याच कळताच बैरम खान दिल्ली परत मिळवण्याच्या हेतूने
दिल्लीवर चालून येण्यास निघाला. हेमुला याची कुणकुण अगोदरच लागली
असल्याने हेमुने आपल्या सैन्यासह पानिपतच्या दिशेने कुच केली होती.
आणि ५ नोव्हेंबर १५५६ रोजी या दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या. जेष्ठ
इतिहासकार कीन यांच्या मतानुसार, भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव अकबर आणि
त्याचा रक्षणकर्ता बैरम खान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता.
प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. अकबर बरोबर ५०००
अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून
येताच काबुलकडे पळून जावे असा बैरम खानचा सैन्याला आदेश होता.
हेमू स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होता, हेमूच्या सैन्यात सुरवातीला १५००
हत्ती आणि तोफखाना होता. हेमू ने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ३०,००० च्या
घोडदळाला घेऊन कुच केली होती. या घोडदळामध्ये राजपूत आणि अफगाणांचा भरणा
होता. सैन्याचा आणि अफगाणांचा उत्साह वाढवण्यासाठी हेमूने त्यांना
जहागिरी म्हणून जमिनी दिल्या होत्या आणि त्याच्या खजिन्याची द्वारे उघडली
होती. अशा प्रकारे त्याने अतिशय कर्तबगार असे सैन्य एकत्र केले होते.
अकबराचे सैन्य :
नाममात्र प्रमुख : अकबर
प्रत्यक्ष प्रमुख : बैरम खान,याचा मुलगा, अब्दुल रहीम खान हा अकबराच्या
दरबारातील “नऊ” रत्नांपैकी एक होता.
तिरंदाज असलेले घोडदळ प्रमुख : मोहम्मद कासिम
मुघलांच्या केंद्रस्थानी असलेल्या पायदळ, घोडदळ यांच्यामध्ये
उस्ताद अली कुली खान ( तोफखान्याचा प्रमुख ) हा पानिपतचे १ ले युद्ध लढला
होता. अकबराच्या आजोबांबरोबर
हुसेन कुली खान, मोहम्मद साजिद खान पूर्वांची, शाह कुली खान महरूम, मीर
मोहम्मद बरका, कासिम खान नियास्पोरी व सईद मोहम्मद बरका असे महारथी होते.
सर्वात पुढे असलेल्या सैन्यामध्ये मेहमूद खान बुडूस्की, कक्साल खान,
हुसेन कुली बेग, शाह कुली बेग महराम आणि समाजी खान होता.
मुघलांची उजवी फळी सिकंदर खान उझबेग सांभाळत होता तर डावी फळी अब्दुल्ला
खान सांभाळत होता.
हेमुचे सैन्य :
प्रमुख अर्थात हेमू त्याच्या “ “हवाई” ” नावाच्या हत्तीवर
तोफखाना प्रमुख: मुबारक खान आणि बहादूर खान
हत्तीदल :
हसन खान फौजदार
मैकल खान
इखतीयार खान
संगरम खान आणि कपन
उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. केंद्रस्थानी
जातीने हेमू आणि भगवान दास होते.
आता सैन्याची रचना पाहू,
जस आपण बघितलं, तशी ही दोन्ही सैन्ये डावी, उजवी आणि मधली आघाडी अशी
विभागली गेली. अकबरातर्फे हुसेन कुली बेग, शाह कुली खान महरूम सर्वात
पुढची फळी सांभाळत होते, तर शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली
कुली खान हे मधली फळी सांभाळत होते. कोणत्याही युद्धात (अगदी
क्रिकेटमध्ये पण ) मधली फळी ही अतिशय महत्वाची मानली जाते. मधल्या फळीच
हे काम असतं की जसे प्रमुखाला शत्रुपक्षाची बाजू कमकुवत झाल्याचे
निदर्शनास येते मधली फळी पुढच्या फळीला बाजूला करत वाऱ्याच्या वेगाने
शत्रुपक्षात घुसते आणि शत्रुपक्षाची मधली फळी एकमेकांपासून विभक्त करते.
दुसरं काम अस की जर पुढची फळी पडली तर मधली फळी येणाऱ्या शत्रुपक्षाला
स्वतःच्या अंगावर घेते.
शाह बदाग खान आणि शाह अब्दुल माली हे राखीव तुकडी सांभाळत होते.
हेमुतर्फे हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत होते तर उजवी बाजू
शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. हेमुने या लढाईच्या
अगोदर २२ युद्धे जिंकली होती, त्याच्या आघाडीच्या फळीत सुमारे १००० हत्ती
होते. हेमुचे सैन्य अनुभवी होते तसेच हत्तींनी आणि शस्त्रांनी सुसज्ज
होते. हत्तीच्या सुळ्याना जांबिये लावले गेले होते.
हेमुचं सैन्य मुघालांपेक्षा काकणभर सरसच होते. पण मुघलांच सैन्य धोकादायक
बनलं होत ते त्यांच्या घोडदळामध्ये असणाऱ्या तिरंदाजांमुळे. घोडदळ
तिरंदाज हे अतिशय धोकादायक मानले जातात, ते शत्रुपक्षावर एका ठराविक
अंतरावरून बाणांचा वर्षाव करत राहतात. यामुळे शत्रुपक्ष गोंधळतो आणि या
दलाच्या मागे लागतो आणि त्यांना तेच हवे असते. अशा प्रकारे शत्रुपक्ष
विखरला की त्यांना हरवणे सोपे जाते.
आता प्रत्यक्ष काय घडले पाहू :
यात अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही सैन्याच्या मधोमध एक
खंदक होता जो हत्ती ओलांडून जाऊ शकत नव्हते.
सर्वात प्रथम हेमुने हत्तींच्या सहाय्याने हल्ला चढवला तो मुघलांच्या
डाव्या आणि उजव्या फळीवर जी अब्दुल्ला आणि सिकंदर खान सांभाळत होते.
मुघलांच्या पायदळाला हत्ती आवरेनासे झालेले बघताच मोहम्मद कासिम त्याचं
तिरंदाज असलेले घोडदळ घेऊन अब्दुल्ला खानच्या मदतीला जातो. तिरंदाज बाण
मारून हत्तींना जायबंदी करायचा प्रयत्न करत असतानाच वाऱ्याच्या वेगाने
उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत, मुघलांच्या डाव्या
आणि उजव्या फळीवर तुटून पडतात.
अजून हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत आहेत. आत्ता फक्त हत्तीदलचं
पुढे आहे.
या दरम्यान वेगवेगळी झालेली हत्तीदलं युद्धाच्या केंद्रस्थानी सरकू
लागतात. हे बघताच मुघलांची मधली फळी खंदकाकडे सरकू लागते. हिचं संधी आहे
हे बघून हेमू वेगाने आक्रमण करतो. आता दोन्ही दले खंदकापुढे येऊन
थांबतात. हेमूच्या सैनिकांनी जरी खंदक पार केला तरी आता त्यांना हत्ती
साथ देऊ शकणार नाहीत. हे कळताच मुघलांची मधली फळी खंदकाच्या विरुद्ध
बाजूला चिटकून राहते तर हेमुचे हत्तीदल परत एकदा वेगवेगळे होऊन डाव्या
आणि उजव्या बाजूला सरकू लागतात. भगवान दास आणि हिंदू-अफगाणी सैन्य
हेमुच्या मागे येऊन उभे आहे.
इकडे अब्दुल्ला खान (मुघल डावी फळी ) शादी खान कक्करला (हेमू उजवी फळी )
मागच्या बाजूने केंद्रस्थानी ढकलतोय तर दुसऱ्या बाजूला रामयाला (हेमू
डावी फळी ) सिकंदर खान उझबेगने (मुघल उजवी फळी ) केंद्रस्थानी ढकललंय.
याचवेळेस मुघलांची शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान
असलेली मधली फळी विभागून वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडते आणि खंदकाच्या
दोन्ही टोकांना असलेल्या हत्तीदलाला जाऊन भिडते. आता हेमुचं सैन्य सर्व
बाजूंनी घेरलं गेलं आहे.
आणि जे घडू नये ते घडते, भगवान दास आणि हेमुचे भरवशाचे वीर शादी खान
कक्कर, रामया पडतात.
हेमू अजूनही सैन्याला हत्तीच्या अंबारीत बसून लढाईला प्रवृत्त करतोय.
त्याचं वेळेस एक बाण हेमूच्या डोळ्यात जातो आणि हेमू बेशुद्ध होऊन
अंबारीत कोसळतो. शाह कुली खान जो हेमूच्या हत्तीच्या जवळचं असतो त्याच्या
काहीतरी अतर्क्य घडल्याचं लक्षात येतं. सैन्याच्या सहाय्याने तो
हत्तीच्या माहुताला पकडतो आणि हत्तीवर असलेल्याच नाव विचारतो. माहूत नाव
सांगतो, हेमू पडल्याचं कळताच हेमुचे सैन्य विखरते. हेमुला बेशुद्ध
अवस्थेत मुघलांच्या छावणी मध्ये घेऊन जाण्यात येते. अकबर हेमुला मारायचे
नाकारतो पण बैरम खान हेमुचं शीर कापून काबूलला तर धड दिल्लीला रवाना
करतो.
अबुल फझल (अकबरनामाचा लेखक ) म्हणतो, जर अकबराने हेमुला जीवनदान देऊन
स्वतःच्या सैन्यात घेतले असते तर अकबरची दृष्टी आणि हेमुचं सामर्थ्य
वापरून काय जिंकता आलं नसत ?
हेमूच्या पळणाऱ्या सैन्याला इस्कंदर खानने पाठलाग करून पकडले. त्याच्या
हातात सुमारे १००० हत्ती आणि अनेक सैनिक लागले. युद्धानंतर हेमुची बायको
दिल्लीमधील हाताला येतील तेवढे जडजवाहीर घेऊन निसटली,तिचा इस्कंदर खानाने
पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
( काही ठिकाणी हेमू युद्धभूमीवरच मरण पावल्याचा उल्लेख आहे.)
दुर्लक्षिलेला हेमू :
हरियाणाचा हा इतका महान योद्धा, भारताच्याच नाही तर हरियाणाच्या
इतिहासाच्या पानांमधून देखील गायब आहे. इतिहासाने ज्याच्यासाठी कितीतरी
पाने राखली, त्याच्यासाठी हरियाणा सरकार, त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये
साधं १ पानं राखू शकलं नाही, या सारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. हरियाणा
सरकारने हेमूसाठी ना कुठलं स्मारक उभारलं आहे, ना त्याचा राज्याभिषेक
दिवस साजरा केला जातो ना तो शहीद झालेला दिवस कोणाच्या लक्षात असतो.
इतका महान योद्धा हा भारताच्या इतिहासात तसा दुर्लक्षिलेलाच राहिला.
त्याच्या कुटुंबाचे पुढे काय झाले? हे फारसे कोणास माहित नाही. हेमुचे
संपूर्ण आयुष्य लढण्यात आणि स्वराज्य उभारण्यातच खर्ची पडले. हेमुला
आयुष्यात सुखाचे असे फारच थोडे क्षण मिळाले. राज्याभिषेक झाल्यानंतर १
महिन्याच्या आतमध्येच मृत्यूने हेमुला गाठलं. न त्याच्याकडे परंपरेनुसार
चालत आलेली राजगादी होती न संपत्ती. पण हे सर्व नसतानाही मुघलांना पळता
भुई थोडी करून सोडणाऱ्या आणि अल्पकाळ का होईना हिंदू राज्य प्रस्थपित
करणाऱ्या या दुर्लक्षित पण तितक्याच पराक्रमी “विक्रमादित्याला” मानाचा
मुजरा.

- सारंग

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद Happy
मी लहानपणी आईकडून हेमुबद्दलची व त्या युद्धाबद्दलची थोडीफार माहिती ऐकली होती, पण नन्तर त्याचा उल्लेख कुठेच दिसला नाही. इतकेच काय, पानिपतच्या तिनही युद्धांबद्दल शेवटचे मराठा युद्ध सोडले तर फारशी माहिती नाही. म्हणूनच, हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

सारंग,
लेख मस्तच आहे. तुझी लिखाणाची शैली आवडते.

एक विनंती आहे. तुझी आधीची "पुणे ते पानिपत" लेख मालिका पुर्ण करशील का? खुप उत्सुकता आहे, पुढील भागांची.

राजाकडे घोडी किती होती? हत्तीच्या सोंडेचा व्यास किती होता? राजाला बायका किती होत्या? त्याची तलवार किती फूट होती? तो किती लढाया जिंकला? ..... असल्या तपशीलावरनं राजा बरा कि वाइट कसं ठरवणार?

राजाने रस्ते किती बंधले? दवाखाने, शाळा किती उघडल्या? शेतकर्‍याला ट्याक्स किती होता? घातक प्रथेविरुद्ध कायदे वगैरे केले का? न्यानव्यवस्था कशी होती? हे असली माहिती कुणी लिहितच नाही.

>>>> हे असली माहिती कुणी लिहितच नाही. <<< नै लिहीत कस? लिहीतात की
आधी सोनियाजी, मग युवराज राहुलजी, मग पृथ्वीराजजी..... पुढचा नम्बर कोणाचा? Proud
तुम्ही मायबोलि डोळ्यात तेल घालुन वाचित नै वाट्ट! Wink

हां ... तेच तर मी म्हणतोय.... नव्या शिलेदारांबाबत जसे लिहितात, तसे जुन्या राजांबाबतही लिहावे.

जोधा-अकबर आठवला, अन वाईट वाटलं. उगाच हेमुला मारलं.... जबरदस्त व्यक्तीमत्व. पण थोडसं संकलन केलत तर अधिक उत्तम होईल. पुलेशु

मिराताई, "म्हणतोय" नाही, म्हणतेय असे असायला हवे ना?
<<
<<
Proud
मागे "शेळी" असा आयडी घेतलेल्या एका सदस्याचापण असाच घोळ व्हायचा.

मि. रा. पाटील का? तसे असेल तर बरोबर आहे...

जाउ द्या नावात काय आहे... आयडी मिळत नाही हो कधीकधी गमभन... (राव का ताई ते तुमचं तुम्हीच लावुन घ्या Happy

Light 1 घ्या

इतिहासाच्या पुस्तकात फक्त घाट बांधणे, धर्मशाळा (अहिल्याबाई होळकर), प्रशस्त रस्ते व सांडपाण्याची व्यवस्था (विजयनगरचे साम्राज्य), गुन्हेगारांना कठोर शासन (छ. शिवाजी महाराज)... इतकच आठवते...

तेव्हडही सध्याच्या राजेघराण्याला जमत नाही, आता बोला.

लेख माहितीपूर्ण आहे. पण घटना मागे पुढे लिहिल्याने आणि मधेच वर्तमानकाळ्/भुतकाळ असे झाल्याने विस्कळीत वाटतो.

मस्त लेख आहे… खूप उत्तम माहिती मिळाली … कॉपी पेस्ट आहे का नाही याला महत्व नहि… पण अशी डीटेल माहिती मिळाली … आभारी आहे….

मस्त लेख,

ईतिहासाच्या पानावर नाव निशाण नसलेल्या एका कर्तुत्ववान राजाबद्दल माहिती दिल्यावद्द्ल धन्यवाद !!

बाकी इथे लोकांना कॉपी पेस्ट केल्याबद्दल फारच चिंता आहे. अश्या लोकांना हेमू राजाबद्दल दमडीची तरी
माहिती होती ? नव्हती हे ते मान्य करणार नाहीतच, असो.

मिराबाई तुमचा हल्ली फारच घोळ होतोय !! बाकी पान खाणार्या बाईच नाव मीरा ? आणि मीरा साहेब
यांच आडनाव पाटिल ?

शब्बास !! लगे रहो !!

रच्च्याकने , हिरा, तुम देख रहे हो क्या ? तुम ने जी से हिरो करार दिया था असल मे वो तो एक व्हीलनही निकला !

सारन्ग, चांगला लेख आहे. मूळ स्रोताचा उल्लेख केला असता तर बरे झाले असते. असो. तर मग हेमूला नेपोलियन का म्हणावे? बहुतेक त्याच्या युद्धकौशल्यामुळे असावे.
आ.न.,
-गा.पै.

मिरा पाटिल | 27 June, 2013 - 14:09
हां ... तेच तर मी म्हणतोय.... नव्या शिलेदारांबाबत जसे लिहितात, तसे जुन्या राजांबाबतही लिहावे.

Rofl

सारन्ग ! लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद ! सदर लेखामुळे माझ्या ज्ञानात नक्‍कीच भर पडलेली आहे.

लेख क्लिअरकट कॉपी पेस्टेड आहे. हे असले फॉर्मॅटिंग करणे कठीण आहे. मिसळपावरील सारथी हा तुमचाच आयडी आहे का?>>>
असेलही ! सदर लेख बहुदा www.misalpav.com/diwali2012/bharatcha_nepoliyan हा असावा. पण सध्या तो दिसत नाही. सध्या मिसळपाव ही साईट वारंवार ऑफ लाईन असते. माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीवरील कित्येक लेख मिसळपाव व मी-मराठी या साईटवर असतात. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. आपण मायबोलीकर समोर जे वाढून ठेवलेले आहे ते उष्टे आहे की नाही याची फारशी चिकित्सा न करता त्याच्या चर्वणाचा आनंद घेत असतो. उष्टे वाढले जाऊ नये याची दक्षता मायबोली-एडमिन घेत असते.
रच्च्याकने सदर लेखात आपल्याला खरचं विंटरेस्ट आहे; पण तो लेख जर क्लिअरकट कॉपी पेस्टेड आहे अशा वेळी पूर्वीच्या त्या वरीजनल लेखावर जर आपण आपली बहुमोल मते व्यक्‍त केलेली असतीलच. तेव्हा ती येथे कॉपी पेस्ट केली तरी ती आम्हाला चालतील.
(ता.क. ‘रच्च्याकने’ याचा अर्थ ‘बाय द वे’ असाच आहे ना? कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.)

लेख माझाच आहे .
मिसळपाव आणि माबो दोन्हीकडे इतिहासामधील झाकोळलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल लेख मागितला होता.
मिसळपाव वर प्रकाशित झाल्या झाल्या इथे टाकने योग्य वाटले नाही म्हणून आत्ता टाकला.

मिसळपावरील सारथी हा तुमचाच आयडी आहे का?>>>>>> होय

लेख माहितीपूर्ण आहे. पण घटना मागे पुढे लिहिल्याने आणि मधेच वर्तमानकाळ्/भुतकाळ असे झाल्याने विस्कळीत वाटतो.>>>>> खरचं अस झाल आहे, त्याबद्दल क्षमस्व. माबोवर "ॠतू" असा विषय होता, त्यामुळे हेमुच्या जीवनातील घटनांना ॠतूचक्रानुसार दाखवायच होतं, पण तितकसं जमल नाही.

राजाकडे घोडी किती होती? हत्तीच्या सोंडेचा व्यास किती होता? राजाला बायका किती होत्या? त्याची तलवार किती फूट होती? तो किती लढाया जिंकला? ..... असल्या तपशीलावरनं राजा बरा कि वाइट कसं ठरवणार?

राजाने रस्ते किती बंधले? दवाखाने, शाळा किती उघडल्या? शेतकर्‍याला ट्याक्स किती होता? घातक प्रथेविरुद्ध कायदे वगैरे केले का? न्यानव्यवस्था कशी होती? हे असली माहिती कुणी लिहितच नाही.>>>>>>>>> याच्या करिता खुप खोलात जाउन अभ्यास करण्याची गरज असते, दुर्दैवाने अशी फारच कमी माहिति उपलब्ध आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार

मिसळपावरील सारथी हा तुमचाच आयडी आहे का?>>>>>> होय
<<
धन्यवाद! माझा पहिला प्रतिसाद एडिटला आहे. दोन वेगळ्या आयडी होत्या, व मिपावर वाचलेले आठवत होते म्हणून विचारले. तुमच्या पाऊलखुणा चेकायच्या राहिल्या त्याबद्दल दिलगिरी.

आजकाल माबोवर असला बाष्कळपणा वाढलाय. ते एक ड्याम्बीस म्हणून डुआयडी आहेत. अ‍ॅडमिन यांनी त्यांचा लेख उडवला व तिथे बाहेरील लेख डकवू नयेत अशी ताकीत दिली तरी यांना अक्कल आली नाही. यांनी तो लेख बदलून पुन्हा लिहिला. असो.

हरिहरजी,

रच्च्याकने नाही. रच्याकने. = रस्त्याच्या कडेने. म्हणजे बायदवेच. तुमच्या टंकण्यात एक च जास्त झालाय.

ईब्लिस,

स्वता:चा प्रतिसाद संपादित केला आहे ! का, का करावा लागला संपादित ? मान्य करा की पिंक टाकली होती, ती स्वता:च्या तोंडावरच पडली.

तुमचे लेखन कर्तूत्व सर्वांना माहिती आहे ईथे ! स्वता: एक ही लेख लिहायचा नाही आणि दुसर्याच्या लेखा वर आधिकारी असल्याचा आव आणायचा! बाकी सर्व ठिकाणी तोंड घशी पडुन ही आपकी टांग तो उपरच !!

दुसर्याच्या लेखावर पिंका टाकायच कमी करा !!

बाकी तो लेख मटा च्या बातमी वर आधारीत होता तुमच्या सारखा पोकळ नव्हता ! त्यावर प्रतिक्रिया
द्याच, मग बघु,

नाहीतर कोणीतरी हात गळ्यात बांधतील तुमचे !!

इब्लिस | 28 June, 2013 - 20:29 नवीन
तुमच्या टंकण्यात एक च जास्त झालाय.>>>>>>>>>
‘रच्च्याकने , हिरा, तुम देख रहे हो क्या ? तुम ने जी से हिरो करार दिया था..............’ या डँबिस यांच्या (28 June, 2013 - 03:22) वरील वाक्यातील ‘रच्च्याक’ कॉपी पेस्ट केल्यामुळे हाफ ‘च’ आगाऊ झालेला आहे. Wink
(रच्याकने डँबिस व इब्लिस चू. भू. दे. घे.)

>>>>> ईतिहासाच्या पानावर नाव निशाण नसलेल्या एका कर्तुत्ववान राजाबद्दल माहिती दिल्यावद्द्ल धन्यवाद !! <<<<<
इंग्रजान्च्या राज्यात शिकलेलल्या माझ्या आईवडिलान्ना हेमु बद्दलचा इतिहास ठाऊक होता, स्वतंत्र भारतात जन्मलेल्या अन शिकलेल्या मला मात्र "मूळात या देशावर कोणा परकीयान्चे आक्रमण" झाले होते की नाही असा संभ्रमित इतिहास शिकावा लागून, अकबर "थोर" होता, ताजमहाल शहाजहानने बान्धला वगैरे शिकावे लागले. असो.

सारंग, छान लेख, हेमू विक्रमादित्य या पराक्रमी राजाचे नाव आतापर्यंत कधीही ऐकले नव्हते, तुमच्यामुळे माहिती तरी झाले,

मिसळ पाव या वेब साईट विषयी देखील माहित नव्हते, त्यामुळे इथे लेख ctrl V केलात ते बरेच केलेत Happy