Submitted by अंतरा on 24 June, 2013 - 07:13
माझ्या वडिलांना उचकीचा त्रास होतो आहे. नुकतेच हॉस्पिटल मधुन घरी परत आले आहेत.त्यांना सध्या २०+ टॅबलेट्स घ्यायला लागत आहेत पण त्या मानाने जेवण खूप कमी झाले आहे.डॉकटरांनी दिलेल्या औषधांचा काही उपयोग होत नाही.त्या मुळे ते नीट झोपु शकत नाहीत.कुणाला घरगुती उपचार / आयुर्वेदिक औषधे माहित असल्यास त्वरित सांगा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23611 इथे वाचली काही माहिती
मध खायला ध्या.
मध खायला ध्या.
अंतरा, माझ्या वडलांना सुद्धा
अंतरा,
माझ्या वडलांना सुद्धा असाच त्रास व्हायचा, पण ह्याला एकच घरगुती उपाय जो आम्ही केला होता, तो असा कि, ईच्छा नसतांनाही खाणे मात्र सतत चालु ठेवले होते, तेही थोडे-थोडे. म्हणजे ब्रेक फास्ट, लंच, डिनर असे तीन वेळचे वेगळे पण पोटभर न करता, त्यांना आम्ही थोड्या-थोड्या वेळाने काहीतरी खायला अथवा जूस ( जूस फक्त काचेच्याच भांड्यांत व ग्लासात द्यावा, कुठल्याही धातुच्या भांड्यात वा पेल्यात कधीही देऊ नये ), असे द्यायचो, आणी ह्याने कशी माहिती नाही पण त्यांच्या त्या सतत उचक्या थांबल्या होत्या.
बाकी सर्वांनाच एकच उपाय लागु होऊ शकतो असे आवश्यक नाही, तरी हे करुन पहा. थोड्या वेळाने खाणे होत असल्यामुळे न कळत मनुष्य जास्ती खातो.
तुमच्या वडलांची प्रकृति लवकर सुदृढ होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. . . .
नमस्कार
Vanila icecream gilayla sanga
Vanila icecream gilayla sanga
प्रतिसादा बद्द्ल , उपाय
प्रतिसादा बद्द्ल , उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद...उपाय करुन बघते..वडिलाना sever pulmonary ariel hypertension ,cough चा त्रास होतो आहे त्यामुळे डॉक्टर औषधे कमी करणार नाहित. वडिलाना घशात काहि तरी अटकल्या सारखे वाटते आहे.डॉक्टर आणखिन एका डॉक्टर ला भेटा असे सांगत आहेत..खरे सांगायचे झाले तर पुरता गोंधळ उडाला आहे...
अंतरा, डॉक्टर सांगतात ते करा
अंतरा,
डॉक्टर सांगतात ते करा असे सुचवितो. तुमच्या तीर्थरूपांना असलेल्या आजाराची उचकी घरगुती इलाजांनी जाणार नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा फारसा उपयोग झाला नाही आणि नविन डॉक्टरांना भेटे पर्यन्त वडिलांना रीलिफ मिळावा म्हणुन सध्या धडपड सुरु आहे..
आणखिन थोडी मदत हवी होति..
१)केमिस्ट संप करणार आहेत असे ऐकले. महिन्या भर पुरतील इतकी औषधे विकत घ्या असे सांगत आहेत ,
२) caverta 25 stock मध्ये नाहीयेत का?
माझा अनुभव सांगतो .वडीलांना
माझा अनुभव सांगतो .वडीलांना अंजायनाचा त्रास होता हॉस्पिटल मध्ये बऱ्याचवेळा ठेऊन आणल्यावर उचकीचा त्रास व्हायचा .हे सगळे औषधांचे साईड इफेक्टस् आहेत त्यामुळे त्यासाठी आयुर्वेदिक औषधे वाया घालवणे व्यर्थ .ही गोष्ट ओपरेशनच्या वेळी भूल देणाऱ्या एका डॉक्टरकडूनच कळली .त्यांनी वडिलांची जिभ दोन मिनीटे बाहेर धरून ठेवल्यावर उचकी चार तास थांबली .पण वर सांगितल्याप्रमाणे हाही एक तोडगा आहे सर्वाँना लागू होईलच असे नाही .
डायबीटिज चा त्रास नसेल तर
डायबीटिज चा त्रास नसेल तर गुळासोबत पाणी देउन बघा.
अंतराजी, मी बिचारा एक डॉक्टर
अंतराजी,
मी बिचारा एक डॉक्टर असल्याने २० सोबत २१वे औषधच साम्गेन. सबब माझ्या सल्याचा इथे उपयोग नाही.
केमिस्टांच्या संपाचा लोड घेऊ नका. आपल्याकडे ड्राय डे ला सर्रास दारू मिळते. संप टिकणे अन होणे पुढची बाब आहे. महिनाभर औषध देणे गरजेचे असल्यास, त्याच केमिष्टास उरलीत तर औषधे परत घेण्याच्या बोलीवर विकत घेऊन टाका.
तुम्ही विचारले त्या ट्रेड नेमच्या औषधाशी माझा संबंध नाही. शिवाय तुमच्या एरियात मिळेल ते इतरत्र मिळतेच असे नाही.
केमिस्टांच्या मनमानीचा एक लेख कालच लोकसत्तेत होता. सापडला तर डकविन.
अंतरा कॅवर्टाचे जे कंटेंट आहे
अंतरा कॅवर्टाचे जे कंटेंट आहे ते बर्याच ब्रँडनेमनी उपलब्ध आहे. समजा नसलंच कॅवर्टा उपलब्ध तर डॉक्टर दुसरा ब्रँड सुचवतीलच.
होमिओपथी मध्ये पंचक्षारचे
होमिओपथी मध्ये पंचक्षारचे औषधे असतात. माझ्या सासर्याना पण असाच एका ओपेरेशन नंतर त्रास होत होता. दिवस दिवस उचकी येत असे. एका दिवसात थांबली होती उचकी
शंखभस्म चिमूटभर आणि अर्धा
शंखभस्म चिमूटभर आणि अर्धा चमचा मध एकत्र कालवून तीन वेळा द्या.
वडिल का अॅडमिट होते? त्याना काय झाले होते/ आहे? निदान काय आहे?
अंतरा, वडलांची प्रकृति कशी
अंतरा,
वडलांची प्रकृति कशी आहे ?
सगळ्यानी सुचवलेले
सगळ्यानी सुचवलेले उपाय्,,दिलेला प्रतिसाद ,केलेली विचारपूस ...हह्या सगळ्या साठी धन्यवाद...खूप बरे वाटले...बाबांना उचकी चा त्रास असह्य झाल्या मुळे पुन्हा हॉस्पिटल मध्ये अॅड्मिट करावे लागले आहे.इनफेक्शन्,कफ.झाला आहे..अजुनहि आयय.सी.यु. मध्येच आहेत. कंडिशन अनस्टेबल आहे...माहित नाही काय होइल...
अंतरा, योग्य ती वैद्यकिय मदत
अंतरा, योग्य ती वैद्यकिय मदत मिळतेच आहे. त्यांना लवकरच बरे वाटेल आणि ते घरी येतील.
आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.
कसे आहेत बाबा आता ?
कसे आहेत बाबा आता ?
अंतरा, माझ्या बाबांनाही
अंतरा, माझ्या बाबांनाही ठसक्याचा त्रास होता. त्यांना अन्न नीट गिळताही येत नसे. त्यांना झोपवून (slanting position )अन्न सेमि लिक्विड (मिक्सरमध्ये पाणी घालून दळून )/ किंवा लि॑क्विड स्वरूपात चमच्याने भरवले तर मात्र ठसक्याशिवाय अन्न अन्ननलिकेतून खाली उतरत असे. बसवून भरवले की ठसका सुरू. प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो, पण ट्रायल एरर् मधून आम्ही त्यांना भरवण्याची ही पद्धत डेव्हलप केली होती हे आठवले.
तुमच्या वडिलांच्या आजाराला लवकर उतार पडो !शुभेच्छा.
अंतरा , तुमच्या बाबांना लवकर
अंतरा , तुमच्या बाबांना लवकर बरे वाटू दे. शुभेच्छा .
खडीसाखरेचे पाणी द्यायचे. सतत
खडीसाखरेचे पाणी द्यायचे. सतत साखर चाखत रहायची.
बाबांचा उचकीचा त्रास थांबला
बाबांचा उचकीचा त्रास थांबला होता पण कफाचा त्रास पुन्हा सुरु झाला आणि त्या नंतर इन्फेकशन्,न्युमोनिया....ह्या सगळ्यातुन नाही वाचु शकले...आजारी पडणे,आय.सीयु. मध्ये अॅड्मिट होणे किती भयानक असते हे अनुभवले.रुग्ण आणि त्याचे नातलग किती ,कसे होरपळले जातात हे बघितले, अनुभवले..केवळ आर्थिकच नुकसान नाही तर मानसिक त्रास ....सगळे भयानक आहे
आई ग्ग!! तुम्ही स्वतःला
आई ग्ग!!
तुम्ही स्वतःला सांभाळा. इतरांनाही धीर द्या.
अंतरा दीड वर्षापूर्वी अश्याच
अंतरा
दीड वर्षापूर्वी अश्याच काहीशा परिस्थितीतून गेले होते. समजू शकते.
ह्या सगळ्यातून सावरण्याचं तुम्हा सर्व कुटुंबियांना बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अंतरा वाईट वाटले.पण आपल्या
अंतरा
वाईट वाटले.पण आपल्या माणसासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे समाधान तर आहे.बाकी सारे pre-written
असते हो! अडीच वर्षांपूर्वी अशाच प्रकाराच्या अनुभवातून गेल्यामुळे समजू शकते.
अंतरा, फार वाईट बातमी.
अंतरा, फार वाईट बातमी. तुमच्या बाबांना श्रद्धांजली. काळजी घ्या तुमची आणि परिवारातील सर्वांची.
अंतरा तुमच्या बाबांना
अंतरा
तुमच्या बाबांना श्रद्धांजली. ह्या दु:खातून सावरण्यासाठी परमेश्वर तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबीयांना बळ देवो हिच प्रार्थना.
(No subject)
वाईट बातमी. देव तुम्हाला अणि
(No subject)
तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
अंतरा, तुम्हाला अन
अंतरा, तुम्हाला अन कुटुंबियांना ह्यातून सावरायला बळ मिळो. येळेकर म्हणतायत तसं करायचे ते सगळे प्रयत्नं केलेत तुम्ही... ह्यात समाधान असो द्या.
अंतरा स्वतःला सावरा
अंतरा स्वतःला सावरा
बांबांना श्रद्धां जली.
बांबांना श्रद्धां जली.
(No subject)
बाबांना श्रध्दांजली.. सावरा
बाबांना श्रध्दांजली..
सावरा स्वतःला
श्रद्धांजली
(No subject)
ओह... अंतरा तुमच्या बाबांना
ओह...
अंतरा तुमच्या बाबांना श्रद्धांजली!
सावरा स्वतःला, आईला आणि कुटुंबियांना!
काळजी घ्या.
काळजी घ्या.
काळजी घ्या
(No subject)
काळजी घ्या.
(No subject)
तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
तुमच्या बाबांना श्रद्धांजली. ह्या दु:खातून सावरण्यासाठी परमेश्वर तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबीयांना बळ देवो हिच प्रार्थना.
ओह तुमच्या बाबांना
ओह
तुमच्या बाबांना श्रद्धांजली!
येळेकर आणी दाद म्हणतात तसं तुम्ही सगळे त्यांच्यबरोबर होतात शेवटपर्यंत हेच समाधान..
काळ्जी घ्या.....
तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
तुमच्या बाबांना श्रद्धांजली. ह्या दु:खातून सावरण्यासाठी परमेश्वर तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबीयांना बळ देवो हिच प्रार्थना.
बाबांचा उचकीचा त्रास थांबला होता पण कफाचा त्रास पुन्हा सुरु झाला आणि त्या नंतर इन्फेकशन्,न्युमोनिया....ह्या सगळ्यातुन नाही वाचु शकले...आजारी पडणे,आय.सीयु. मध्ये अॅड्मिट होणे किती भयानक असते हे अनुभवले.रुग्ण आणि त्याचे नातलग किती ,कसे होरपळले जातात हे बघितले, अनुभवले..केवळ आर्थिकच नुकसान नाही तर मानसिक त्रास ....सगळे भयानक आहे>>>> हो, ग खरंय.
आपल्या दु:खात सहभागी आहोत.
आपल्या दु:खात सहभागी आहोत.
अंतरा,तुमच्या वडीलांना
अंतरा,तुमच्या वडीलांना श्रद्धांजली!

काळ्जी घ्या. स्वतःला व आईला सावरा.
(No subject)
Pages