पापलेट करी (फोटो सहित)

Submitted by डीडी on 24 June, 2013 - 02:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
 • १ मध्यम पापलेट (Black/Silver/Golden)
 • मीठ
 • ३-४ चमचे तिखट
 • १ छोटा चमचा हळद
 • १ वाटी ओलं खोबरं
 • ३-४ लसूण पाकळ्या
 • २ चमचे धणे
 • ८-१० काळी मिरी
 • १ मध्यम कांदा
 • ५-६ आमसुले (कोकमे) (नसल्यास चिंच)
 • २ चमचे तेल
 • मीठ
क्रमवार पाककृती: 

पापलेट स्वच्छ करुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.

त्यांना मीठ, हळद व २-३ चमचे तिखट लावून साधारण तासभर मॅरिनेट होऊ द्यावेत.

वाटण-
खोबरे, अर्धा कांदा, ३-४ कोकमे, मिरी, धणे, २ चमचे तिखट आणि थोडे पाणी मिक्सर चटनी जार मध्ये घ्यावे.

शक्यतो ताजे, नुकतेच खवलेले खोबरे घ्यावे. (पण मला शक्य नसल्याने, नाईलाजाने पॅकेट मधलं खोबरं घेतलंय)

बारीक वाटण करुन घ्यावे.

वाटण जितके बारीक होईल ग्रव्ही तेव्हडी स्मुथ होईल.

भांड्यात तेल तापवावे. लसुण बारीक चिरुन परतवून घ्यावी, त्यावर उरलेला अर्धा कांदा बारीक चिरून घालावा.

कांदा गुलसर झाल्यावर त्यावर पापलेटचे तुकडे घालुन ३-४ मिनिटे परतवून घ्यावेत.

आता त्यात वाटण घालावे आणि थोडे पाणी घालुन मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजवावे.

आच मोठी असेल तर पापलेटचे तुकडे फुटू शकतात. चवीनुसार वरुन मीठ घालावे. (मॅरिनेट करताना मीठ लावले असल्याने चव घेऊनच मीठ घालावे.)

गरमागरम पापलेट करी वाफाळत्या भातासोबत सर्व् करावी

वाढणी/प्रमाण: 
२/३ जणांसाठी
अधिक टिपा: 

काळ्या पापलेटला हलवा असही म्हणतात असं ऐकल मी.. पण नावात काय ठेवलय.. असो.
फिश करी साठी एकमेव टिप म्हणजे मासा ताजा असावा.. बाकी पाडत थोड इकडे तिकडे झालं तरी खुप फरक नाही पडत.. सगळी मदार माश्यावर Happy

माहितीचा स्रोत: 
आई / सौ :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ्या पापलेटला हलवा असही म्हणतात असं ऐकल मी>>>>>>> नाही. हलवा वेगळा आणि काळं पापलेट वेगळं. काळं पापलेटला सरंगा म्हणतो आम्ही.

बाकी रेसीपी वेगळी आहे. करुन बघेन Happy

मला वाटतंय तो हलवाच आहे...कारण ते टेक्स्चर हलव्यावर असतं...पापलेट ची स्किन सफेद्शुभ्र असते....

हम्म्म्म्म... ग्रेटेड कोकोनट च्या पाकिटावर बाहासा इंडोनेसिया आणी चायनीज दोन्ही भाषांत लिहिलेलंय.. सो वेरी सिंगापुरी Happy

खूप यम्मी आहे रेस्पी..

डीडी रेसिपी आणि फोटो दोन्ही छान आहेत.

पण डीडी हा हलवाच आहे. पापलेट आणि हलव्यात खुप फरक असतो दिसायला साधारण सारखे असले तरी. हलवा हा अतिशय उष्ण असतो. ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना, पथ्यकारी व्यक्तींना हलवा दिला जात नाही. तर पापलेट हा पथ्यातही चालतो. कारण तो सौम्य असतो.

सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139

हलवाच आहे हां. त्याला विंग्रजीत "blaack pomphret" म्हणातांत. आपण सरंगा म्हणतो. आणि कापरी पापलेटांना काळी पापलेटं!!

वर्षू नील >> आपकी नजर और निरमा सुपर... Wink Good observation Happy
भ्रमर >> +१
मंडळी, मी मार्ट मधून "black pomfret" म्हणूनच आणला. सिल्व्हर, गोल्डन आणि ब्लॅक असे तीन प्रकार पाहिले.

मला वाटतंय तो हलवाच आहे...कारण ते टेक्स्चर हलव्यावर असतं...पापलेट ची स्किन सफेद्शुभ्र >=+१

हा हलवाच आहे. हा वातुळ असल्याने ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना, पथ्यकारी व्यक्तींना हलवा दिला जात नाही.

छान वाटते रेसिपी. आम्ही करतों त्यापेक्षां जरा वेगळी पद्धत व म्हणूनच करून पहायलाच हवी. अर्थात, << फिश करी साठी एकमेव टिप म्हणजे मासा ताजा असावा..>> यामुळे कांहीं दिवस तरी थांबणं आलंच ! [ कधींतरी बदल म्हणून चिंच /आमसोलं या ऐवजीं कैरी घालूनही केलेली पापलेट/ कोळंबी करी छान लागते ]
'करी'साठी पापलेट आणि तळायला सरंगा [कापरी पापलेट] व हलवा, असा अलिखीत दंडकच असावा ! Wink

mastch

४ वर्ष झाली... मांसाहार बन्द करुन...... !!!
खरचं, अशा रेसिपी पाहील्या कि निश्चय डळमळतो...!!!
जागू ताईं च्या रेसीपीज... मुद्दाम मला चिडविण्यासाठी असतात असं वाटुन जातं...! :ड

डीडी रेसिपी आणि फोटो दोन्ही छान आहेत.>>>+१

पण डीडी हा हलवाच आहे. पापलेट आणि हलव्यात खुप फरक असतो दिसायला साधारण सारखे असले तरी. हलवा हा अतिशय उष्ण असतो. ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना, पथ्यकारी व्यक्तींना हलवा दिला जात नाही. तर पापलेट हा पथ्यातही चालतो. कारण तो सौम्य असतो.>>>+१

डीडी रेसिपी आणि फोटो दोन्ही छान आहेत.>>>+१

पण डीडी हा हलवाच आहे. पापलेट आणि हलव्यात खुप फरक असतो दिसायला साधारण सारखे असले तरी. हलवा हा अतिशय उष्ण असतो. ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना, पथ्यकारी व्यक्तींना हलवा दिला जात नाही. तर पापलेट हा पथ्यातही चालतो. कारण तो सौम्य असतो.>>>+१

हलव्याला खवलेही असतात.मोठ्या पापलेटला क्वचित असतात.

Pages