Submitted by अनघाहिरे on 22 June, 2013 - 05:13
आज माझ्या स्वप्नात माझा बाळकृष्ण आला
बोबड्या बोबड्या बोलातच मागितले लोणी खायला
छोटीशी स्वारी, कसा चुरू चुरू बोलतो
म्हणे खाणे नको शिकाऊ मला, मी शिस्तीतच खातो
दाऊ भैयाची खोडी काढत, स्वत बसला रडत
मार म्हणे हवे तितके मी नाही घाबरत
लटके लटके राग धरत अऩं डोके खुपत गुडघ्यात
दंग कसा झाला मनु खोटखोट रडण्यात
शोनू माझा राजा शहाणा झाला
रोज आता अभ्यास करेल म्हणाला
अभ्यासात आता नको श्लोक वाणी
हवी त्याला एबीसीडी तिही रिदम गाणी
गाई चरायला स्वारी आता जाणार नाही
बॅटबॉल, बुद्धिबळ त्याला नवे नाही
गोड गोड बोलत त्याने फोन केला
खेळायला नवी खेळणी हवीय त्याला
एक सत्य मात्र त्याने सांगितले जाता जाता
प्रेमाची तू यशोदामैया पण जन्मदात्री ती देवकीच माझी माता
नंदाचा लाडला माझा कन्हैया
मला आज चक्क म्हणाला मैया
मला आज चक्क म्हणाला मैया....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा