जलपरी

Submitted by अनघाहिरे on 22 June, 2013 - 04:55

भल्या मोठ्या ढगांचा वाडा
कुणाचा बर असेल सांगा जरा
अहो हा वाडा तर आपल्या लाडक्या परी राणीचा !
परी राणी आपली त्या वाड्यातच राहते ,इंद्रधनुष्यावर स्वार होऊन फुलपाखरांशी
खेळते,चंद्र चांदण्यांबरोबर लपंडाव खेळते,पक्ष्यांबरोबर गाणे गाते सुंदर ही
सोनुली सर्वांची आहे आवडती मैत्रीण, आहे सगळ्यांची ही जिवाभावाची .ढगात
तिच्याशिवाय कुणाला करमतच नाही आकाशातली परी सर्वांची लाडकी सर्वाना आनंद
देण्यात कायम मग्न झाली.
ढगातच राहून आज ती फार कंटाळली विचार केला भटकून यावे आणि जग बघावे. सारे जग
सुंदर आहे ते बघून यावे धर्तीवर जावे आणि तिथला थोडा आनंद सोबत घेऊन यावे मग
धरतीवर जाण्याचा तिने निश्चय केला आनंद भरून घ्यायला सोबत घेतली एक मोठी पेटी
आणि घेतले मित्र पाच.एक ससा आणि पक्षी चार.
दोन दिवसात परत ये बर ! नाहीतर परत तुला आकाशात प्रवेश मिळणारच नाही लक्षात
असू दे हा नियम छान .
देवाने तिला बजावून सांगितले
लवकरच परतेल सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली रमत गमत.आकाशातून फिरता
फिरता तिने बघितला मिला मिला समुद्र . समुद्रात खेळायची तिला खूप ईच्छा झाली
मनात विचार केला थोडावेळ समुद्रात विहार करावा ,सुंदर सुंदर मासे बघावे .
माश्यासवे थोडे खेळावे . परीला समुद्र खूप आवडला . समुद्रात ती खूप खूप खेळली
मोती वेचले आपल्या पंखावर सजवले,शंख शिंपल्याची माल केली आपल्या गळ्यात घातली
. समुद्रात ती हींड हींड हिंडली , फिर फिर फिरली बघता बघता तीन चार दिवस निघून
गेले . अन अचानक तिला देवाच्या वाक्याची आठवण झाली. परी खूप घाबरली. धावत
सुटली लगबग लगबग करू लागली आकास्झाकडे धाव घेऊ लागली.
छे पण तिला आत प्रवेश मिळालाच नाही चहू बाजूचे दरवाजे तिच्यासाठी बंद झाले .
आता काय करावे? ती रडू लागली . परी रडली तशे तिचे पंख नष्ट झाले. आता तर तिला
उडतही येणार नव्हते.
हे देवा मला माफ कर मी चुकले. मला पार भूल पडली पुन्हा माझ्याकडून ही चूक
होणार नाही तू मला परत परी रुपात स्वीकार . परी बिच्चारी गयावया करू लागली.
पण छे! तिच्या विनवणीचा देवावर काही परिणाम झाला नाही
" आग सोनुली, परीने सर्वाना आनंद द्यायचा असतो तिने कधीच रडायचे नसते हे तू
माहित नाही का? तुझ्या रडण्यामुळे तुझे पंख नष्ट झाले आता मी तुला पंख देऊ
शकणार नाही परीचे दुखः बघून चंद्र चांदण्या पक्षी सारे सारे देवाला विनवणी करू
लागले .
" अरे घाबरू नका ज्या समुद्रामुळे परी आपले देहभान विसरली त्या समुद्रातल्या
जीवांना सुद्धा आपल्या सोनुलीची गरज आहे त्यांना सुद्धा आनंद द्यायला हवा
ना!म्हणून आजपासून आपली परीही समुद्रात राहील तिला पंख जरी नसले तरी पाण्यात
पोहण्यासाठी माश्यासारखी लांब शेपूट असेल.
सगळे खूप आनंदी झाले. मग चंद्रावर स्वार होऊन परी समुद्रात पोहोचली . आणि
आजपासून आपली ही परी जलपरी झाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users