Submitted by अनघाहिरे on 21 June, 2013 - 07:35
मोराच्या पिसात
रंग किती छान
बघायला लांडोर
उंच करी मान
उंटाच्या मानेची
करू घसरगुंडी
चढायला मोठी
हवीय शिडी
उंदराचे पडले
पुढचे दात
चीज खायचे तर
मिळाला भात
घसरगुंडीला लावायला
रंग छान छान
चीजची आता
घालू कमान
घसरगुंडी खेळायला
आलाय कोण
मोर आणि लांडोर
सोबत उंदीर दोन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा