माझ्यासारखा मीच !

Submitted by अनघाहिरे on 21 June, 2013 - 06:42

डौलदार हत्ती त्याची
डौलदार चाल
कुणाला सांगू नका
त्याचीअवघडली मान

सोंडेचे वजन त्याला
पेलवतच नाही
पोटाची हालचाल
सहन होत नाही

जिम मध्ये जाऊन
व्हावे स्लिम स्मार्ट
पहिल्याच दिवशी
त्याने तोडले रेकोर्ड

डायटिंग करायचा
निर्णय घेतला
ट्रकभर केळातच
जेवायचा थांबला

डायटिंग बियटिंग
पुरे झाले फॅड
उगा काही दिवसातच
मी दिसू लागेल मॅड

म्हणो कुणी लोद्या
वा करो कुणी चेष्टा
मी माझा बरा
सुखी माझ्या जगात

अनघा हिरे
नासिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users