जसे जसे मदतकार्य वेग घेत आहे तसे तसे उत्तराखण्डातील दुर्घटनेचे अतिशय भयावह स्वरूप समोर येत आहे. पाचशे रस्ते, पावणेदोनशे पूल, नव्वद धर्मशाळा, चाळीस हॉटेल्स, शेकडो घरे वाहून गेली आहेत. हजारो मृत्युमुखी पडले आहेत तर लाखाहून अधिक रहिवासी, यात्रेकरू व पर्यटकांना सुटकेची आणि मदतीची गरज आहे.
सैन्यदले व प्रशासन यांबरोबरच रा.स्व. संघाची आपत्कालीन यंत्रणाही लगेच कार्यरत झाली असून आपल्याला या कामासाठी काही मदत करण्याची इच्छा असेल तर खालील पत्रकातील माहितीप्रमाणे आपला धनादेश पाठवू शकता अथवा त्यांच्या स्टेट बँक ऑफ ईंडियातील अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच शक्य झाल्यास आपल्या मित्रपरिवारालाही याबद्दल माहिती देऊ शकता.
(८० जी आयकर सवलत उपलब्ध आहे. निधी पाठवताना आपली आवश्यक ती माहिती देउन त्याप्रमाणे पावती मागवता येईल.)
Online Trasnfer: Bank Account Details:
A/c Name: Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
Bank Name & Branch: State Bank of India, Main Branch
Convent Road, Dehradun, Uttarakhand, India
A/c No: 31156574681
NEFT Code: SBIN0000630
चेक पाठवायचा असेल तर पत्ता
Uttaranchal Daivi Aapda Peedit Sahayata Samiti
भाउराव देवरस कुंज, १५ तिलक मार्ग, देहरादून, उत्तरांचल, पिन २४८००५
अमेरिकेतील अकाऊंटमधून डॉलर्स पाठवायचे असतील तर सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून पाठवता येतील.
http://www.sewausa.org/UttarkhandFloodReliefAppeal
पुण्यात मदत करयची असेल तर पत्ता
R S S Office In Pune,
309,Moti Baug,Shaniwar Peth,
Opp Ahilyadevi High School, Pune-411030.
Phone 24458080
OR
RSS JANKALYAN SAMITI (MAHARASHTRA PRANT)
Bhageshwar Niwas', 1609, Sadashive Peth,
Tilak Road, Pune - 411 030,
Phone 24324071
Patrak
http://samvada.org/files/2013/06/RSS-appeal.jpg

उत्तराखंडमध्ये झालेल्या
उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीला काही मदत द्यायची खूप इच्छा आहे कारण ट्रेकच्या निमित्ताने तिथे अनेकदा जाणं झालंय, त्यामुळे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आहे उत्तराखंडशी. फक्त जी मदत आपण करतो ती गरजूंपर्यंत पोचावी हीच इच्छा आहे.
आर.एस.एस चा कारभार पारदर्शी आणि प्रामाणिक आहे याची कल्पना आहे.
जीएस, वर जो दैवी आपदा पिडीत सहायता समितीचा पत्ता दिलाय तो आर.एस.एस.चाच आहे कां?
<उत्तराखंडमध्ये झालेल्या
<उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीला काही मदत द्यायची खूप इच्छा आहे कारण ट्रेकच्या निमित्ताने तिथे अनेकदा जाणं झालंय, त्यामुळे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आहे उत्तराखंडशी. फक्त जी मदत आपण करतो ती गरजूंपर्यंत पोचावी हीच इच्छा आहे.
आर.एस.एस चा कारभार पारदर्शी आणि प्रामाणिक आहे याची कल्पना आहे.
<<< + १
जीएस खूप छान माहितीबद्दल धन्यवाद
हा धागा मायबोलीच्या मुख्य
हा धागा मायबोलीच्या मुख्य पानावर नाही का घेता येणार? मदतीसारख्या कार्यासाठीचा धागा आहे.
जीएस,धन्यवाद या पोस्टसाठी.
जीएस,धन्यवाद या पोस्टसाठी.
<<जीएस | 24 June, 2013 -
<<जीएस | 24 June, 2013 - 18:27 >>
आभारी आहे, माहिती दिल्याबद्दल. मदत पाठवण्याची व्यवस्था करतो.
जी एस, कळकळ पोहोचली. माझी आई
जी एस, कळकळ पोहोचली.
माझी आई स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघाच्या कार्याने प्रभावित झालेली आहे. आज ८० व्या वर्षी देखील, तिने या
कार्यासाठी मदत केलीच आहे. या वयात तिला प्रवास शक्यच नाही, पण स्थानिक पातळीवर ती काम करतेच आहे.
या मदतकार्यात हातभार लागलाच पण या निमित्ताने भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून, निसर्ग, लोकशिक्षण, भक्तांचे पर्यटन या सगळ्याचाच विचार व्हायला हवा.
जीएस, उत्तम माहिती. केलेली
जीएस,
उत्तम माहिती. केलेली मदत योग्य त्या जागी पोहोचेल यात काहीच शंका नाही.
कृपया ही लिंक पहिल्या पानावर येइल असे करावे.
धन्यवाद.
http://www.sewausa.org/Uttark
http://www.sewausa.org/UttarkhandFloodReliefAppeal
ही पण रा.स्व.संघाची वेबसाइट आहे का?
I mean या लिंकवर केलेली मदत पण रा.स्व.संघाला मिळणार ना.
>>हा धागा मायबोलीच्या मुख्य
>>हा धागा मायबोलीच्या मुख्य पानावर नाही का घेता येणार? मदतीसारख्या कार्यासाठीचा धागा आहे.>>
+१
हे फेसबुक वरिल आव्हान ....
हे फेसबुक वरिल आव्हान ....
https://www.facebook.com/photo.php?fbid=4662715459520&set=a.132794309229...
सर्वांना धन्यवाद. आऊटडोअर्स,
सर्वांना धन्यवाद.
आऊटडोअर्स, वर दिला आहे तो पत्ता संघाच्या प्रांत कार्यालयाचा आहे, उत्तरांचल दैवी आपदा समितीचे काम तेथूनच सुरू आहे.
चेरी, हो, सेवा ईंटरनॅशनलच्या माध्यमातूनही तुम्ही मदत पाठवू शकता. मी वर लिंक दिली आहे.
धन्स जीएस! वरील पत्त्यावर मदत
धन्स जीएस! वरील पत्त्यावर मदत पाठवेनच..
>>पुन्हा त्याचा कसलाही गवगवा / उदो उदो नाही हे आणखी विशेष.
आजच्या काळात मात्र याचा तोटा देखिल आहे.. जे चांगलं आहे त्याबद्दल जास्त प्रचार व प्रसार होणं आवश्यकच आहे. ऊलट, त्यासाठी ऊपलब्ध सर्व ईलेक्ट्रॉनिक मिडीया चा योग्य वापर करून घेणे यात काहीच चूक नसावे. 'नको त्या' फाल्तू गोष्टि २४x७ कानावर आदळल्या जातात त्यापेक्षा या अशा गोष्टींबद्दल जितके जास्त ऐकायला मिळले तितके चांगलेच आहे असे माझे वैयक्तीक मत!
>>पुन्हा त्याचा कसलाही गवगवा
>>पुन्हा त्याचा कसलाही गवगवा / उदो उदो नाही हे आणखी विशेष.
आजच्या काळात मात्र याचा तोटा देखिल आहे.. जे चांगलं आहे त्याबद्दल जास्त प्रचार व प्रसार होणं आवश्यकच आहे. ऊलट, त्यासाठी ऊपलब्ध सर्व ईलेक्ट्रॉनिक मिडीया चा योग्य वापर करून घेणे यात काहीच चूक नसावे. 'नको त्या' फाल्तू गोष्टि २४x७ कानावर आदळल्या जातात त्यापेक्षा या अशा गोष्टींबद्दल जितके जास्त ऐकायला मिळले तितके चांगलेच आहे असे माझे वैयक्तीक मत!
+ १ मदत पाठवली. भरपूर मदत मिळाल्याचेही कळले. तिरुपती , शिर्डीच्या दानपेटीत टाकणारेही असतात तसेच अश्या ठिकाणी देणारही आहेत हे पाहून बरं वाटलं
जीस, माहीती बद्दल
जीस,
माहीती बद्दल धन्यवाद....
संघ आणि सेवा कार्याच्या इतकी मुद्देसुद माहीती तर मी ही कधी कोणत्या बौध्दीकात ऐकली नव्हती...
मंजु.... +१
हा धागा मुख्य पानावर घेता येइलका....
एक अनोखि
एक अनोखि मदत
http://www.hindustantimes.com/India-news/NorthIndiaRainFury2013/British-...
आजच मदत पाठवली.झाल ते
आजच मदत पाठवली.झाल ते खुपच वाइट झाल.
धन्यवाद जी एस! बँकेत डायरेक्ट
धन्यवाद जी एस!
बँकेत डायरेक्ट जमा करण्याबद्दलची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
घोटाळे न होता पिडितांपर्यंत खरोखरच मदत पोचवली जाईल याची खात्री फक्त याच यंत्रणेबद्दल वाटते.
घारुअण्णा, >> संघ आणि सेवा
घारुअण्णा,
>> संघ आणि सेवा कार्याच्या इतकी मुद्देसुद माहीती तर मी ही कधी कोणत्या बौध्दीकात ऐकली नव्हती...
आ.न.,
-गा.पै.
केलेल्या कामाची (विशेषतः
केलेल्या कामाची (विशेषतः भाजपा किंवा संघ) प्रसिद्धी केली कि लोकं फेकू म्हणतात
पण म्हणोत काहीही, प्रसिद्धी करणे काळाचि गरज आहे, ती केलिच पाहिजे.
योगशी पूर्ण सहमत. हा मुद्दा
योगशी पूर्ण सहमत. हा मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता. योग्य गोष्टींचा प्रचार व्हायलाच हवा आणि आपणच तो करायलाही हवा.
@दिनेशदा पण या निमित्ताने
@दिनेशदा
पण या निमित्ताने भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून, निसर्ग, लोकशिक्षण, भक्तांचे पर्यटन या सगळ्याचाच विचार व्हायला हवा.<<
सहमत. आता आषाढी एकादशीला लाखो लोक एकाच वेळी पंढरीत दाटीवाटीने दाखल होतील. तेथे डोंगर कोसळण्याची भीती नसली तरी दहशतवादी हल्ला, ढगफुटी किंवा समाजकंटकांनी लुटालूट करण्यासाठी घडवून आणलेली पळापळी आणि त्यातून निर्माण होणारी चेंगराचेंगरी अशा गोष्टी होऊ शकतात. त्यात प्रचंड हानी होऊ शकते. नुकत्याच झालेल्या कूंभमेळ्यात रेल्वे स्थानकावर झालेली दुर्घटना ताजीच आहे.
पंढरीत दरवर्षी आषाढीस जाणार्यांची संख्या वाढतच चालली आहे. कांही भयंकर अनवस्था प्रसंग ओढवण्याआधीच कोणत्याही एकाच दिवशी जमणार्या भक्तांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचाही विचार व्हायला हवा. वर्षात दोन मोठ्या वार्या , दरमहाच्या एकादशा या दिवसांमध्ये ही संख्या डिस्ट्रिब्युट करण्याबद्दल वारकरी संप्रदायाने विचार करावा.
धन्यवाद जीएस. संघाच्याच घरात
धन्यवाद जीएस.
संघाच्याच घरात वाढलेली असल्याने, अत्यंत साध्या अशा संघपरिवारात कायम वावरल्यामुळे संघाशी जवळुन ओळख आहे, विश्वास आहे.
मदतीत नक्की भाग घेणार.
उत्तराखंड च्या दुर्घटने मध्ये
उत्तराखंड च्या दुर्घटने मध्ये बेपत्ता (ज्यांच्या कॉन्ट्क्ट होऊ शकत नहिये ) झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी काय उपाय आहेत?
आमचे एक खुप जवळचे नातेवाईक गेले होते यात्रे साठी. त्या काकु कश्याबश्या सुखरुप परत आल्या आहेत पण काकांचा अजुन काहीच कॉन्ट्क्ट होऊ शकत नहिये

त्यांच नाव नोंदवले आहे, जे जे शक्य आहे ते भारतातले नातेवाईक करत आहेत .. सगळे परेशान आहेत
आणि इथे बसुन आमचं बिल्कुल लक्ष लागत नाहिये कशातच...
नक्कीच मदत करु!! धन्यवाद जी
नक्कीच मदत करु!! धन्यवाद जी एस.
जीएस, परत एकदा धन्यवाद. मी ही
जीएस, परत एकदा धन्यवाद. मी ही मदत पाठवली वरच्या पत्त्यावर.
माधुरी१०१, गुगलने एक अॅप
माधुरी१०१,
गुगलने एक अॅप काढलेय. http://google.org/personfinder/2013-uttrakhand-floods
बघा, कदाचित उपयोगी ठरेल.
काळजी करु नका. देवाच्या कृपेने शोध लागेल त्यांचा.
नक्की बघते धन्यवाद शोध
नक्की बघते
धन्यवाद
शोध लागेल त्यांचा.>> हीच आशा आहे आता
त्यांचे नाव आहे ऑलरेडी,
त्यांचे नाव आहे ऑलरेडी, "unspecified" म्हणुन स्टेटस आहे सध्या
माधुरी, विश्व हिंदू
माधुरी,
विश्व हिंदू परिषदेच्या पुण्यातल्या हेल्पलाईनला फोन करून बघता येईल. 020 -66803300 / 07588682181.
मला ईमेलद्वारे माहिती(नाव, फोटो, कुठे होते वगैरे) कळवली तर तिथे सध्या प्रत्यक्ष काम करत असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवता येईल.
मला कपडे पाठवायचे आहेत मी
मला कपडे पाठवायचे आहेत मी नागपूरमध्ये राहाते. पुण्याच्या मैत्रीला फोन केला पण उशीर झाला होता.
Pages