त्या वळणावर...

Submitted by मी मुक्ता.. on 20 June, 2013 - 10:11

सरगम अडली, त्या वळणावर..
वीणा रुसली, त्या वळणावर..

ओढ कशाची, ओढुन नेते?
स्वप्ने फुलली, त्या वळणावर..

मोहवणारी विषवेलींची
नक्षी सजली, त्या वळणावर..

तू ही गर्दीमधला झाला,
मैत्री हरली, त्या वळणावर..

तार्‍यांवाचुन कोरी रजनी,
हिरमुसलेली, त्या वळणावर..

तू जाताना वळला नाही,
वळणे चुकली, त्या वळणावर..

http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसे सर्वच शेर मस्त आहेत
काही जागी रदीफ चपखल नाही वाटली
काही शेरात मला व्यक्तिशः काही तुरळक बदल अपेक्षित होते ज्यामुळे मला व्यक्तिशः ते शेर जास्त भावले असते

हिरमुसलेली = अलामत ???

असो
छान गझल आवडली

मुक्ता,
क्या बात है! Happy मला सगळ्याच ओळी आवडल्या, पण वेगवेगळ्या करून. म्हणजे अशी gracefully वाहणारी नाही वाटली ही गझल (तुम्ही वाईट वाटून घेणार नाहीत असं गृहीत धरूनच सांगतेय बरं मी हे).
तसे, काव्यामध्ये काय आधी आणि काय नंतर यावे याचे काही नियम नसतात. त्यात सुरवात आणि शेवट कुठेही असू शकतो किंवा नसूही शकतो. एका कवितेला एक तहान पुरेशी! Happy

छान

तू ही गर्दीमधला झाला,
मैत्री हरली, त्या वळणावर..
.
तू जाताना वळला नाही,
वळणे चुकली, त्या वळणावर..

सुरेख. पुलेशू.