घसरता रुपया

Submitted by विजय देशमुख on 20 June, 2013 - 00:25

गेल्या काही दिवसात रुपयात प्रचंड घसरण चालु आहे. आज डॉलरमागे ५९.९४ रुपये असा भाव आहे. युपीए सरकारच्या स्थपनेच्यावेळी हाच भाव ३४ रुपयांच्या आसपास होता. रुपया घसरण्यामागे नेमकं कारण काय आहे? रुपया घसरला म्हणुन महागाई वाढलीय (कारण प्रेट्रोल साठि द्यावी लागणारी जास्त रक्कम). खुद्द पंतप्रधान अर्थतज्ञ्य असुनही अशी वेळ का येतेय?

याचा पुढचा टप्पा म्हणजे आर्थिक दिवाळखोरी किंवा आर्थिक संकट आहे का?

की पैसा असुनही तो योग्य प्रकारे वापरल्या जात नाही आहे.

मला अर्थशास्त्रातलं काहीही कळत नाही, त्यामुळे कोणी सोप्या शब्दात सांगीतल तर बरं होईल.

बहुदा १९४७ मध्ये १ डॉलर = १ रुपया असा दर निश्चित केला होता, पण जागतिक बँकेकडुन कर्ज घेण्यासाठी रुपयाचं अवमुल्यन करावं अशी अट होती असं बहुदा राजीव दिक्षीत यांच्या व्याख्यानात ऐकलं होतं, हे खरय का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) रुपयाच नव्हे तर जगातील बहुतेक चलने डॉलरच्या तुलनेत घसरत आहेत. खरं तर डॉलरचा भाव वाढतो आहे.
२) रुपयाचे अवमूल्यन झाले म्हणजे देशाची मान खाली गेली इतके सोपे समीकरण नाही.
३) याचा अर्थ याचे दुष्परिणाम नाहीतच असा मात्र नाही.

मयेकर, कृपया थोडे अधिक लिहावेत. यातील खरच काही समजत नाही. मूळ चर्चाप्रस्तावात तीन चार प्रश्न आहेत, त्यांची कृपया उत्तरे कळवावीत. धन्यवाद.

(उपयुक्त धागा)

अ भि जि त,

धन्यवाद लेखाबद्दल. उपयुक्त माहिती मिळाली. म्हणजे एक प्रकारे कोळसा गैरव्यवहार हाही याच्या मुळाशी आहेच.

घसरला रुपया तर निर्यात वाढेल. शिवाय रुपयाचा भाव घसरला तर उलट आय टी कंपन्यांचा धंदा वाढेलच. कारण भारतीय लोकांच्या कामाचा दर्जा उत्तमच राहील. थोडा आणखी स्वस्त झाला तर बरेच.

आता आयात महाग होईल. त्यासाठी पेप्सी, कोका कोला, के एफ सी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड बंद करा. जकात वाढवा, परिस्थिती सुधारेपर्यंत.

लष्करा साठी अद्ययावत सामग्री लागते. ती घेण्यासाठी डॉलरच लागतात. परदेशी चलनाची पुंजी कमी झाली तर रुपये देवून डॉलर विकत घ्यावे लागतात, मग रुपयाचा भाव घसरतो.

तर ही परकीय चलनाची पुंजी कमी का झाली? कुठे वेड्या वाकड्या , अनावश्यक खरेदीसाठी वापरली जाते आहे का? निर्यात कमी का झाली?

चाळीस वर्षांपूर्वी मी एका मोठ्या प्रमाणावर आयात करणार्‍या अमेरिकन कंपनीत काम करत होतो. तिथे मी विचारले तुमी भारतातून का माल आणत नाही? चांगला असतो, विशेषतः चामड्याचे बूट वगैरे. तेंव्हा मला सांगण्यात नि दाखवण्यात आले की जेव्हढा माल ज्या वेळी मागितला नि भारताने देऊ असे सांगितले त्या वेळी त्याच्या अर्धा माल देखील आला नाही, नि जो आला त्यात भेसळ. उदा. बाटाच्या चामडी बुटात पुठ्ठा वगैरे. पण आता ही परिस्थिती नक्कीच सुधारली असणार. भारतात आयसो ९००० वगैरेचे अनेक तज्ञ आहेत, भारतात विमाने व मोटारी बनतात. तर आता निर्यात जोरात वाढायला पाहिजे.

माझे एक दोन मित्र लहान यंत्रसामग्री, नि किरकोळ गोष्टी भारताऊन आयात करण्याचा धंदा करतात, पण त्यांचे मत आजहि भारताविषयी चांगले नाही. अजूनहि ठरल्या वेळी, ठरला असेल तेव्हढा माल येत नाही. भाव बदलतात, करार केलेले धुडकावून लावतात. शेवटी बिचारे कोरिया, चीनकडे वळले!

माझी खात्री आहे, बॉलिवूड नि क्रिकेट मधून भारताला मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन मिळत असणार. ते तर जोरात आहेत.

मग असे का?

कारण चीनसुद्धा जाणून बुजून स्वतःच्या चलनाचा भाव रीत्या कमी करतो, निर्यात करण्यास उत्तेजन म्हणून. भारतहि तसेच करत असेल. त्यात गैर काय?

भारतात कोण दररोज डॉलर विकत घेणार आहे? वाढला भाव तर बिघडले कुठे? चैनीसाठी जे उगीचच डॉलर विकत घेऊन येतात ते येऊ शकणार नाहीत एव्हढेच.

भारत ८०% तेल आणी ५०% हुन जास्त gas आयात करतो. म्हणुन रुपया घसरला तर सरकारचे गणित चुकते.

ईघन ही चैन नसुन गरज आहे.

महागाई कमी करायला रुपया हा strong असला पाहिजे.

ह्यावर एकच उपाय म्हणजे वित्तिय तुट कमी ठेवणे.

कॉग्रेस ला हे ५० वर्षात जमले नाही. BJP नी ५ वर्ष तुट कमी ठेवली होती तेव्हा रुपया strong झाला होता.

आणि आता तर अजुन गॅसचे दर वाढवुन देणार आहेत आणि तेही डॉलरमध्ये... सरकार काँग्रेस चालवतय की रिलायन्स ???
संदर्भ :- http://www.loksatta.com/sampadkiya-news/replace-of-company-rule-142190/

आणि हे ही वाचनिय :- http://www.loksatta.com/vishesh-news/why-rupee-falls-causes-and-conseque...

येथील देशभक्तांजवळील काळा पैसा स्वीस बँकेत ठेवतांना डॉलर खरेदी करूनच ठेवावा लागत असणार. मागणी वाढल्यामुळे डॉलरचे भाव चढून रुपयाचे कमी होणार. या देशभक्तांची अधिकृत यादी जर्मन सरकारकडे आहे आणि ती इतर देशांनाही देण्यास ते तयार आहे. त्याची अनधिकृत यादी तर तपशीलवार आधीच जाहीर झालेली आहे. ते डॉलर आणले तर महागाई खूप घटेल.
सध्या ते देशभक्तच इथे सत्तेवर असल्याने डोलरचा भाव वाढला तर त्यांचा फायदाच आहे. त्यांना तेवढ्याच पैशात तिकडे जाऊन अधिक चैन करता येते.
त्यामुळे त्यांना हाकलल्याशिवाय तो पैसा इकडे येणार नाही. आणि रुपया वर जाणार नाही.

हे वाचनियच
http://www.loksatta.com/sampadkiya-news/strict-policy-require-in-order-t...

सरकार कधी जागे होणार देव जाणे. आता डिसेंबरपासुन 'अन्नसुरक्षा योजना' सुरु होणार म्हणे. म्हणजे डॉलर (आणि पेट्रोल) १०० वर जाईल की काय?

अभिजित, लेख चांगला आहे, पण दिलेले बरेचसे आकडे घोटाळ्याचे आहेत. हा कायदा आणि ती योजना लागू करण्यासाठी पैशाची आधी तरतुद केली आहे, असे दिसत नाही, हा मुख्य प्रश्न आहे. अर्थव्यवस्था ढासळत असतानाच ही घाई का? गेले ९ वर्ष सिंग सरकारला हे का सुचले नाही? ही योजना ज्या राज्यात लागू केली आहे, तिथे त्यासाठी आर्थिक तरतुद कशी केली गेली हे वाचणे खरोखर आवश्यक आहे. रेशनवर कोणाला आणि किती व कश्या गुणवत्तेचे धान्य मिळते, ते वेगळेच.

सरकारचे काम सर्वांना केवळ धान्य देणे नाही तर आर्थिक सबलता प्राप्त करुन देणे आहे, जेणेकरुन अश्या योजना राबवण्याची गरजच पडणार नाही. १ रुपये तांदूळ किंवा २ रु. गहू जरी मिळाले, तरी इंधन आणि भाजी विकत घ्यायला लागणारे पैसे कुठुन येणार? त्यासाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी (प्रत्यक्ष रोजगार / सरकारी नोकरी/ सरकारी रोजगार योजना नव्हे) निर्माण करणे, हे सरकारचे काम आहे, हा मुळ मुद्दा अत्यंत दुर्लक्षित केल्या जातोय, हे दुर्दैव आहे.

विजय देशमुख | 31 July, 2013 - 10:39नवीन
अधिकाधिक रोजगाराच्या संधी (प्रत्यक्ष रोजगार / सरकारी नोकरी/ सरकारी रोजगार योजना नव्हे) निर्माण करणे, हे सरकारचे काम आहे, हा मुळ मुद्दा अत्यंत दुर्लक्षित केल्या जातोय, हे दुर्दैव आहे.
<<
+१

तर सुब्बाराव चाललेत! (कि घालवलेत?)
चिदुसरांचे ऐकले नाहिच अन स्व॑तःचा हेका सोडला नाही!
पैसे वाटून टाकून (स्वत;ला अन थोडेफार - नांवापुर्ते- सो कॉल्ड- योजनांन्ना) दिवाळे काढा म्हणावं!

अन आम जनताही 'सोन्याची संधी' सोडयला तयार नाही!

देव कल्याण करो भारताचे!

२००८ च्या मंदी नंतर अमेरीकेने प्रत्येक वर्षी काही दशलक्ष डॉलर्स छापलेत आणि योग्य यंत्रयेद्वारे बाजारात पोहजवले...जसे की स्थानीक बँकांना हा पैसा पूरवला, आणि या बॅकांनी लोकांन पर्यंन्त ते ही अगदी कमी व्याजदरात.

लोकांच्या हाती पैसा आल्याने मार्केट कंट्रोल मध्ये राहीले, गूंतवणूकीत घट नाही झाली. आता त्याच्या कडे बराच पैसा झालाय, त्याकारणामूळे डॉलर ईतर चलनांच्या तूलनेत मजबूत झालाय.

२०१३ मध्ये त्यानी पैसे छापले नाहियेत, शेवटचे सप्टेंबर २०१२ मध्ये छापले होते.

अन आज ६४ रुपयांवर डॉलर पोहचला. सोबतच जर्मनीच्या Deutsche Bank ने रुपया आणखी खाली म्हणजे ३ महिन्यात ७० रुपयांच्या वर जाईल

म्हणजे अमेरिकेसारखी आपली परिस्थिती (स्लोडाऊन आणी मंदी) येइल का? म्हणजे ते जात्यात अन आपण सुपात होतो म्हणायच तर ...

मंदी यायची राहिलीय का? औद्योगिक उत्पादनाचे आकडे कितीक महिने घटताहेत. शून्याच्या खाली जाऊन आलेला आहे.

माझी ऐकीव माहिती -
१. आर्थिक मंदी आली असताना अमेरिकेतील वित्तीय संस्थानी अधिक नफा होण्यासाठी अमेरिकेत पैसे न गुंतवता Emerging Economies मध्ये गुंतवले. उदा. BRIC आणि south east asia.
2. जरा आर्थिक परिस्थिती सुधरते आहे हे लक्षात येता हा पैसा काढून घेण्यात येत आहे.
३. या पैशाच्या जोरावर आणि इतक्यात अमेरिकेची आर्थिक घडी बसत नाही या भरवशावर सगळ्या देशानी आपापल्या तरतुदी केल्या. त्या बोंबलत आहेत.
४. बाजाराचा विश्वास संपादन करायला सरकार ची जी credibility लागते ती मनमोहन सरकारने गमावली आहे. कारण - अगणित आर्थिक घोटाळे. त्यामुळे कोणीही रुपयाला विचारिनासे झालेय.
५. २०१४ मध्ये ७५-८० आणि परिस्थिती बदलली नाही तर २०१५ पर्यंत ९० पर्यंत रुपया जाईल.

लोकहो, मला सांगा...

२००४ साली डॉलरचा भाव साधारण ४५ रु. होता.
२००४ ते २०१२ या सालांत अमेरिकेचा महागाई दर -
2012 2.1
2011 3.2
2010 1.6
2009 -0.4
2008 3.8
2007 2.8
2006 3.2
2005 3.4
2004 2.7
म्हणजे २००४ ते २०१२ या कालावधीत अमेरिकेत महागाई २५% वाढली. (करा गुणाकार)
म्हणजेच आजच्या एका डॉलरची किंमत २००४ च्या डॉलरच्या ०.८ एवढी झाली.

भारतातला याच काळातला महागाई दर -
2012 11.17
2011 6.49
2010 9.47
2009 14.97
2008 9.7
2007 5.51
2006 6.53
2005 5.57
2004 3.78
म्हणजे भारतातली महागाई एवढ्या काळात १०१% एवढी वाढली.
म्हणजे आजचा एक रुपया २००४ सालच्या रुपयाच्या अर्ध्या किमतीचा झाला.

म्हणजे आजच्या १ डॉलरची आजच्या रुपयात किंमत ४५ * २.०१ / १.२५ = ७२ रुपये असायला हवी.
(एक्सचेंज रेट अर्थात महागाईवर अवलंबून नसतो, त्यात पूर्णतयः वेगळे फॅक्टर्स असतात हे मान्य, तरीही)

मग एवढा आरडाओरडा कशाला? तसं पहायला गेलं तर रुपयाचं कोसळणं ही केवळ एक करेक्शन आहे, जी केव्हाना-केव्हा होणारच होती, नाही का?

रुपयाचे अवमूल्यन झाले म्हणजे देशाची मान खाली गेली इतके सोपे समीकरण नाही.>>>> +१ मयेकर.

(एक्सचेंज रेट अर्थात महागाईवर अवलंबून नसतो, त्यात पूर्णतयः वेगळे फॅक्टर्स असतात हे मान्य, तरीही)
>>>>>> बरोबर आहे ट्वेन. मी जे काही थोडंफार वाचलं त्यावरुन मला वाटतं की भारताची एकंदरित प्रगतीचे अंदाज बांधून विदेशी गुंतवणुकदार भारतात पैसे गुंतवतात. मागच्या काही वर्षात भारत सरकाराला चलनवाढ तितकीशी रोखता आली नाही (त्याची वेगळी कारणे, उदाहरणार्थ उत्पादनाच्या तुलनेत खाणारी तोंड जास्त वगैरे). ह्याच बरोबर सध्या अमेरिकेवरच (अमेरिकन आणि बाहेरचे गुंतवणुकदार दोघांचा) गुंतवणुकदारांचा भरवसा वाढला आहे. आता हा भरोसा परत अमेरिकेतल्या फेडरल रिजर्व नी चालवलेल्या क्वांटिटेटिव इजिंग उपक्रमामुळे असावा. भरवसा वाढल्यामुळे परदेशी गुंतवणुकदार भराभर त्यांचे पोर्टफोलियो रिबॅलन्स करत असावेत म्हणजे भारतातली गुंतवणूक काढून अमेरिकेत गुंतवणूक करत असावेत. थोडक्यात रुपयाची डिमांड कमी होते (भारतात पैसे गुंतवायला डॉलर रुपयात कनवर्ट करावा लागतो आणि त्यामुळे रुपयाची डिमांड वाढून रुपया वधारतो). हे एक कारण आहे रुपयाचा भाव डॉ च्या तुलनेत घसरण्याचे. ह्या बरोबरच नेहमीचे एक्सपोर्ट पेक्षा इम्पोर्ट जास्त हा मुद्दाही आहेच.

माझ्या मते हा उपक्रम एकदा थांबवला की आणि मुख्य म्हणजे त्यानंतर काही दिवसांनी/महिन्यांनी कळेल की अमेरिकेला ही प्रगती टिकवता येइल की नाही. हा उपक्रम नेमका काय आहे तो एक वेगळा विषय आहे. बाकी जॉर्ज सोरोस वगैरे बड्या इन्वेस्टर नी आताच डॉलरच्या विरोधात मोठी बेट लावली आहे असंही वाचलं. सोरोस करन्सी वर बेट करतो, गुगल मारुन बघा. रंजक माहिती आहे त्याच्या ब्रिटिश पाऊंडच्या बेट बद्दल.

मार्क ट्वेन, 'correction' मी ऐकले होते. calculation बघून थोडे कळले असे वाट्टे.
फक्त हे calculation बरोबर आहे की नाही हे पडताळून पहायला १० वर्षे मागे जाऊन, १९९४-२००४ हा काळ घेऊन २००४ ला १ डॉलर = ४५ रुपये होता का ते बघता येइल का?

आता चांगला रेट मिळतोय म्हणुन परदेशी असलेल्या भारतीयानी पैसे भारतात नातेवाइकाना पाठवले तर रुपयाच मुल्य वाढेल का?
लैच बाळबोध आहे पण अशी शन्का आहेच.
शिवाय छोटी रक्कम (इकडे मिळणारे डॉलर) मोठी रक्कम (काढुन घेत असलेले डॉलर) हा फरक असेल हे मान्य.
पण हे समीकरण इतक सोप आहे की ह्यात अजुन काही फॅक्टर आहेत ह्यासाठी हा प्रश्न..

भरत मयेकर खूपच कमी शब्दांत..

मला आलेली एक मेल फक्त डकवतोय.

How can we help our Rupee -

MUST READ!!!!!!!!!

In 1970 1$ = Rs. 4.00 and Today 1$ = Rs. 61.50
Estimated 1$ by end of the year = Rs. 70.00. Dollar is not getting stronger but rupee is getting weaker & nobody else is responsible except us!

How can we change it?

1. A Cold Drink produced for 70-80 paisa sold at Rs. 9.00 to Rs.10.00
Stop drinking them; go to soda shops & drink lemon juice, lassi etc. instead of coke, pepsi, limca

2. Soaps: Use Soaps of cinthol, santoor, medimix, neem instead of lux,lifebuoy,rexona,liril,dove,pears,hamam,lesancy,camay,palmotive!

3. Toothpaste:Use Neem, babool, vicco, dabur, promise instead of colgate,close up,pepsodent,cibaca

4. Toothbrush:Use prudent,ajanta,promise instead of colgate, close up, oral-b,pepsodent,forhans

5. Shaving cream:Use godrej ,emami, vjohn Instead of palmotive,old spice,gillete.

6. Blade:Use supermax,topaz,laser,ashoka Instead of seven-o-clock,365,gillete

7. Talcum powder:Use santoor,gokul,cinthol,boroplus Instead of ponds,old spice,johnson,shower to shower.

8. Milk powder:Use indiana ,amul,amulya' verka Instead of anikspray,milkana, everyday milk, milkmaid

9. Shampoo:Use Nirma, Velvette Instead of halo, all clear,nyle sunsilk,head and shoulders, pantene

10. Mobile connections: Use bsnl,airtel,reliance Insteaf of vodafone, docomo

11. Food:Eat at jay bhavani, TGB, local restaurants Instead of macdonld, subway, pizza hut, kfc

12. Mobile :Use micromax, karbonn,virgin Instead of samsung,apple, htc, sony, nokia

13. Bikes:Use hero, royal enfield Instead of honda, yamaha

14. Footwear:Use bata, Instead of nike, reebok,adidas,converse

15. Jeans and shirts:Use spykar, k-lounge Instead of lee,levi's, U.s. Polo, pepe, benetton

16. Watch:Use titan, sonata ,fasttrack Instead of tommy, Citizen,zodiac,tissot

Don't use items from Hindustan Liver or Uniliver. It is a foreign company.

And we blame politicians ?????????????? Why?????????

Now go and check the things you use and ask yourself how much you do contribute to the decreased value of RUPEE

None of the Indian products are subordinate in quality; they might look a bit less fancy!!

Why is china so ahead, because the whole world uses made in china items.

We Indians could at least use made in Indian items!

Change comes from within! Start the change by simply changing your daily uses by using Indian make items.

Dear friends, pls forward this message to all.
If 10% of total population of India starts using Indian make items the. Result will be: 1$ = Rs.40.00 within a year.

हे माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. यातल्या बर्‍याच कंपन्या बहुराष्ट्रीय आहेत, किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतीय सब्सिडियरीज आहेत. त्यांच्या मालकीत भारतीयांचाही वाटा आहे. उत्पादन भारतातच होत असावे. कंपन्यांनी कमवलेल्या नफ्याचा काही भाग परदेशात जात असेल, इतकेच.

संपूर्ण भारतीय बनावटीचीच उत्पादने वापरा म्हटले तर एक वेळ समजून घेता येईल. आयातीत इलेकट्रॉनिक उपकरणे, चारचाकी,दुचाकी वाहने न वापरता भारतीय बनावटीची उत्पादने वापरली तर आयात कमी होईल.

शेवटचं वाक्य केवळ विनोदी आहे. इज ऑल धिस कमिंग फ्रॉम रामदेव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स?
काही दिवसांपूर्वी व्हिक्स व्हेपोरब वापरू नका..त्यात विषारी द्रव्ये असतात, आणि वर कंपनी विदेशी असा मेसेज दिसला होता.

Pages