ग्राहकांचे हितगुज

Submitted by स्वरुप on 19 June, 2013 - 13:45

ग्राहक.... कधी कधी राजा असतो तर कधी जगातला सगळ्यात बिचारा प्राणी!
ही भुमिका जगताना बर्‍याचदा आपल्याला एखाद्याची सेवा भावते, सचोटी भावते, गुणवत्ता भावते आणि आलेला हा अनुभव चारचौघांबरोबर शेअर करावासा वाटतो.... एका अर्थाने त्याच्या सेवेला दिलेली ती पावती असते Happy
तर कधीकधी एखाद्या ठिकाणी आपली फसवणूक होते, वाईट वागणूक मिळते किंवा दर्जाशी तडजोड करावी लागते.... आणि वाटते की हे दुसर्‍या कुणाच्या वाट्याला येउ नये.... पण मग आपल्याला झेपेल तेव्हढा निषेध करुन आपण गप्प बसतो Sad

या दोन्ही गोष्टी व्यक्त करता याव्यात आणि ग्राहक म्हणून स्वताचे आणि इतरांचे हित जपता यावे म्हणून ही जागा... हा धागा!

सेवा... मग ती कोणतीही असु दे... एखाद्या रिसॉर्टचा/हॉटेलचा बरा-वाईट अनुभव, एखाद्या मॉल/शोरुम मध्ये झालेली फसवणूक, एखाद्या बँकेचा आलेला चांगला अनुभव, एखाद्या एजन्सीने केलेली अडवणूक, मोबाईल्/इंटरनेट पुरवणार्‍या कंपन्यांची सेवा, मंगल कार्यालयांचे अभिप्राय इथपासून अगदी चांगला किराणा देणारे दुकान, भला रिक्षावाला किंवा बर्‍यावाईट सुतार्-प्लंबरपर्यंत काहीही!

ग्राहकराजा.... राजा हो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रथम मला आलेला एक चांगला अनुभव:
आमच्या जुन्या सीडी१०० च्या पेट्रोल टाकीतुन एकदा पेट्रोल झिरपायला लागले होते.... बारीकसा गंज चढला होता...२-४ गॅरेजवाल्यांनी सरळ टाकी बदलायचा सल्ला दिला होता... शोरुमवाल्यांनी पण तोच एकमेव पर्याय सुचवला होता... मग सहज म्हणून मी गाडी सहकारनगर मधल्या सहजीवन गणपती मंदीराच्या इथल्या नितिन नावाच्या एका गॅरेजवाल्याला दाखवली आणि त्याने चक्क काही शे रुपयात टाकीला आतुन कोटींग करुन दिले... आणि ते व्यवस्थित टिकले

अशीच काही वर्षापुर्वी माझी बाईक चालता चालता सीझ झालेली.... जागेवर बंद!
पुण्यातल्या बर्‍याच गॅरेजवाल्यांना दाखवल्यावर १० ते १२ हजारावर खर्च सांगण्यापासून आता ही काय दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नका... सरळ आहे अशी येईल त्या भावाला विकुन टाका पर्यंत अनेक सल्ले मिळाले.... नितिनचे गॅरेज काही कारणाने बंद असल्याने आणि गाडी लवकरात लवकर चालू स्थितीत आणायची असल्याने खुप गॅरेजवाले ट्राय केले पण एकाने ही १० हजाराच्या आत खर्च सांगितला नाही
मग शेवटी वाट बघितली आणि नितीन गावाहुन आल्यावर त्याला गाडी दाखवली.... त्याने काय काय खराब झालेय... काय काय बदलणे मस्ट आहे हे सर्व सविस्तर समजावुन सांगुन फक्त ५ हजारात गाडी टकाटक करुन दिली... आणि पुढे १-२ वर्षे मी वापरुन विकेपर्यंत काहीही प्रॉब्लेम आला नाही

सहकारनगर सोडूनही आता बरीच वर्षे झाली .... आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या किंवा आमच्या घरातल्या कुणाच्याही बाईकला काहीही मेजर तक्रार आली तर सरळ सहकारनगर गाठतो

लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेउन नफेखोरी करणारे अनेक गॅरेजवाले बघितल्यावर तर हा गॅरेजवाला फारच भावतो Happy

दोन वर्षापुर्वी गोव्याहुन पुण्याला येताना पाउलो ट्रॅव्हल्सचा खुप वाईट अनुभव आला.... जाताना नीताने प्रवास अगदी आरामशीर झाला पण येताना आमच्या वेळेत नीताची बस नसल्याने पाउलोचे बुकींग केले.
वाईट कंडीशनमधली बस, अतिशय उर्मट स्टाफ, अस्वच्छ ठिकाणी घेतलेले हॉल्ट, बेळगावसारख्या ठिकाणी अर्धा तास सांगून जवळजवळ दोन्-अडीच तास अकारण घेतलेला हॉल्ट आणि विचारायला गेल्यावर दिलेली उडवाउडवीची उत्तरे.... अतिशय वैतागवाणा अनुभव!

उतरताना ड्रायव्हर आणि हेल्परला व्यवस्थित सुनावले शिवाय पाऊलोच्या साईटवर रीतसर तक्रार पण केली पण काही उत्तर आले नाही.... बहुतेक हे त्यांच्यासाठी नेहमीचेच असावे

इतर मित्रांकडून पण पाउलो ट्रॅव्हल्सबद्दल असेच अनेक वाईट अनुभव ऐकायला मिळाले.

अगदीच निरुपाय झाल्याशिवाय पाउलोचे बुकींग करु नका हा अनुभवाचा सल्ला!

स्वरुप, कल्पना चांगलीच आहे. पण या विषयांवर हे खालील धागे आधीच आहेत.

आपण आग्रही ग्राहक : http://www.maayboli.com/node/22818
पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स : http://www.maayboli.com/node/25658
पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल. : http://www.maayboli.com/node/16690