प्रतिशोध ......

Submitted by आनंद पेंढारकर on 19 June, 2013 - 13:22

एकलेपणाची दरेक वाट
प्रेमाच्या रस्त्याला कां मिळत गेली ?
जाता जाता एक तार
सूरांशी कुणाच्या कां जुळत गेली ?
नियम फसवण्याचा अलिखित
प्रत्येक प्रिया कां पाळत गेली ?

कोण हे प्राक्तन
झोळीत माझ्या टाकून गेलं ?
कोण शाप प्रेमभंगाचा
चेहऱ्याला माझ्या माखून गेलं ?

मीच घेतोय माझ्या
भोगांचा अविरत शोध ?
की एखाद्या अनोळखी हाताचा
गेल्या जन्मीचा आहे हा प्रतिशोध ?

आनंद पेंढारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users