भाउराया

Submitted by shriya.keskar on 14 June, 2013 - 05:50

वार्‍यापावसाचे दिस

पुन्हांदा एकदा आले

तेच सारे रोमांच

समद्याना देऊन गेले.....!

बळीराजा आनंदला

पाहुंनी कोवळी पिके

भरणार आहे नव्याने

घराघरातील शिके.......!

बायबापड्या लाजल्या

पाहून चिंब सरींना

पावसालाही जोर आला

पुन्हांदा भिजवाया त्यांना......!

अशीच देवाची माया

अशीच किरपा राहो

दरसाली हा भाउराया

माझया अंगणी येवो......!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy