या ऑडिओ कॅसेटच काय करायच?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 June, 2013 - 00:46

माझ्याकडे बर्‍याच वर्षांच्या साचलेल्या ऑडिओ कॅसेट आहेत. गाणी वैचारिक भाषण कथाकथन भजन वगैरे...
आता माझ्याकडे सक्षम ऑडिओ कॅसेट प्लेअर पण नाही जो आहे त्यात कॅसेट अडकतात. मी ४-५ वर्षांत कॅसेट प्लेअरवर कॅसेट ऐकल्याचे आठवत नाही. आता घरात प्रश्न आहे ही 'अडगळ' सरळ टाकून द्यायची. याच गोष्टी आता सीडी एम्पी ३ मधे तसेच इंटरनेटवर उपलब्ध आहेतच की मग किती गोश्टी जागा अडवत ठेवायाच्या असे प्रश्न पडतात. म्हटल बाकी लोकांनाही असे प्रश्न पडत असतीलच की मग ते काय करतात?
हाच प्रश्न मला जुनी जुनी मासिक पुस्तक यांच्या बाबत पडतो.धूळ खात माळ्यवर पडलीत. त्या त्यावेळी ते संदर्भ म्हणून वापरलेले असतात. आवरायला घेतल की काही सुधरत नाही काय करायच ते?....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉल द भंगारवाला इन युअर गल्ली. ही विल टेक सगळे आणि वर पैशे देइल. त्याची भेळ खाउया.

प्रभाकर पाध्ये यांचे तोकोनोमा पुस्तक असेल तर मी घ्यायला तयार आहे. बोरकर, गदिमा , केशवसुत पण. हंस, नवल चे जुने दिवाळी अंक देखील.

जपून ठेवा.

आजच बिनतारी सेवा बंद होत असल्याची घोषणा ऐकली. पण पर्याय म्हणून अल्प प्रमाणात जुनं तंत्रज्ञान असू द्यावं. एकदम मोडीत काढलं जाऊ नये. आपत्ती व्यवस्थापन किंवा अशा अन्य काळात काय कामाला येईल सांगता येत नाही.

>>> म्हटल बाकी लोकांनाही असे प्रश्न पडत असतीलच की मग ते काय करतात? <<<
माझ्याकडेही खुप क्यासेट होत्या. नन्तर त्या वापरेनाशा झाल्या, पावसाच्या ओलीने भिजल्या वगैरे झाल्यावर आतल्या फिल्मचा चक्क लिम्बीच्या शेतावर ताणून बान्धायला उपयोग केला, वार्‍याने विशिष्ट आवाज येतो त्याला घाबरुन रानडुकरे फिरकत नाहीत.
त्या तशा वाया जाताना बघुन भारी दु:ख झाले होते, अजुनही वाईट वाटते. पण आख्ख जगच नश्वर आहे, तिथे क्यासेटची काय तमा?

पुस्तके मात्र जिवापाड जपायचा प्रयत्न करा. तुम्हाला नसली तरी पुढल्या पिढ्यान्ना कदाचित उपयोगी पडतील्/ते उपयोग करुन घेतिल. डिजिटल साठ्याचे काही खरे नाही. पुस्तके हवितच.

अगदी कै नै, तरी अ‍ॅन्टीक पीस म्हणून ठेवा जपुन! अजुन दहावीस वर्षात त्यालाही भाव येईल!
पण अ‍ॅन्टीक पीस म्हणून जपुन ठेवण्याकरता तुमच्या कुन्डलीत शनि शुभसंबंधित असावा लागतो, त्या ऐवजी शुक्र शुभसंबंधित असेल, अन शनि निर्बली असेल, तर माणूस भन्गारवाल्यालाच बोलावतो! Proud
काये ना, की शनिला जुन्यापान्यात रमायला आवडतं, अन तस तर इतिहास / भूतकाळ देखिल जुनापानाच अस्तो ना? तर तमाम इतिहाससंशोधक/पुराणवस्तुसंग्राहक/उत्खननकर्ते वगैरेन्चा शनि बलिष्ठ अस्तो व बहुधा गुरूच्या प्रभावात असतो! गुरुच्या प्रभावात नसेल, तर मात्र अशा व्यक्ति इतिहास संशोधना ऐवजी घराण्याच्या सूडकथा/दु:खे चघळीत बसतील, पुराणवस्तुसंग्राहका ऐवजी आयुष्यात सर्वच काही "सेकण्डह्याण्ड" मिळेल, अन उत्खननकर्ते वगैरे ऐवजी, कुठे तरी मसणात/ खाणीत/ एक्कलकोन्ड्या जागी वगैरे काम करत रहातील. असो.
तुमच्या शनि गुरु वगैरेच्या प्रभावाप्रमाणेच तुम्ही काय ते कराल! पण तुम्ही इतक्या छोट्याबाबतीतही चक्क एक धागा काढून सल्लाबिल्ला विचारताय म्हणजे खात्रीने सान्गता येते की तुमचा रवि तुलनेत कमसर प्रतीचा असू शकेल, बुधाचे मात्र सान्गता येत नाही, भारीच फसवा ग्रह!

जर खुपच दुर्मिळ कॅसेट असतील तर त्या MP3 मध्ये convert करुन एखाद्या CD / Hard drive मध्ये सेव करुन ठेवा.

पुस्तके स्कॅन करुन डिजीटल रुपात सेव करुन ठेवा.

वरील खरच निरुपयोगी असतील तर भंगारमध्ये देण उत्तम, मला सुध्दा कित्येकवेळा पसारा आवराना असेच वाटते की पुस्तके राहु द्यावी कामा येतील. पण पुन्हा धुळ खात पडतात. शेवटी मागील काही महिन्यात एकदाची रद्दीत दिलीत. महत्वाची सोडुन ( बाकी घरात तर अनेक निरुपयोगी वस्तु असतात पण मन ते त्या बस्तु बाहेर काढायला कचरतेच)

प्रश्न छानच उपस्थित केलाय आणि सर्वांचेच प्रतिसाद आणि विचार आवडले .खासकरून 'limbutimbu' यांनी ज्योतिषाच्या अंगानेही त्याचे दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे .

कॅसेट हा इलेक्ट्रॉनिक कचरा आहे. भंगारात देऊ नका प्लीज. रिसायकल करायला द्या! इलेक्ट्रॉनिक कचरा वेळोवेळी शहराच्या अनेक भागातून उचलला जातो. अनेक ऑफिसेसमध्येही जमा करण्याची सोय असते. लक्ष द्यायला लागते, इतकंच.

गुग्लून पहा. इलेक्ट्रॉनिक गारबेज गोळा करून बिझनेस करणारे लोक आहेत, त्याना नेऊन द्या. भंगारात नका देऊ.

मला वाटते असा धागा आधी येऊन गेलाय

क्यासेटमधे दुर्मिळ अथवा व्यक्तिगत रेकॉर्डींग्ज (जसे, आमच्या घरी आजीच्या आवाजातल्या आरत्या. वडीलांची काही भाषणे इ. होते) असतील तर ती डिजिटाईज करून घ्या. म्हणजे सीडी/एम्पी३ वगैरे बनवून घ्या, व क्लाऊडवर टाकून ठेवा, बर्‍याच काळापर्यंत जतन होऊ शकेल.

नुसत्याच सिने/नाट्य्/शास्त्रीय संगीताच्या कॅसेट्स, ज्या डिजिटल स्वरूपात आधीच उपलब्ध आहेत असे ध्यानी आले, तर सरळ टाकून द्या.

पुस्तकांचा अनुभव असा, की यापैकी मासिके/वर्तमानपत्रे त्यातल्या एकाद दुसर्‍या लेखासाठी जपलेली असतात. यांना स्कॅन करून पीडीएफ करून टाकले, तर जागाही वाचते, अन संदर्भ चटकन सापडतातही. पुस्तके अशीच माळ्यावर पडून, ओल धरून, वा कसर लागून खराब होतात. खूप पिवळी पडलेली पाने वाचण्यासाठी हाताळताना तुटतात, अन रद्दीवाला भावही देत नाही Wink

पुस्तके सांभाळायचीच असलीत तर त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे. नसेल जमत तर सरळ लायब्ररीला देणगी म्हणून देऊन टाका. इतर लोकही वाचतील, अन पुस्तकाची काळजी घेतली जाईल.

शेवटी जड अंतःकरणाने कॅसेटना निरोप दिला. या अगोदर दोनतीन वेळा असे आवरण्याचे प्रसंग आले होते तेव्हा कचर्‍याच्या लॉट मधून परत माळ्यावर असा प्रवास झाला होता. टाकाव कि टाकू नये असा संभ्रम डोक्यात फारच वाढला म्हणुन मग धागा टाकला. पेपरातील ज्योतिषांच्या जाहिरातीची आठवण आली. 'इकडे तिकडे भटकू नका थेट आमच्याकडे या.'
मागे गावी असताना वाड्यातील तीन पिढ्यांचा कचरा अनेक टप्प्यात काढला. सॉर्टिंग करणे महा कठीण काम. प्रत्येक वस्तुंशी स्मृती जोडलेल्या. शेवटी वाडा विकला तेव्हा सुद्धा अनेक वस्तुंसकटच तो दिला. भांडाकर इन्स्टिट्युट ला पोथ्या दिल्या. वा.ल. मंजूळांना काही हस्तलिखित ऐवजाचा उपयोग झाला. असो. शेवटी आपला देहही नश्वर आहेच.
@लिंबाजीराव आमच्या स्थूल निरयन पत्रिकेत कुंभ लग्नी गुरु, चतुर्थात चंद्र, पंचमात मंगळ, षष्ठात राहू, सप्तमात हर्षल, अष्टमात रवि बुध नवमात शुक्र-नेपच्युन, द्वादशात शनि-केतु

आपली आर्थीक परिस्थीती खुपच चांगली असेल तर एक सल्ला. फिलिप्स्चा कॅसेट वरुन सीडी बनवणारा एक रेकॉर्डर मिळतो. तो घ्यावा. सगळ्या कॅसेटच्या सी डी बनवुन घ्य्व्यात.

फिलिप्सच्या बाजारात असलेल्या मॉडेल्समधली रेकॉर्डिंगची सोय काढून टाकलेली आहे. (असे विजय सेल्समध्ये सांगण्यात आले होते)