चांदणे आहे खरे की भास नुसता (तरही)

Submitted by इस्रो on 10 June, 2013 - 22:46

सावल्यांनीही दिला मज त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता

गझल म्हणजे ह्रदयबिंबच शायराचे
जुळवलेला शब्द ना शब्दास नुसता

सोड चिंता, घे भरारी, तू नव्याने
दोष का देतोस रे नशिबास नुसता

गोडवे गातो जरी आधुनिकतेचे
जुंपला माणूस हा यंत्रास नुसता

गुणगुणावी गझल एखादी जराशी
जीवनाला ना पुरेसा श्वास नुसता

शोधताना भाकरीचा चंद्र 'नाहिद'
जिंदगीचा जाहलो मी दास नुसता

- नाहिद नालबंद [९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ..

मस्त नाहिद भाई

पण एक शेर क्लीन हिट आहे.........

गुणगुणावी गझल एखादी जराशी
जीवनाला ना पुरेसा श्वास नुसता<<<< अ ह्यूज सि़क्सर !! मस्तच सर

गझल म्हणजे ह्रदयबिंबच शायराचे
जुळवलेला शब्द ना शब्दास नुसता
.
शोधताना भाकरीचा चंद्र 'नाहिद'
जिंदगीचा जाहलो मी दास नुसता

सुंदर शेर. Happy