अधिवेशनासाठी दैनीक तिकिटे आता उपलब्ध आहेत!!

Submitted by अजय on 5 June, 2013 - 13:32

daypass.jpg

नमस्कार मंडळी,

अधिवेशन आता अगदी जवळ म्हणजे एक महिन्यावर येऊन ठेपले आहे.

तुम्ही जर अजूनही अधिवेशनाला येण्याबद्दल "येऊ का नको" अशा द्विधा मनस्थितीत असलात तर मित्रमंडळींना भेटायला, सुग्रास भोजनासाठी, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी, खरेदीसाठी, शाळाकॉलेजांच्या प्रवेशांबद्दल माहितीसाठी आणि हवे असल्यास अगदी वर किंवा वधू संशोधनासाठी देखील येण्याचा विचार करा.

तुमच्यापैकी ज्यांना चार दिवस राहता येणे शक्य नाही, पण अधिवेशनाच्या काही दिवसांसाठी हजेरी लावण्याची इच्छा मात्र आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपण काही आकर्षक दैनिक तिकिटांचा (day pass) लाभ घेऊ शकता.
ह्याबद्दलची अधिक माहिती या धाग्यावर पहा : http://bmm2013.org/daypass-regn-faq

जुलै ५ ची खास आकर्षणे: न्याहारी+ दोन वेळचे जेवण, मराठी नाटक 'फॅमिली ड्रामा'; मराठी नाटक 'चाहूल' - कला, बे एरिया; 'स्वरगंगेच्या काठावरती' - फिलाडेल्फिया (मीना नेरुरकर); कवितांवर आधारित कार्यक्रम 'एक मी अन् एक तो' - किशोर कदम (सौमित्र), वैभव जोशी आणि दत्तप्रसाद रानडे; बीएमएम सारेगम २०१३.

जुलै ६ ची खास आकर्षणे: न्याहारी+ दोन वेळचे जेवण, 'संगीत मानापमान' - राहुल देशपांडे आणि इतर; 'मेलांज' - महेश काळे; 'खेळ मांडला' - प्रतीक आणि माधवी देवस्थळे (न्यू जर्सी); 'स्वरगंध' - नरेंद्र दातार (टोरांटो); विशेष कार्यक्रम: अजय-अतुल मुलाखत

जुलै ७ ची खास आकर्षणे: न्याहारी+एक वेळचे जेवण, विक्रमवीर प्रशांत दामले यांची मुलाखत - दिग्दर्शक विजय केंकरे; युवांकुर - मराठी नाट्य/चित्र/टी.व्ही.सृष्टीतले अनेक उगवते तारे

त्यामुळे आता कशाचीही वाट न पाहता ताबडतोब http://bmm2013.org/registration इथे जाऊन आजच तुमच्या कुटुंबियांची आणि मित्रमंडळींची नावनोंदणी करा

आम्ही तुमची वाट पाहतोय. महिन्याभरात प्रॉव्हिडन्सला नक्की भेटू,
बी.एम.एम. २०१३ अधिवेशन समिती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
आता नॉर्थ अमेरिकेतले कार्यक्रम कोणते कधी आहेत याची माहिती कुठे असली तर मला बापडीला लिंक द्याल काय? ओळखीच्यांनी, कुटुंबियांनी भाग घेतलाय म्हणून पहायचाय आणि त्यासाठी त्याच दिवसाचे तिकीट पाहिजे असे लोक असतील त्यांना उपयोगी पडेल.

धन्यवाद!

आत्ता पर्यंत BMM चा अनुभव पहाता, अमेरिकेतल्या कार्यक्रमाना इतर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात कोंबले जाते.. तेव्हा शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या कार्यक्रमाची वेळ तारीख नक्की नसते. कमिटी करो आणि यावर्षी असे न होवो...