Australian PR बद्दल माहिती हवी आहे

Submitted by प्रथम म्हात्रे on 4 June, 2013 - 12:29

मला recently एका consultancy कडुन असे सान्ग्ण्यात आले कि Australia मधे जॉब साठी apply करण्यासाठी PR विसा compulsory आहे आणि तो जर माझ्याकडे नसला तर मला तिथे जॉबसाठी apply करता येणार नाही.

आपल्यापैकी कोणला जर काही idea असेल तर क्रुपया शेअर करा.

Thanks in Advance...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे खरे असेल तर मला आश्चर्य वाटेल. तो तुम्हाला फसवत आहे असे तर नाही ?
कुठल्याही देशात प्रथम प्राधान्य त्या देशाच्या नागरिकाना त्या नन्तर PR ना मिळतो. पण जॉब साठी apply करण्यासाठी PR विसा compulsory असणे हे पटत नाही.

तो जर माझ्याकडे नसला तर मला तिथे जॉबसाठी apply करता येणार नाही.
----- सर्वसामान्य (सन्शोधन, व्यावसाय, नोकरी) नोकर्‍यासाठी अशी सक्ती नसावी पण फार कमी अशा जागासाठी (लष्कर, सरक्षणाशी निगडीत) असेलच.

कॅनडा, न्युझीलन्ड, अमेरिका येथे अशी सक्ती नाही मग ऑस्ट्रेलियामधे असायचे कारण काय? मला सरक्षणाशी निगडीत अशा लॅबमधे किवा उत्पादन क्षेत्रात नोकरी मिळू शकत नाही (तेथे नागरिकत्व असणे अनिवार्य आहे) आणि ते समजण्यासारखे आहे.

http://www.immi.gov.au/skilled/
येथे तुम्हाला ऑसी सरकारकडुन खात्रीलायक माहिती मिळते, सर्व पर्याय खुले आहेत. तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे.

मी ही उद्य यांच्याशी सहमत आहे. असा काही नियम नसावा. त्या कन्सल्टन्सीने तुम्हांला खोटी माहिती दिली आहे.

एखाद्या पर्टिक्युलर जॉब ऑफरसाठी अशी रिक्वायरमेन्ट असू शकते.
तुम्हाला एकंदरीतच तिथे जॉब घेण्यासाठी PR आवश्यक आहे असं सांगितलं नाही ना?

ऑस्ट्रेलियात जॉब करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पी आर व्हिसा घेणे अत्यावश्यक आहे. याला अपवाद फक्त काही प्रोफेशन्सचा उदा. डॉक्टर आहे. तसेच तुम्ही एखाद्या कंपनीमार्फत इथे काही कालावधीसाठी येणार असलात तर तुम्हाला पी आर असण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला वर्किंग व्हिसा मिळेल.
तुमचा उद्देश इथे येऊन नोकरी शोधणे असा असेल तर पी आर आवश्यक आहे. भारतात किंवा अन्यत्र राहून तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करु शकता, फोनवरुन इंटरव्ह्यु देऊ शकता. पण तुमच्याकडे पी आर असल्याशिवाय नोकरी मिळू शकत नाही. तुमचे प्रोफेशन 'डिमांड लिस्ट' मध्ये असले तरी तुमच्या एम्लॉयरला त्या स्किलचा कामगार इथे मिळत नाहीये हे प्रुव्ह करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला वर्किंग व्हिसा मिळू शकेल.
http://www.seek.com.au/ या साईटवर जाऊन बघा. तुम्हाला बर्‍याच नोकरीविषयक जाहिरातींखाली 'You must have the right to live and work in this location to apply for this job.' अशा अर्थाचे वाक्य आढळेल.
ही सर्वसाधारण माहिती झाली. पण तुम्ही जर एखाद्या विशिष्ट प्रोफेशनमध्ये असाल तर व्हिसाचे नियम वेगळे असू शकतात.
http://www.immi.gov.au/skilled/general-skilled-migration/ या साईटवर अधिकृत माहिती मिळेल.

त्या एजंटचे म्हणणे बरोबर आहे हे अशा अर्थाने की जॉबला अप्लाय करताना जरी पी आर आवश्यक नसला तरी सिलेक्शन झाल्यास जॉब करण्यासाठी पी आर असणे आवश्यक आहे. तुम्ही वरील वेबसाईट वर जाऊन माहिती वाचलीत तर लक्षात येइल की पी आर अ‍ॅप्लिकेशन ते प्रत्यक्ष व्हीसा मिळणं हा बराच मोठा कालावधी आहे. नवीन कायद्याप्रमाणे किती वेळ लागतो हे माहित नाही. पण मी जेव्हा १० वर्षांपूर्वी या प्रक्रियेमधून गेले होते तेव्हां ८-९ महिने लागले होते. अर्थात तेव्हाचे नियम, अटी जरा शिथिल होता.

सध्याचे इथले जॉब मार्केट आणि एकुण परिस्थिती बघता सर्वसाधारण जॉब्ससाठी जसे की आयटी, अकाऊंटिंग, इंजिनियरिंग इथे मनुष्यबळ उपलब्ध असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल हे नक्की. तसेच वर उदय यांनी म्हटल्याप्रमाणे काही जॉब्ज (संरक्षण, केंद्र सरकार) वगळता फक्त पी आर किंवा ऑस्ट्रेलियन नागरिक यांना इतर जॉब्जमध्ये समान संधी आहेत.

पण तुमच्याकडे पी आर असल्याशिवाय नोकरी मिळू शकत नाही. तुमचे प्रोफेशन 'डिमांड लिस्ट' मध्ये असले तरी तुमच्या एम्लॉयरला त्या स्किलचा कामगार इथे मिळत नाहीये हे प्रुव्ह करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला वर्किंग व्हिसा मिळू शकेल.
----- प्रत्येक सरकारच्या मनुष्य विकास खात्याकडे (Human Resource Development) त्या देशाला कोणत्या क्षेत्रातील व्यक्तीन्चा तुटवडा पडणार आहे याची ताजी बातमी असते.

बाहेरच्या देशामधिल नागरिकाला ऑस्ट्रॅलिया (किवा कॅनडा, न्युझीलन्ड) मधे नोकरी देण्याची प्रक्रिया तेव्हाच सुरु होते जेव्हा देशान्तर्गत जाहिरात दिल्यावरही योग्य असा उमेदवार मिळत नाही. कॅनडामधे ३ महिने, विविध ठिकाणी, जाहिरात दिल्याचा पुरावा Human Resource Develp या सरकारी खात्याला द्यावा लागतो. हे सर्व सोपस्कार केल्यावरच बाहेरच्या उमेदवाराचा नोकरी साठी विचार केला जातो. Human Resource मधे ज्यानी काम केले आहे त्यान्च्यासाठी ह्या नित्याच्या गोष्टी आहेत. जाहिरात फलकावर, वृत्तपत्रात ३ आठवडे - ३ महिने जाहिरात दिली होती असा पुरावा पुरेसा आहे... पण ह्या कटकटीशी तुम्हाला घेणे देणे नाही (तो नोकरी देत असलेल्या मालकाचा प्रश्न आहे).

कधी उमेदवार अगदी दुर्मिळ अशा क्षेत्रातला आहे आणि हातचा जायला नको अशी परिस्थिती असेल तर मागच्या तारखेच्या (back dated) जाहिराती पण काढल्या जातात... असे नेहेमीच करता येत नाही, पण सराइत व्यावसाय करणारे असे मार्ग चोखळतात.

पुन्हा नोकरी साठी PR असायलाच पाहिजे हे गरजेचे नाही. मग work visa हा प्रकार कशासाठी आहे? तुम्ही ऑस्ट्रेलिया मधे गेल्यावर काही काळ राहुन मग PR साठी अर्ज करु शकता.

वर दिलेल्या ऑसी सरकारच्या साइटवर जा आणि खरी माहिती मिळेल.

नोकरी साठी PR असायलाच पाहिजे हे गरजेचे नाही. मग work visa हा प्रकार कशासाठी आहे? तुम्ही ऑस्ट्रेलिया मधे गेल्यावर काही काळ राहुन मग PR साठी अर्ज करु शकता<< +१

जर तुम्हाला एखाद्या कंपनीने स्पॉन्सर केले आणि तुम्हाला वर्क विसा मिळाला तर तुम्हाला PR असणे आवश्यक नाही. वर्क विसा वर ऑस्ट्रेलियात आल्यावर काहि काळाने तुम्ही PR साठी अप्लाय करु शकता.

तुम्हाला ऑफर दिलिये ती कंपनी तुम्हाला स्पॉन्सर करु शकत असेल तर PR ची आवशयकता नाही. पण हा वर्क विसा असल्याने तो ठराविक मुदतकाळासाठी असेल आणि त्याच बरोबर तो रिन्यु होइल कि नाही याची खात्री तुम्हाला कंपनी देइलच असे नाही. तसेच वर्क विसावर अनेक रिस्ट्रिक्शन्स असु शकतात जसे की ओव्हरसीज ट्रॅव्हलिंग.

अजुन एक ऑप्शन म्हणजे स्किल्ड मायग्रेशन - हल्ली फारच लिमिटेड क्षेत्रात मिळते असे ऐकले आहे. इदर तुम्ही सुपर जिनिअस, सुपरस्पेशलाईज्ड आणि तुमच्या प्रोफेशन मधे हायली क्वालिफाईड, एक्स्पिरियन्स्ड असाल तर किंवा तुम्ही अश्या एखाद्या प्रोफेशन मधे आहात ज्यातिल स्किल्ड वर्कर्स ची इथे कमतरता आहे तर तुम्हाला स्किल्ड मायग्रेशनसाठी प्रायॉरिटी दिली जाइल.

तुम्ही जर एखाद्या विशिष्ट प्रोफेशनमध्ये असाल तर व्हिसाचे नियम वेगळे असू शकतात.
http://www.immi.gov.au या साईटवर अधिकृत माहिती मिळेलच.

काहि सरकारी नोकर्‍या, प्रोफेशन्स मधे ऑस्ट्रेलिअन नागरिकत्व असणे अत्यावश्यक आहे. त्यांना PR सुद्धा चालत नाही.

PR साठी अप्लाय करायचे असल्यास बर्‍याच गोष्टींची जमवाजमव, हेल्थ चेक अप्स वगैरे करावे लागतिल. यात बराच वेळ जातो. दिल्ली मधे ऑस्ट्रेलिअन हायकमिशन आहे तिथे तुम्हाला चौकशी करता येइल. http://www.india.embassy.gov.au/ndli/home.html

एजंटवर विश्वास टाकुन फसगत होण्यापेक्षा आधी ऑस्ट्रेलिअन हायकमिशन मधे किंवा मुंबई आणि चेन्नईमधे ऑस्ट्रेलिअन कॉन्स्युलेट मधे व्यवस्थित चौकशी करा.

ऑल द बेस्ट!

वत्सला PR म्हणजे Permanent Resident म्हणताय का तुम्ही ? तसं असेल तर माझे कित्येक मित्र ऑस्ट्रेलियामध्ये वर्क विसा वर काम करताहेत , विजा मिळवणं थोडसं अवघड आहे पण मिळतो.

वत्सला PR म्हणजे Permanent Resident म्हणताय का तुम्ही ? >>>> हो.
तसं असेल तर माझे कित्येक मित्र ऑस्ट्रेलियामध्ये वर्क विसा वर काम करताहेत , विजा मिळवणं थोडसं अवघड आहे पण मिळतो>>>>> बरोबर. तुमच्या मित्रांचे माहित नाही पण माझ्या परिचयातले बरेच लोक भारतातील आय टी कंपन्यांमधून इथे प्रॉजेक्टसाठी वर्क व्हिसावर आहेत. तो व्हिसा मिळणे फारसे कठीण नाही.

श्री, इथे बर्‍याच मल्टीनॅशनल कंपनीज मधे काम करणारे भारतिय शॉर्ट टर्म साठी किंवा एखाद्या प्रोजेक्ट वर काम करण्याकरता कंपनी तर्फे पाठवले जातात. यात कंपनी चे ऑस्ट्रेलिअन गव्हर्नमेंट बरोबर अ‍ॅग्रीमेंट वगैरे प्रकार असतात.

लाजो उदयच्या पोस्टमध्ये <<<पुन्हा नोकरी साठी PR असायलाच पाहिजे हे गरजेचे नाही. मग work visa हा प्रकार कशासाठी आहे? तुम्ही ऑस्ट्रेलिया मधे गेल्यावर काही काळ राहुन मग PR साठी अर्ज करु शकता.>>> असं लिहिलयं.

हो, वर्क विसा असेल तर PR ची गरज नाही. ऑब्विअसली तुम्ही वर्क विसा वर आहात त्यामुळे तुम्हाला PR ला ज्या फॅसिलिटीज, हेल्थ कव्हर, कन्सेशन्स इ इ मिळते ते मिळणार नाही. शिवाय वर्क आवर्स चे रिस्ट्रिक्शन्स इ इ अनेक रिस्ट्रिक्शन्स असु शकतात. वर्क विसावर असाल तर तुम्हाला नोकरी बदलता येणार नाही कारण तुम्हाला ज्या कंपनीने स्पॉन्सर केले आहे त्यांच्या टर्म्स वरच नाचावे लागेल.

PR मिळाल्यावर तुम्हाला नोकरी वर बंधन नाही. तुम्ही नोकरी कुठलिही करा, बदला... चॉईस आहे. PR झाल्यावर फॅसिलिटीज देखिल मिळतिल. ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. ओव्हरसिज ट्रॅव्हलवर बंधन नसेल वगैरे वगैरे.

नोकरीसाठी न येता तुम्हाला जर इथे मायग्रेट व्हायचे असेल तर तुम्ही PR साठी अप्लाय करु शकता आणि मग PR मिळाल्यावर नोकरी करु शकता.

किंवा, तुम्ही वर्क विसा वर आलात तर PR साठी अप्लाय करु शकता... तुमचा वर्कविसा एक्स्पायर होइतो तुमचे PR अप्लिकेशन सक्सेस्फुल होइल याची खात्री नाही. तसेच वर्क विसावर असताना PR साठी अप्लाय करायचे झाल्यास काहि रिस्ट्रिक्शन्स नक्की असतिल.

पुन्हा नोकरी साठी PR असायलाच पाहिजे हे गरजेचे नाही. मग work visa हा प्रकार कशासाठी आहे?
----- श्री.... माझ्या लिहीण्यातील अडचणीमुळे थोडा गैरसमज होतो आहे.

नोकरी साठी PR असायलाच हवा हा समज खोटा आहे हे दाखवण्यासाठी "work visa" कशासाठी असतो हे मी विचारले आहे.... जेणेकरुन प्रश्न विचारणारे म्हात्रेसाहेब ऑसीच्या वेबसाइटावर work visa साठीची माहिती मिळवतील, असो.

तसेच वर्क विसावर असताना PR साठी अप्लाय करायचे झाल्यास काहि रिस्ट्रिक्शन्स नक्की असतिल.
----- होय काही बन्धने जरुर असतील (देशा प्रमाणे बदलतील). साधारण पणे त्या देशामधे २ वर्षे वास्तव्य केलेले असावे लागते.

त्याचा फायदा पण आहे.... मी दिल्ली ला अर्ज केला तर ५ वर्षे थाम्बावे लागते, पण कॅनडा मधुन अर्ज केल्यास १४ महिने - जास्तित जास्त १८ महिने लागणार. तुम्ही २ वर्षे राहुन काम केल्याने तुमची जॉब मार्केट मधे असणारी किम्मत त्याना माहित असते, म्हणजे PR मिळण्याचा मार्ग 'तुलनेने' सोपा होतो.

थोडक्यात म्हणजे एखाद्याला वाटले की चला आता ऑस्ट्रेलियात काम करु यात तर ती व्यक्ति जॉबला अप्लाय करु शकते पण इथे कोणत्या व्हिसावर येणार हा प्रश्न उरतो. कोणताही मालक तुम्ही जर अतिशय स्पेसिफिक स्किल असलेले दुर्मिळ कामगार असाल तरच वर्क व्हिसा इत्यादी भानगडी करेल. अन्यथा तुमच्याकडे पी आर असावा हे उत्तम. याशिवाय अजुन एक शक्यता म्हणजे ज्या कंपनीत (इन्फि वगैरे) काम करत असाल त्या कंपनीतर्फे येणे.

वर्क व्हिसावर असणार्‍या कामगारांच्या पार्टनर्सना पूर्ण वेळ काम करता येते पण अशा डिपेंडंटना काम मिळणे अवघड होऊन बसते कारण त्यांचा व्हिसा प्रोजेक्ट काळापूरताच असतो. मुलांना शाळेत भरपूर फी भरावी लागते. (ती फी तुमची कंपनी भरत असेल तर प्रश्न नाही.) चाईल्ड केयर चा खर्चही खूप वाढतो कारण सरकारकडून त्याबाबतीत काहीच मदत मिळत नाही.वर्क व्हिसाचे बाकी रेस्ट्रिक्शनस लाजोने लिहीले आहेतच. टॅक्स मात्र बराच भरावा लागतो!

कोणताही मालक तुम्ही जर अतिशय स्पेसिफिक स्किल असलेले दुर्मिळ कामगार असाल तरच वर्क व्हिसा इत्यादी भानगडी करेल.
------ मोठा गैरसमज आहे.... त्यान्चे काम करायला स्थानिक (त्या देशात) कामगार मिळाले नाही तर ते परदेशातील लोकान्ना बोलावणारच... कॅनडात तर पिझ्झा हट, टिम हॉर्टन, वॉल मार्ट मधे काम करायला बाहेरुन शेकड्याने अकुशल कामगार आणलेत, कमी पैशाची कामे कुणीही स्थानिक करत नाहीत, टिकत नाही... मग करणार काय? उद्योग बन्द करुन तर चालणार नाही.

कॅनडात तर पिझ्झा हट, टिम हॉर्टन, वॉल मार्ट मधे काम करायला बाहेरुन शेकड्याने अकुशल कामगार आणलेत, >>>> या कामांसाठी ऑस्ट्रेलियन सरकार व्हिसा देते की नाही याची कल्पना नाही. मायनिंग वर्कर्स (स्पेसिफिक ट्रेडस), फ्रुट पिकर्स या क्षेत्रात पूर्वी व्हिसा मिळत असत. अलिकडचे माहित नाही.

पूर्वी, देशी रेस्टॉरंट्समधे 'इंडिअन शेफ्स' ना विसा लगेच मिळत असे पण आता नाही मिळत असे एका रेस्टॉरंट ओनर मित्राकडुन ऐकले आहे. इथली वाढती भारतिय्/पाकी/बांगलादेशी लोकसंख्या हे एक कारण आणि विसाचा होणारा गैरवापर हे दुसरे..

@स्वाती_आंबोळे, वत्सला, लाजो madam आणि उदयराव:
आपण जी माहिती माझ्यासोबत शेअर केली आहात त्याबद्दल खरच मी खुप आभारी आहे.

thank u so much all