देव-धर्माचा बाजार

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 1 June, 2013 - 14:06

नमस्ते मंडळी

काही दिवसपूर्वी Oh My God या चित्रपटाविषयी ऐकून उत्सुकता चाळंवल्याने स्पेशल आश्रमात सीडी वर चित्रपट पाहणे झाले. आश्रमातील काही मंडळींना चित्रपटात दाखवलेल्या मतांबद्दल तीव्र आक्षेप होते. पण गेल्या वर्षी डिसेंबर म्मध्ये भारत वारीत काही तीर्थक्षेत्राची दर्शने घेतली ,त्यानंतर मनात प्रश्नाचे काहूर उभे राहिले

१. देव-दर्शन हा रिक्शा,ट्रावेल्स वाले ,टुर ओपेरतोर्स आणि आणि तत्सम अनेक मंडळींचा पोटा-पाण्याचा व्यवसाय बनला आहे

२. मंदिर प्रशासन व सरकारने येणार्‍या भक्तांची संख्या व उत्पन्न लक्षात घेता किमान परिसरची स्वछता आणि पिण्याच्या शुद्धा पाण्याची निशुल्क तसेच भक्तगणाच्या उतरण्याची वाजवी दरात सोय करायला हवी

३. फोटो कॅमेरा ला बंदी घातली असली तर त्याछ्या मागचे कारण कळले नाही. मोबाइल बंदीचेही तेच. फोटो काढल्याने तुमच्या मंदिरातील देवत्व कमी होते का? कशाला उगाच भोळ्या भबड्या भक्तांची अडवणूक करता?

४. देवला भेटायची ओढ असताना सतराशे साथ ठिकाणी अडवणूक, हे नेवू नका ,ते नको , तपासण्या या सगळ्या भानगडीत जी काही थोडीफार भक्तीभाव असेल त्याचा प्रभाव ओसरून देवाचे दर्शन होईपर्यंत भक्तीची जागा एक उपचार किंवा व्यवहार यांनी घेतली जाते ,मूल ज्या ओढीने,भक्तीभावाणे लोक येतात, तो कुठेतरी लोप पावतो की काय,अशी शंका येते

एकूणच हिंदू समाजात भक्तीभाव/आस्तिकय कमी होत चाललेले असताना उच्चशिक्षित पांढरपेशा वर्गा देवदर्शना ऐवजी सुट्टीतून कुठेतरी सहल /आऊटिंग ला जाने पसंद करतो . त्यातून उरलेल्या भोळ्या-भबड्या सामान्य लोकांचा भक्तीभाव आणि देवावरचा विश्वास या संस्थानिक व्यक्तीमुळे आणखी कमी होवू नये अशी सदिच्छा

इत्यलम

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Excellent ! मीसुद्धा मागे या विषयावर लिहले होते . आपण अगदी नेमकेपणाने मनातीलच लिहले आहे विश्वरूप जी

खरा धर्म काय आणि भक्तभाव कोणता ,ते लोकांना समजावून सांगायची वेळ आली आहे आता .

एकीकडे जिहादी आतंकवाद आणि माथेफिरु दार-उल-इस्लाम ची गर्जना , त्यांची वेगाने वाढणारी जनसंख्या याचा धोका असतानाच हिंदू स्वत:च नास्तिक बनत चालले तर मग बघायलाच नको...............

अवांतर- अमेरिकेत स्थलांतर करून स्थायिक होणार्‍यात हिंदू आघाडीवर ( एक बातमी )

तीर्थे धोंडापाणी देव रोकडा सज्जनी!
आपले मुद्द्यानुक्रमे
१) मागणी वाढली कि पुरवठादार हा व्यवसाय निर्माण होतो. हे सर्व क्षेत्रात आहे देवधर्माचा अपवाद कसा असेल? आणि त्यात वाईट काय/ कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करावा.
२) खर आहे पिण्याचे पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृह, कचरा व्यवस्थापन, निवारा इत्यादि गोष्टी मूलभूत सुविधा म्हणुन असल्याच पाहिजेत. देवस्थान असे पाहिजे कि जिथे नास्तिक माणुस गेला तरी त्याला प्रसन्न वाटेल.
३) फोटोमुळे पावित्र्य भंग पावते अशी काहींची समजूत असते. पुराण वस्तु संग्राहालयात फोटोच्या फ्लॅश मुळे वस्तुंच्या आयुष्यमानावर परिणाम होतो म्हणुन फोटो काढू नका असे सांगितले जाते. त्या ऐवजी तयार असलेले फोटो घ्या.
४) अहो तो सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे. देवाकडे जाणार्‍या माणसांच्या सुरक्षेसाठी ते आहे. मुर्ती म्हणजे दगड आहे त्यात देवत्व माणसांनीच ओतले आहे ना?

फोटो कॅमेरा ला बंदी घातली असली तर त्याछ्या मागचे कारण कळले नाही. मोबाइल बंदीचेही तेच. फोटो काढल्याने तुमच्या मंदिरातील देवत्व कमी होते का? कशाला उगाच भोळ्या भबड्या भक्तांची अडवणूक करता?>>>>>
फोटोमुळे पावित्र्य भंग पावते अशी काहींची समजूत असते. पुराण वस्तु संग्राहालयात फोटोच्या फ्लॅश मुळे वस्तुंच्या आयुष्यमानावर परिणाम होतो म्हणुन फोटो काढू नका असे सांगितले जाते. त्या ऐवजी तयार असलेले फोटो घ्या.>>>>>>> अहो सगळेच फोटो काढायला लागले तर मग देवस्थानचे फोटो कोण विकत घेणार ? गंदा है पर धंदा है!

स्वामिजी, प्रणाम स्वीकार करावा,
तुमचे म्हणणे खरे आहे, पण बाबरी मस्जिदच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेची नितांत गरज भासल्यामुळे अश्या तपासण्या आणी नियम लागु केलेले आहेत, ते सर्वार्थाने सार्थच आहेत कारण, ह्यापेक्षा उन्नत पद्धति अजुन आपल्याकडे नाहित, मी मथुरेला नेहेमी जात असतो, तिथेही अश्याच नियमांचा अनुभव येतो, पण आमची हरकत नाही कारण ते खरोखरंच फार आवश्यक आहे.

जोपर्यंत धर्मावर किंवा धर्माविरुद्ध वाटणारे नियम लागु होत नाहित तोपर्यंत ठीक आहे.

दोन महत्वाच्या गोष्टी . . . . देव + देवस्थानाची कुठल्याही संभावित क्षतिपासुन prevention (शब्द आठवत नाही मराठीतला ), त्याचबरोबर संभावित क्षती मनुष्यजातीची ज्यासाठी हे नियम.
( कुठलेही औषध शेवटी कडु अथवा सहज सहन न होण्यासारखे असणारच ! ).

फोटो काढणे, कॅमेरा वगैरे वर प्रतिबंध घातला आहे कारण मग चांगल्या लोकांबरोबर वाईट करण्याच्या ईच्छेने आलेलेही असतात, त्यांना ह्या फोटोंमुळे नकाश्यांप्रमाणे सुरक्षित आणी असुरक्षित जागांचे ज्ञान मिळते, जे त्यांच्या राक्षसी विचारांना पोषक ठरते.
म्हणुन कॅमेरा इ० साठी प्रतिबंध.
----
"अहो सगळेच फोटो काढायला लागले तर मग देवस्थानचे फोटो कोण विकत घेणार ? गंदा है पर धंदा है! " > > > >
असा विचार आपल्याला चांगला नाही. खरं पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला फोटो काढायचे पूर्ण ज्ञान नसते, मग तो हे जे फोटो काढुन घेतो त्यांमध्ये देवास़ट आसपसचे सगळे नको असलेले सुद्धा फोटोत येते, मग त्यापेक्षा दुकानांत मिळत असलेले फोटो बरे नाहि का ? त्यांत फक्त देवच असतो, हे सांगायला आणखीनच चांगले कि आम्ही हा फोटो अमुक शहरातल्या अमुक प्रसिद्ध देवस्थानावर विकत घेतला आहे.............अहो देवात ठेवायला ही बरा !
आणी अश्या देवस्थानांवर जरी आता राहाण्या-उतरण्याच्या व्यवस्था, वाहनांच्या व्यवस्था, बाकिच्या वस्तुंच्या दुकानांवर विक्रय असे आहे तर खूप चांगले . . . . अहो निदान देव त्यांना काहितरे कष्ट करायला लावुन स्वत;च्या नावास त्यांना वापरु देऊन त्यांच्या पोटापाण्याची तर सोय करतो आहे ना ? नाहितर हेच लोकं म्हणतील, ह्या आमच्या ईथल्या देवस्थाना मुळे आम्ही तर बेरोजगारासारखे झालो आहोत, आणी असेही होऊ शकते कि, हे लोकं मग चुकुन दुसर्‍याच रस्त्याला लागायचे ?
आपण ह्याकडे अश्या चांगल्या ( positive ), दृष्टीने पाहु, कि निदान त्या देवस्थानावर हे सगळे आपला "धंदा", करुन कुठे ना कुठे आपल्याच धर्माला पुढे जाण्यास मदत तर करीतच आहेत ना ? . . . हा झाला ह्या "धंद्यांमागचा", एक hidden benifit.
चार पैसे जास्त खर्च करुन लोकं देवाच्याच नांवाला ते पैसे अन्यमार्गाने देत आहेत आणी त्या पैश्यांच्या जोरावर आपली उदरनिर्वाह चालवुन हे लोकं, त्या परब्रह्माच्या संतुष्टी साठीच तर अश्या मार्गाने हातभार लावित आहेत ? असे म्हणुन पहा बरं किती लोकांची त्यांच्या कुटुंबा बरोबर पोटे भरत आहेत ?
पण एक खरे आहे कि, ह्या गोष्टींची अगदी अती होऊ नये. . . . मग ते चुकिचे आहे.

पण आता सर्वच काही इतके अचुक नसते ना !
मला ह्या शरीरांत असतांना जे जाणवते प्रकर्षाने ते हे, कि मनुष्य शरीराच्या दृष्टीकोणांतुन अस्वच्छता मात्र खूपच असते, हे काही उचित नाही अजिबात, सगळं कसं अगदी स्वच्छ असावं, शुद्ध असावं.
-----
मुर्ती म्हणजे दगड आहे त्यात देवत्व माणसांनीच ओतले आहे ना? > > > >
अ=ब, ब=क म्हणजेच अ=क, हे गणित समजुन घ्यावे कृपया . . . .

देव म्हणजेच ह्या चराचरातले सर्व काही, म्हणजेच दगड म्हणजे देव, मूर्ती तर त्यांत देव पाहाणार्‍यांनी
बनवुन हे दाखवुन दीले हो जगाला कि, दगडांत सुद्धा देव पाहु शकतो आपण . . . . जर पाहाण्याची ईच्छा असेल तर . . . .

देवाचा आकार प्रत्यक्षात न देता सगळ्या गोष्टींमध्ये देवाला अनुभवतो, तोच खरा डोळस . . . .

आपण नेहेमी आपला दृष्टीकोण जर असाच ठेवला तर सर्व देवमय आहे..... देव देवळात, देवाला पाहायला देवच आले. . . .त्यांना सुविधा मिळाव्यात पण फुकटात नको म्हणुन देवच बाकिच्यी दुकाने काढुन बसलेत. . . . त्यांच्या कुटुंब रुपी देवांचे ही ह्याच कमाईतुन ते पोट भरतात . . . . देवाला काही त्रास होऊ नये म्हनुन देवच व्यवस्था करुन बसुन राहातो, दगडांत देव, खाण्या-पिण्यात देव, वस्तुंमध्ये देव, देवळाच्या भींतीत देव, पायर्‍यांमध्ये हे देवच, कळसात देव, हवेत देव, पाण्यात देव, आकाशात देव, जमिनित देव, फुलांमध्ये देव, पानांमध्ये देव, सगळेच्या सगळे देवमय . . . . देवमय. . . ही सर्व देवाचीच रुपे. . . .
पाहाण्याच्या ( समजण्याच्या - उमजण्याच्या ), दृष्टीकोणांत भिन्नता आहे,

नमस्कार सर्वांस . . . . देवा ! माझी कुठे चुकुन तुम्हाला दुखवण्यासारखी काही विचार पद्धति वाटली असेल तर ती माझे अज्ञान म्हणुन क्षमा करावी |

अगोदर मी सुद्धा असाच वैतागायचो .कधी चिडायचो .पण आता अश्या ठिकाणी जातांना हे गृहीत धरून जातो .त्या मुळे एक सावधानता येते ,स्व:तला लुबाडण्या पासून टाळता येते .आणि आपण यात बदल घडवून आणू शकत नाही हे पक्के कळले की एक तटस्थता येते ,आणि हा व्यापार त्रास न होता पाहता येतो .
इतरांचे माहित नाही पण माझा अनुभव असा कि हा व्यापार,गर्दी ओलांडून गाभाऱ्यात एकदा क्षणभर नमन घडले कि आनंद ,समाधान, शांती खचित लाभते . तरीही आपल्या सदिछे चे स्वागत ..

परम पूज्य स्वामिजी आणी माणुस . . . .

साष्टांग प्रणाम,

बरेच दिवस झाले आपले दर्शन नाही झाले, स्वास्थ्य तर ठीक आहे ना ? काही आमच्या साठी आज्ञा असेल तर अवश्य कळवावे.
अथवा काही फार महत्वाचे काम आले असावे जे निपटुन तुम्ही यालच लवकर . . . .

तरीपण मनाला एक चुटपुट लागुन राहिली आहे कि बहुतेक मी अवश्यच काही फार मोठे वावगे असे काहीतरी लिहिले आहे, ज्यामुळे आपण दोघेही फार कष्टी आणी विरक्त झालात. मी तुम्हा दोघांची वारंवार हात जोडुन क्षमा मागतो. मला असलं काही लिहायची उपरती कुठुन झाली कळत नाही. पुन्हा कधीही आपल्या कोणत्याही वक्तव्यावर काहीही टीप्पणी करणार नाही . . . .परंतु आपण कृपया परत यावे, आपल्याविना कसं अस्वस्थ असं वाटतं . . . . बाकिचे सगळे देव आमच्या बरोबर आहेतच, पण तरीही पुढे चालतांना वारंवार मागे वळुन बघण्याची ईच्छा होते, कि तुम्ही कुठे दिसता आहात, येत आहात कि नाही . . . . आम्ही अगदी यःकश्चित मनुष्य आहोत, तुम्ही सर्वार्थाने मोठे आहात, आम्हाला क्षमा करुन, पुनःश्च आपल्या ज्ञान गंगेचा प्रसाद द्यावा ही विनंती . . . .

नमस्कार . . . .

.

महागुरू,

>> देव सर्वत्र आहे तर मंदिरांची गरजच काय?

आपण अन्न खातो त्यातला सूर्यप्रकाश शरीर शोषून घेतं आणि विष्ठा बाहेर सारली जाते. पण म्हणून कोणी नुसतं उन्हात बसून राहील तर त्याने शरीराचं पोषण होईल का? जर सूर्यप्रकाश सगळीकडे आहे, तर अन्न का खायचं?

याचं जे उत्तर आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.

आ.न.,
-गा.पै.

अडचण अशी की लोकसंख्या अफाट, अज्ञान अफाट, सामाजिक जबाबदारी बद्दल उदासीनता अफाट! देवाची भीति नाही, देवापुढे अस्वच्छता असू नये असे वाटतच नाही. सरकारी नियमांना तर कुणीच जुमानत नाहीत. भ्रष्टाचार न होता कायद्याची अंमलबजावणी होईल या वरहि विश्वास नाही.

काय उपाय करणार नि वाईट गोष्टी कश्या थांबवणार?

देवस्थानच काय सगळ्याच ठिकाणी हीच रड. भारतात कुठल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आहे? खाजगी क्षेत्रात असेल कदाचित्.

आपण अन्न खातो त्यातला सूर्यप्रकाश शरीर शोषून घेतं आणि विष्ठा बाहेर सारली जाते. पण म्हणून कोणी नुसतं उन्हात बसून राहील तर त्याने शरीराचं पोषण होईल का? जर सूर्यप्रकाश सगळीकडे आहे, तर अन्न का खायचं?
<<
हे अती भोंगळ, र ला ट अन ट ला फ म्हणून तुमच्या मावशीचं नांव स्यू असल्या लॉजिकचं उत्तर आहे. हे असेच नॉन-लॉजिक वापरून देव, देऊळ असल्या भोंदू कन्सेप्ट्स पब्लिकच्या गळी मारले जाते.

गा.पै.
हा मला पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे. (तिरकस नाही). उदाहरण मला समजले नाही पण त्यावर बोलत बसलो तर फाटे फुटतील.
मुळ प्रश्न, मंदिरात का जावे? देव सर्वत्र आहे तर माझ्या घरातल्या मुर्तीसमोर बसुनही माझे उद्देश साध्य होउ शकते.

मंदिर हे प्रार्थनास्थळ असेल तर मी समजु शकतो. मज्जिद, चर्च प्रमाणेच पुर्वी (आता फार कमी ठिकाणी) मंदिरात सामुदायिक भजन, किर्तने होतात ते ही समजु शकतो. पण सध्याच्या मंदिरात विश्वरुपानंदानी लिहिल्याप्रमाणे बाजारु पणा झाला आहे. परमेश्वराची आराधना वगैरे दुरच साधे मुर्तीचे/देवाचे दर्शन पण घेउ दिले जात नाही.

ह्या संदर्भाने मी वरील प्रश्न विचारला होता.

महागुरू,

स्वयंभू स्थान नावाचा एक प्रकार असतो. बहुतेक वेळा कोण्या भक्ताला स्वप्नदृष्टांत होतो आणि असं स्थान दिसतं. बरीचशी प्रसिद्ध मंदिरे स्वयंभू आहेत. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेत. उदा. : श्री रामकृष्ण परमहंस ज्या देवळाचे पुजारी होते ते दक्षिणेश्वर येथले मंदिर दृष्टांताविना बांधलेले आहे.

भक्त जोवर मंदिरात श्रद्धेने दर्शनास जातात तोवर मंदिरात देव टिकतो. तसेच मंदिरात श्रद्धेने दर्शनास गेल्यास भक्ताची श्रद्धा बळकट होते. असा हा परस्परपूरक संबंध आहे. हे नाते टिकवायला देवळात जायला लागते.

समजा तुम्ही श्रद्धावान आहात. त्यामुळे तुम्हाला स्वत:च्या घरी बसूनच देवदर्शन होते आहे. मात्र तरी तुमच्या उन्नत स्थितीचा अध्यात्मिक लाभ बाकीच्या भक्तांना मिळणार नाही. तुम्ही जर एखाद्या देवळात नियमितपणे गेलात तर तुमचा अनेक पटीने लाभ मिळेल.

म्हणून देव देवळात ठेवणे इष्ट आहे. मात्र देवदर्शनाचा जो बाजार मांडला आहे तो सर्वार्थाने निषेधार्ह आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीयुत परब्रह्म जी

आपण आठवण ठेवलीत,आभारी आहे.

मला एवढ्या मोठ्या उपाधी नका लावू

आणि साष्टांग नमस्कार वगैरे नको हो

मीही ज्ञानमार्गावरील एक साधक आहे

स्वामी जी,

नमस्कार, आपण आलात हे आमचं भाग्य, आणी तुम्ही सुद्धा मला श्रीयुत आणी जी म्हणुन संबोधु नका, मी अजुनही विद्यार्थीच आहे.

महागुरु,

गा.पै. ह्यांना जे विदीत केले आहे ते बरोबर आहे, मी तुम्हाला थोडेसे ते विस्तारित करुन सांगण्याचा प्रयत्न करतो.

पूर्वी घरा-घरांमधुन देवघरे असायचीच, पण त्यात सर्वच देव स्थापित असतील असे नव्हते, आजही नाही.

सर्वसमान्य पणे घरातील देव घरांत कुलदेवता, ईष्टदेवता, आणी कोणी सुचविले असेल वा सांगितले असेल तर ते देव असे मिळुन काही देव असायचे वा असतात.

घरात भजने वा किर्तने ह्यांचा रोजचा सराव अथवा कार्यक्रम शक्य नसे.

घरात देव-धर्माच्या बाबतिंत जास्त चर्चा होणे वा त्यायोगे विचारांची देवाण-घेवाण होऊन ज्ञान वृद्धी होणे हे जवळ जवळ कठीण होते.

तश्यातच प्रत्येक गावाची एक देवता, त्या देवतेचे देऊळ, राजा अथवा तत्सम कोणी अत्त्युच्च पदाधिकारी वा बाहेर गावातील पाहुणे मंडळी, प्रवासी, प्रत्येक देव-उत्सव, जत्रा, यात्रा हे आणी अशी अनेक आणखीन कारणे असु शकतात कि ज्यामुळे देव सर्वत्र असुनही मंदिरे ( फक्त मंदिरेच नाही तर चर्च, मस्जिद, गुरुद्वारा, बौद्ध विहार, जैन देवळे, इ. ), बनवली गेलीत.

ह्यात आणखीन एक कारण असे कि पूर्वी काही राजे लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन खूप मोठे मंदिरे खूप सुंदर कला कृतींनी भरलेली अशी बनवलीत जी आजही पाहायला मिळतात.

ह्यांमध्येच गा.पै. जसे म्हणतात तसे स्वयंभु देवांची मंदिरे सुद्धा बनवली गेलीत.

ह्या सर्व कारणां मुळे जी एक अलिखित अशी परंपरा चालली अशी प्रार्थना स्थाने वा देवस्थाने बनविण्याची ती आजही चालुच आहे.
त्यातच आपण किर्तने ऐकायला, भजनांमध्ये भाग घ्यायला, देवदर्शन करुन थोडावेळ तिथेच बाकिच्या दर्शनास आलेल्यांबरोबर थोडी चर्चा करु शकतो, घरात जे देव समोर नाहीत मूर्तिरुपात त्यांच्याही देवळांत जाऊन दर्शन घेऊ शकतो.
देवळांत सार्वजनिक प्रवचने, अनुष्ठाने वगैरे सुद्धा होऊ शकतातच.

सर्व भक्तांच्या एका जागी येऊन प्रार्थना करण्याने जो एक नैसर्गिक आणी न कळत सामुहिक सकारात्मक संदेश देवा पर्यंत जातो तो सुद्धा फार महत्वाचा एक दुवा आहेच.

असो . . . .नाही कळाले तर कृपया सांगावे, प्रयत्न करुन पुन्हा सविस्तर कथन करण्याचा प्रयत्न करुच आम्ही . . . .

नमस्कार . . . .

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

स्वामीजी नमस्ते
_______________________________________________
आपण लोक अभ्यासू आहात नेक आहात हेतू चांगलाच आहे आपला तळमळही आहे पण प्रतिसादावर प्रतिसाद अन् धाग्यावर धागे काढून आपण अति ज्ञान पाजळत आहात असे नाहीका वाटत आपल्याला

बाकी आपले अनेक मुद्दे पटतात हे खरे असले तरी ईश्वर हा चर्चेचा विषय नसून अनुभूती घेण्याचा विषय आहे असे मला वाक्य आत्ताच सहजच सुचले म्हणून प्रतिसाद देतोय
__________________________________________
असो
फोटो कॅमेराला बंदी घातली असली तर त्याछ्या मागचे कारण कळले नाही. <<< कारण सिक्युरिटी !! देवाची नाही तर भक्तांचीच .. अश्या साधनामधून स्फोटके इत्यादी वाहून नेली जावू शकतात "एक बटन दाबले कि खेळ खलास"".. होवू शकते
शिवाय सुरक्षाप्रणाली कशी असावी हा तुमचा विषय नसून प्रशासनाचा व यंत्रणेचा आहे त्याना सहकार्य करायला हवे

ज्या ओढीने,भक्तीभावाणे लोक येतात, तो कुठेतरी लोप पावतो की काय,अशी शंका येते <<< असल्या शंका बाळगत जावू नका !! बिनबुडाच्या असतात त्या !!!!! भक्त देवळात गले नाहीत तरी देवाच्या व भक्तांच्या एकमेकावरील भक्तीत काहीही फरक पडत नसतो !!!! हे भक्तिमार्गातील उपचारमात्र आहेत ज्याना पाळायचे ते पाळतात

असो बाकीची चर्चा वाचली नाही .... त्याबद्दल आधीच स्पष्ट सांगायला विसरलो
___________________________________________
आपण लोक जरा अती करता आहात बुवा Happy
आपल्याला आवडत असेल व काही साध्य होते आहे असे नक्की समजले असेल तर चालूद्या !!
________________________________________
परब्रम्ह तुमचे नाव असे खरोखरच आहे की लक्षवेधीपणा आहे हा ?? असा एक प्रांजल प्रश्नही मनात घोळत होता अनेक दिवस अर्थात माझी त्याला हरकत काहीच नाही हेही नमूद करतो Happy

आपला नम्र
वैवकु

मूर्त्या खरोखरच स्वयंभू असतात का असा एक गंभीर प्रश्नही मला पडतो यावर कुणाचे अनुभवलेले मत आहे का लोक म्हणतात म्हणून स्वयंभू असे असते का

काही जागी गोलसर आकाराचे नैसर्गिक दगड इत्यादी दिसतात ते प्राकृतिकतः असेच आधळतात ..मी स्वयंभू मूर्तीए ह्याबद्दल बोलत्ओय
नेमके "मूर्ती " आणि वर ती "स्वयंभू" असणे हाच मुद्दा मला कळत नाहीये

धन्यवाद

१. त्यात वावगं नाही. तो व्यवसाय आहे. त्यात लबाडी नसणे अपेक्षित असल्म तरी आज व्यवसाय (धंदा) म्हणजेच लबाडी असं समीकरण झालय... त्याला इलाज नाही, असं वाटुन लोकं रस्त्यात येउन वस्तू विकतात.
२. आवश्यक.
३. मुभा दिली तर लोकं देवाच्या गळ्यात हात टाकुनही फोटो काढायला कमी करणार नाही. तेंव्हा हे बरच आहे. देवळाच्या बाहेर बघा कसे फोटो काढतात ते.
४. हे तुमच्याच सुरक्षेसाठी आहे, कधी अतिरेक वाटत असेल, पण एकदा त्या सुरक्षा कर्मचार्‍याला "थँक्यु सर" म्हणुन बघा, मग उत्तर कळवा.

रच्याकने, देवाला फुलं, पानं, हार, उदबत्ती, वगैरेची गरजच नसते, तरी तुम्ही का घेता देवच जाणे... उगाच अवडंबर...

आपण लोक अभ्यासू आहात नेक आहात हेतू चांगलाच आहे आपला तळमळही आहे पण प्रतिसादावर प्रतिसाद अन् धाग्यावर धागे काढून आपण अति ज्ञान पाजळत आहात असे नाहीका वाटत आपल्याला

आपण लोक जरा अती करता आहात बुवा

वैभव वसंतराव कु... | तुम्ही दुसर्‍या एका धाग्यावर देखील अक्कल पाजळणे असा शब्दप्रयोग केला आहेत

तुम्ही नास्तिक ढोंगी सेक्युलरवादी / धर्माभिमान-विहीन / पाश्चात्य संस्कृतीच्या अंधांनुकरणाने बिघडलेल्या कथित मॉडर्न पिढीचे प्रतिनिधित्व करता का?

मान द्यावा अशी अपेक्षा नाही, पण याचा अर्थ अपमान करावा असा होत नाही,हे ध्यानी असावे.