"निकाल बारावीचा"

Submitted by विजय वसवे on 1 June, 2013 - 04:29

"निकाल बारावीचा"
दरवर्षी बारावीचा निकाल लागला की मला आठवतो तो आमचा बारावीचा निकाल.
बारावीतले आम्ही तिघे मित्र, एका बाकावर बसणारे.. सुर्य उगवल्यापासुन संध्याकाळी झोपायच्या वेळेपर्यंत आम्ही एकत्र असायचो..फक्त जेवायला आणि झोपायला आपापल्या घरी जायचो.. बारावी कॉमर्स शाखा असल्यामुळे अभ्यासाची कधीच काळजी केली नाही. काळजी करायचे आमचे मास्तर.. कसे पास होणार हे विद्यार्थी?
आमची दिनचर्या भन्नाट असायची. पहाटे ऊठुन व्यायाम करायचो आणि पोहायला जायचो, पोहणे हीच आंघोळ. ०७:२० चे कॉलेज असायचे, १२:३० ला घरी. दुपारी काही विशेष कामे नसली की वामकुक्षीचा बेत असायचा. संध्याकाळी पुन्हा गावातल्या तालीममध्ये व्यायाम..चढाओढीने एकमेकांपेक्षा जास्त जोर मारण्यावर आमचा भर असायचा. १२५ च्या वर काऊंटींग जायला लागले की एकेक जण आवरते घ्यायचा. खडक फोडुन पाणी काढण्याईतपत रग अंगात आलेली होती.
या व्यतिरीक्त सगळ्या यात्रा, लग्न महोत्सव हे आम्हालाच डोळ्यासमोर धरुन आयोजीत केल्या आहेत असं आमचं ठाम मत असायचं. एकही चुकवायचो नाही आणि भरपुर ताव मारायचो.
बारावी कॉमर्सचं वर्ष केवळ व्यायामातुन शरीरयष्ठी कमावण्यासाठी. अभ्यास कशाबरोबर खातात जर कुणी विचारलं असतं तर ते पण नीठ सांगता आलं नसतं आम्हाला.
सर्व चाचण्या, सहामाही परीक्षा अगदी सराव परीक्षेपर्यंत औपचारीकता म्हणुन पुस्तक हातात धरायचो.
बोर्डाची परीक्षा जशी एका आठवड्यावर आली, तसा मी गंभीर झालो. फक्त २१ अपेक्षीत वर भर दिला.
सगळयांना सर्व पेपर सोपे गेले होते. प्रतिक्षा फक्त निकालाची....
कला व वाणिज्य शाखा असलेल्या महाविद्यालयात कोण पहीले येईल याचे अंदाज लावले जात होते.
एकदाचा निकालाचा दिवस उजाडला.. मी माझ्या मित्रांसाठी देवाला विनवणी करत होतो..
कॉलेज मध्ये गेलो तेव्हा बोर्डावर माझे नाव दिसले..
प्रथम क्रमांक- विजय वसवे.
मग मी त्या दोघांना शोधु लागलो, माझे मित्र मला कुठेही दिसले नाहीत.. प्रथम येण्याच्या आनंदापेक्षा मित्र नापास झाल्याचं दु:ख खुप मोठे होते..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users