झाकोळ

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कुंदकुंदशी दुपार
वार्‍याचा चेहरा पडलेला
निसरड्या वाटा
फुलांच्या रसानी टचटचलेल्या..

...धीर धर...

लख्ख लख्ख ऊन पडेल
गवताचे पोपटी पात वारा कापेल
वाटेवर गारशी सावली खेळेल
निळ्या निळ्या आकाशासारख
मनावरच मळभ दूर पळेल!

.. हा तर क्षणभराचा झाकोळ!

- बी

प्रकार: 

लख्ख लख्ख ऊन पडेल
गवताचे पोपटी पात वारा कापेल
वाटेवर गारशी सावली खेळेल
निळ्या निळ्या आकाशासारख
मनावरच मळभ दुर पळेल!

.. जरा अवकाशाने!>>> मस्तच!!!

बी, कविता आवडली Happy
पण जरा शुद्धलेखन बघणार का?
<<फुलांच्या रसांनी>>
<<....मळभ दूर पळेल>> असं हवंय