अमानवीय-काही उत्तरे

Submitted by चिखलु on 30 May, 2013 - 12:58

काही उत्तरे या भागात मागील भाग http://www.maayboli.com/node/43133

तील काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न. यातुन भुत आणि मानवात स्नेह वाढुन एक दिवस हा स्नेह भारत-पाकिस्तान मैत्रीलाही मागे टाकेल याची खात्रीच आहे. Happy

--------------------------------------------------------------------------------------------------------------

भुतांची सायकॉलॉजी थोड्याफार प्रमाणात माणसांसारखीच आहे. उदा. आपल्यात कोणी गल्ली चुकलं की लोक स्वत:हुन म्हणतील, "काय ब्वा, हिकडं कसं काय?" तसच भुतांमध्येपण आहे. आपण त्यांच्या एरीयात गेलो की आलेच ते आपली चौकशी करायला. आपण उगाच घाबरुन जातो, ते बिचारे अगत्याने त्यांच्या घरी बोलावतात, आता त्यांचे घरच स्मशान असेल तर त्यात त्यांची काय चुकी? असो भुतं पाहुणचार करण्यात मराठवाड्यालाही मागे टाकतील. पुणे-मुंबई इथे पाहुणचार ही एक इ.स पुर्व गोष्ट समजली जाते. (आता इथे मुंबई-पुणे विरुद्ध मराठवाडा वाद नको, तुर्तास भुतं विरुद्ध मानवच ठिक आहे)

आता एक किस्सा, एकदा काय झालं गेलो ४ मित्र ट्रेकींगला, आणि झोपले रात्री, त्यातला एक घाबरुन उठला आणि म्हणाला मला दोघेजण न्यायला आले होते. दुसर्यादिवशी, ह्या चौघांना कळलं की काल जे दोघेजण आले होते ते तर मरुन गेले. ते कसय आपण कसं पार्टीला चाललो की करतो कॉल सगळ्यांना आणि मजा करतो, अगदी तसच भुतांमध्येही करत असावेत, Why should humans have all the fun? मग ते काय करतात, बोलावतात जे सापडतील त्यांना, एनीवेज, More the merrier.

काही काही वास्तु बाधित असतात. तिथे हलणारे झुले, वाजणार दारं इ इ असतं. त्याचं काय आहे रात्री लोक झोपतात आणि मग भुतांचा दिवस सुरु होतो. आपली झोपमोड होउ नये म्हणुन भुतं सावकाश दार/खिडक्या उघडतात, सावकाश चालतात. पण भुतांची बच्चे कंपनी धपाधपा पळते, धाडकन दार वाजवते, काचा तोडतात लहान कार्टी. होतो त्रास आपल्याला. त्यांची लहान बाळं भोकाडी खेळतात, एखाद्या अंधार्या जागेत लपुन बसतात वाट बघत. कधी १००-१५० वर्षांनी कुणी माणुस गावला की करतात भ्वा, मग माणसं घाबरतात, मग भुतांचे बच्चे लोक हसतात जोरजोरात, लोक अजुन घाबरतात. आता पोरांना काय कल्पना की माणसं जाम घाबरतात. वर लोक भुतांना पाहुन राम राम राम राम सुरु करतात ते भुतांना मरा मरा ऐकु येतं मग येतो त्यांना राग, देतात ते दणका. मेल्यालाही मारणारी माणसं! आता पाहुणे असलं म्हणुन काय झालं भुतांना मरा मरा म्हटल्यावर राग येणारच

काही भुतांचे अनुभव/मुलाखती त्यांच्याच शब्दात

-------------------------------------------------------------------------------------------------

एका सिंगापुरच्या भुताचा अनुभवः

एकदा काय झालं काही लोक सिंगापुरला आले एका हॉटेलात, तिथे आमचा बाब्या होता, त्याला हाड चघळायची सवय, धरला नां बाब्यानं हात आणि कडकडुन चावलं पोरगं, की केला की आज्जीने गलका. आता आमच्या बाब्याला सुळके येत होते आम्ही त्याला टीथर कुठुन देणार. तुमचे बाळ चावतच ना दात येताना, तसच हे पण तुम्ही लोक आमचा द्वेष करता. किती रडला आमचा बाब्या, हाताला कै म्ह्ण्जे कैसुद्धा चव नव्हती म्हणाला.

एक भुत

माणसात हार्ट ट्रांन्स्प्लान्ट पर्यन्त प्रगती झालिये, आमचे शास्त्रज्ञ जास्त हुशार आहेत, आमच्याकडे डायरेक्ट पुर्ण भुत ट्रान्सफर इन डॉल शस्त्रक्रिया आहे. मग जी वस्तु आवडेल त्यात आम्ही जाउ शकतो. आता फिया म्हणुन आम्हाला दोन चार कवट्या, सापळे असं काही काही द्यावं लागतं, लग्नात आम्ही हुंडा म्हणुन पिंपळाचं झाड, जुना वाडा असं देतो. फारच श्रीमंत असेल कोणी तर आम्ही जावईभुताला पिंपळजावई करुन घेतो, मग त्यामुळे आमची लेक हडळ आमच्या डोळ्यासमोरच केसांचा गुंता सोडवत बसते. आमच्याकडच्या फॅशना पिंपळावरुन प्रेरीत आहेत. म्हणुन आमच्याकडच्या हडळा पारंब्यांसारख्या केस वाढवतात. पण माणसांना ही एक गॉन केस वाटते. पण प्रत्येकाची केस वेगळी असते.

आम्हाला जन्माची फार भिती वाटते, आमच्या विषयी फार गैरसमज आहेत. जसं जे लोक आत्मह्त्या किंवा अपघातात जातात त्यांचे आत्मा अतृप्त असतो म्हणजे भुत असतात. काही त्रास देतात काही नाही. असं कायच्या काही लोक बरळतात. Actually, भुत म्हण्जे बेंचवर बसलेले आत्मे. आता नाहिये आम्हाला काही काम, बसतो शांत, पण तुम्ही प्रोजेक्ट मधले लोक उगाच नाव ठेवतात आम्हाला, मग आमचे परफॉर्मन्स अ‍ॅप्रेजल खराब होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

रस्त्यावर मिरची-लिंबू बर्‍याचदा दिसतात. सुया टोचलेल्या काळ्या बाहुल्या वगैरे रस्त्यावर दिसतात. भुतं सुद्धा अश्या बाहुल्या टाळत असावेत. भुतांमध्ये पण टोल बुथ असते आणि तिथे भुतं बसतात, टोल म्हणुन त्यांना लिंबु मिरची द्यायची प्रथा आहे, हे भुत चिंचेच्या झाडावर बसुन असते, जनरली गावाच्या, जंगलाच्या सिमेवर. कधी कधी फॅन अचानक फिरतो, व्हेंटीलेटर अचानक फिरु लागते, कारण भुतांना गुदमरु लागलं तर ते स्वतःहुन फॅन फिरवतात, व्हेंटिलेटर फिरवतात. पण आपण काळजी करायची नाही, ते लाईटबील वाचवतात. त्यांनी फॅन लावला की आपण फॅन खाली जाउन बसायचं. काही काही भुते ओळखिच्यांच्या आवाजात हाक मारतात, ही भुते गतजन्मीची मिमिक्री आर्टिस्ट असतात. समजा घश्यातुन किंवा चित्र विचित्र आवाज काढुन हाक ऐकु आली रात्री तर आपल्याला भिती वाटेल, म्हणुन आपल्या सोयीसाठी आणि थोडी कमी भिती वाटावी म्हणुन काही काही मिमिक्री आर्टिस्ट भुते ओळखीच्यांच्या आवाजात हाक मारतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

भुतांची जुबानी:

फोर अ चेन्ज आम्हाला रिक्षात बसायला आवडतं, मग आम्ही काय करतो, दिसला कोणी की बसा रिक्षात, कार मध्ये, किंवा बाईकवर. लोक घाबरतात, आम्ही काय नाय करत, उतरतो स्मशानात नाहीतर असच कुठेतरी आणि उपकाराची परतफेड म्हणुन जातो घेवुन त्यांना आमच्या घरात. अंगात येणं तो आमचा डांन्स आहे पब डिस्को मस्त धिन्च्याक म्युझिक आणि आता आम्हाला नाही येत शकीरा डांन्स मग काय आम्ही नाचायचं नाही का? काही घरात इतरांना विचित्र अनुभव येत (कुलुपच न उघडणे- आम्ही आत बसतो दार लावुन, प्रायव्हसीसाठी, दरवाजा जॅम होणे, सगळी बटने बंद केली तरी ट्यूबलाईट चालूच राहणे- कारण आमची पोरं अभ्यास करत बसतात, का म्हणुन आम्ही लाइट बंद करायची, मोठ्या घरातून बाहेर पडायचा रस्ताच न सापडणे, ऐनवेळी बॅटरी न पेटणे-आमचे पोर बॅटरी बॅटरी खेळुन सेल डाऊन करतात) अमावस्येला तुम्हा लोकांना आमचे अनुभव येतात कारण आमचा तो लाँग विकेंड असतो, आम्ही धमाल करतो म्हणुन. भुत खेड्यात जास्त आढळतात, कारण आम्ही गांधीजींना मानतो, ते म्हणाले 'खेड्याकडे चला' की निघालो आम्ही खेड्याकडे. ते म्हणाले कोणी एका गालावर दिली, की करा दुसरा गाल पुढे. असो. आम्ही उलटे का बसतो? किंवा पाय उलटे का असतात? आता तुम्ही सांगा सुपरमॅन अंडरविअर पॅंट्च्या वर का घालतो? तो त्याच्या ड्रेसच्या मागे लाल रंगाची ओढणी का घालतो? उलटे पाय हा आमचा युएसपी आहे. Happy आमचाही हॅलोवीन असतो मग आम्ही देतो दर्शन अर्धवट जळक्या चेहर्याने, किंवा अशाच भितीदायी रुपात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

रस्त्यात बायका/ह्डळी दिसतात रात्रीच्या, आपण आपलं निघुन जायचं शांतपणे. गाडी नाही थांबवायची, या बाया म्हण्जे भुतांचे एचार. गावला कोणी की कर रिक्रुट. काही काही जागांवर सारखे अपघात होतात, लोक मृत्युमुखी पडतात. अशा जागा म्हण्जे भुतांचे रिक्रुटमेंट ऑफीस असावे. तिथे ते भुतांची रिक्रुटमेंट करत असावेत, काही जागांवर तेलाचे टँकर उलटतात, तिथे बहुतेक भुतांचे किचन असावे.

भुतांमध्ये एंटरटेन्मेंट म्हणुन जत्रा होतात्/भरवतात. दुधाळ्याच्या माळावरची जत्रा लै फेमस आहे. तिथं सोन्याचा माल घेवुन घरी आणुन ठेवला की सकाळी हाडं निघतात. आता चायनीज माल किती दिवस टिकणार? भुतांनी काय नफा कमवु नये की काय? आजकाल दुकानात घेतलेला माल दुकानाबाहेर पडलं की दुकानदार परत घेत नाहीत, शेवटी भुते पण माणसातुनच आली. जे पेराल तेच उगवेल ना?

जखीण हा प्रकार किचनच्या खिडकीतुन काही तेलकट खायला मिळतं का याची वाट पाहत असतं, वय झाल्यामुळे जखीण काही स्वयंपाक करु शकत नाही, त्यामुळे बिचारी खायला मागते. काही भुते अतिशय कामसु असतात, दुसर्यांचा स्वयंपाक पळवणे, गाडी परस्पर कुठेतरी उभी करणे, वस्तुंच्या जागा बदलणे, घरात कोणी आले की आपोआप लाइट लावणे, टिव्ही बंद करणे इ इ उद्योग करणे असं काही चालु असतं त्यांचे. आपण मस्त साहेबासारखे रहायचे.

काही भुत अ‍ॅथलीट आहेत, ते रोज व्यायाम करतात, कधी कधी भुतं जॉगींग करतात, रात्री गाड्यांसोबत रेस लावतात. कल्पना करा अमावस्येच्या रात्री निर्जन रस्त्यावर फक्त तुमची गाडी चालली आहे, दुरवर दुसरे कोणीही नाही. भयाण वातावरण, कडकडणार्या विजा आणि अचानक गाडीसोबत कोणीतरी धावत आहे, तेच ते जॉगींग करणारे भुत.पण आपण घाबरायचं नाही, काच खाली करुन आपण त्यांना स्पीड सांगायचा, बाकीचे काम ते करतील, मग दुसर्या दिवशी त्या रस्त्यावर अजुन एक भुत जॉगींग करताना दिसेल.

रात्री तुम्ही भयपट पाहत आहात आणि अचानक तुमच्या घराच्या खिडकीतुन कोणीतरी डोकावतय. त्याचं काय आहे भुतांची लहान मुलं कुतुहलापोटी खिडकीतुन डोकावुन बघतात. दिवसभर पिंपळावर बसुन बोर होतात पोरंसोरं. रात्रीच्या वेळी आपण टिव्ही बघणार, भुत-हडळ कामधंद्याला पिंपळाबाहेर पडणार, मग पोरं शेजार्यांकडे जातात. पोरच ती भुतांची असली म्हणुन काय झालं, त्यांनाही टिव्ही बघायचा असतोच ना. ते डोकावतात बिचारे आपण मात्र भयपट बघत बसायचं, घरातला फॅन आपोआप फिरला, पावलांचे आवाज आले, दार करकर वाजले , घाबरायचे नाही. शेजार्यांची पोरं असतील असं समजुन भयपट पहायचा. कारण आज ना उद्या आपणही पिंपळावरच जाउन बसणार, मग ते करतील आपली सरबराई. Happy

भुतांमध्ये गेस्टहाउस भुतं हा एक प्रकार आहे, ते काय करतात कोणी आवडलं की जातात घेवुन ते, २-३ दिवस स्वतःजवळ ठेवतात. खाउ पिउ घालतात. आणि देतात परत पाठवुन. काहीजण या भुतांना बावा म्हणतात. हे बावा कोकणीच. आता बावा कुणाला घेवुन गेला की तो इतरांसाठी गायब होतो. कधी एखाद्या झाडावर, कधी एखाद्या रस्त्याच्या कडेला बावा आपली काळजी घेतात. मग आपण काय करायचं बावाला द्यायचा नारळ आणि दहीभाताचा उतारा, की बावा खुश.

भुतांचे प्रमाण कोकणात जास्त आहे असा समज आहे. तसं पाहिलं तर कोकणातले लोक समाधानी आहेत. पण सरकारने जिथे तिथे "येवा कोकण आपुलाच असा" असे बोर्ड टांगलेत. वाचला बोर्ड की चाललच भुत कोकणात. तिकडे कोकणात स्थानिक विरुद्ध परप्रांतिय भुत असा वाद रंगतोय असं कानावर आलय. पण भुतांमध्ये विलेक्षन हा प्रकार नसल्याने हा प्रश्न राजकीय रंग घेणार नाही असा अंदाज आहे.

आडरानात लघवी करताना कर्णपिशाच्च्याची बाधा होऊ शकते असं म्हणतात. कर्णपिशाच्च एखाद्या व्यक्तीच्या कानापाषी सतत बडबड करतो, कधी जवळच्या व्यक्तीच्या आवाजाने भ्रमीत करतो . त्याचं काय आहे, समजा कोणी तुमच्या घरात येवुन मुतल्यावर तुम्ही काय करणार? ते बिचारं भुत तेच करतं. कर्णपिशाच्च म्हण्जे गतजन्मीचे रेडीओ जॉकी, त्यांना फक्त बोलायची सवय, ऐकायची नाहीच. मिळाला कान की झालीच बडबड सुरु. किंवा एखाद्याची बायको कजाग असेल आणि तिने नवर्याला कधीच बोलु दिले नसेल तर असे सशे नवरे मेल्यावर खुप बडबड करतात, कर्णपिशाच्च होतात.

भुतांमध्ये बायांची संख्याच जास्त, म्ह्ण्जे अतृप्त आत्म्यांमध्ये स्त्रीयांचे प्रमाण जास्त. अर्थात बायांसोबत शॉपिंगला गेल्यावर तुम्हाला उत्तर मिळेलच की बायकांचे आत्मे अतृप्त का ते. निगडीला बिनमुंडक्याची बाई बर्याच जणांनी पाहिलिये. आता मुंडकं गायब कसं काय होउ शकतं? ही बाई जिवंत असताना सगळे तिला बिनडोक म्हणायचे. ती हात धरते कारण ती रस्ता चुकते. आता ज्या भुताला मुंडकं नाही त्याला डोळे नाहीत, डोळे नाहीत तर दिसत नाहीत, पण परोपकार नावाची गोष्टच मुळी मानवात नाहीच. समजा धरला तिनं हात तुमचा, करायचा असेल बिचारीला रस्ता क्रॉस, तर व्हा ना तुम्ही आंधळ्याची काठी. ती बिचारी अपेक्षेने येते तर तिथे तुम्हीच धाराशायी. कुठे कुठे रात्री भांडी घासण्याचा आवाज येतो, रात्रीचे जेवण उशीरा आटोपुन हडळ किचन आवरुन भांडे घासते बिचारी, आपण नाही लक्ष द्यायचं नाहीतर ती आपल्याला धुवायची.

असो, अजुन नारळ-दहीभात आला नाहिये, आज उचलावे लागेल दिप्याला. मी आलोच त्याला घेवुन,

-चिखल्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl भूतांवर मास्टरी केली वाटतं चिखल्याने.:फिदी: अजून भुतांचे अमानवीय प्रकार राहिलेत ना. संमंध, वेताळ( भुतांचा राजा ),मुंजा,खविस इत्यादी.

बालभोकाडी मस्त शब्द गावला.:खोखो:

Rofl

काल मला घरी अगदी असाच अनुभव आला...रात्री पुस्तक वाचत होतो आणि नेहमीप्रमाणे टीव्हीवर गाण्यांचे चॅनेल लाऊन ठेवले होते. अचानक टीव्ही म्यूट झाला..आणि म्यूटचे चिन्हपण दिसले...मला वाटले रिमोट जवळच होता चुकून आपला हात पडला..म्हणून पुन्हा सुरु केला...थोड्या वेळाने पुन्हा एकदा तसेच...
मग जरा गांभिर्याने घेतले...पुस्तक बाजूला ठेऊन रिमोट हातात घेऊन बसलो बराचवेळ काहीच झाले नाही..मग बाजूला ठेवला आणि पुस्तक उचलले तर पुन्हा म्यूट...
च्यायला काहीच कळेना काय प्रकार चाललाय ते..त्यात अजून घाबरवायला म्हणून खिडकीच्या बाहेर कुत्र्याने नख्या घासल्याचा आणि गुरगुरल्याचा आवाज..पटकन बाहेर पाहिले तर कुणीच नव्हते...आता फक्त लाईट जाण्याचा आणि जोराने वीजा चमकण्याचा अवकाश होता कि परफेक्ट भयपटाचा माहोल झाला असता...

पण सुदैवाने हा धागा आधी वाचला होता. त्यामुळे भूतमंडळींपैकी कुणीतरी असणार ज्यांना टीव्हीच्या आवाजाने झोप येत नसणार अशी कल्पना केली. मग काहीच भिती वाटेना..उलट त्यांच्या भावनेचा आदर केला आणि टीव्ही बंद करून पुस्तक वाचत पडलो...मग कसलेही अनुभव आले नाहीत.

भूतांवर मास्टरी केली वाटतं चिखल्याने.
>>हा हा हा
हे लई भारी ! एकदम मस्त.
>> धन्स
दं -ड -व -त -स्वी -का- रा-वा .......................
>>> ओके शक्तिमान
भाऊ
>>> वॉव, आभारी आहे
आशुचँप
>>> Happy

Pages