धन्य ही तरुणाई

Submitted by bnlele on 29 May, 2013 - 23:31

ऊतार वयात झोप कमिच त्याहून एकटेपणा वाट्याला आलेला म्हणून बापुराव शिरस्त्यानुसार पहाटे तीनलाच उठले.
अदल्या रात्रि टीव्हीवर पाहिलेली बातमी आठवून. घाईनी उरकून पायजम्यावर कुडता चढवला,चपलॆत पाय सरकवले आणि फ्लॅटची
चावी घेऊन वर छतावर जायला सज्ज झाले. लक्षात आल म्हणून कोपर्‍यात ठेवलेली काठी बगलेत घेतली. काठीच वैषिट्य अस कि मूठ उघडून रोवली कि त्या आधारे बसता यावंअशी कारण,बराच वेळ आकाश निरक्षण करायचा इरादा होता. नभोमंडळात शुक्र,बुध, आणि,बृहस्पति एकमेकां जवळ आलेले दिसणार आणि तेही नाचताना अशी बातमी होती. रेलिंगला धरून दोन मजले चढून छतावर पोहोचायला भरपूर श्रम आणि वेळ लागला. पूर्वी दिवसातून अनेकदा खालिवर करायचे. तिथे, बागेची हॉस भगवायला चारसहा कुंड्या ठेऊन. त्याना खत-पाणि द्यायच आणि शेजार्‍यांशी, झालेच, तर थोडे संवाद. तुळस,गवति चहा, मोगरा किंवा गुलाबाच एखाद रोप असा छोटेखानी बगीचा होता. सॉ च्या आजारपणात बापुरावांकडे अनाहुत त्याची जवाबदारी आली होती. पण ती गेली आणि कुंड्या दुरलक्षित झाल्या. "गेले ते दिन" अशा आठवणींचा गुंता सोडवत पायर्‍या चढून त्यांनी छत गाठल.
निळसर अंधुक प्रकाशात पश्चिम-उत्तर दिशेला आकाश निरखून पाहिल. एक चुकार ढग अस्ताव्यस्त पसरलेला पाहून थोडे
चिंतित झाले पण उमेद सोडली नाही. सुर्योदयापूर्वी नक्कीच सरकेल आणि स्वर्गीय सोहळा दिसेल. पॅरापेट जवळ मॊकळा कोपरा
शोधून हातातली काठी रोवून स्थिर केली, मूठ उघडून बूड ठेवल. शांतपणे खिस्यातली चंची काढली आणि बार भरून एकचित्त
आकाशाकडे टक लाऊन बसले. तो भला मोठा ढग हळु वितळताना-सरकताना दिलासा अनुभवला. मनात मात्र त्या फावल्या वेळात विचार-मंथनाच वादळ उठल -------
टीव्हीच्या चॅनेल्सची बातमीपत्र आपल्या इतक्या निष्ठेनी अन्यकुणि पाहात नाहित याची खात्रि असली तरि निसर्गाचा अन‌न्यसाधारण सोहळा बघण्याचा उत्साह शेजार्‍यांपैकी कुणालाच -- म्हातारे-तरूणांना कां नसावा याच आश्चर्य वाटल.. तरूणपिढी तर एरवी रात्री जागून-जागून रॉक,ब्रेक,लावणी असे अखंड प्रसारित डांस बघून झॊपेतच असणार आणि वयस्क खोकून-खोकून दमछाक म्हणून घोरत पडलेले असावेत नक्की. चॅनेल्सनी तरुणाईची नस ऒळखली म्हणून सर्वत्र नाचाचा धिंगाणा असतोच. एवढ पुरेस नाही म्हणून जाहिरातीत सुद्धा त्याचाच उपयोग, कंमाल म्हणजे खेळांशी काय संबंध नाचाचा? पण मैदानात चॉका, सिक्सर ठोकलाकि तोकड्या वेषातल्या ,,, !
बापुरावांना, ढगाचा लोंढा बर्‍यापैकी सरकलेला पाहून उमेद अजून वाढली. पण, सूर्योदय झालाकि काही दिसणार नाही अशी भिति होतीच. त्यांच्या मनातला खगोल शास्त्रज्ञ भरकटू लागला ---

विश्वनिर्मिती झाल्याला अब्जावधि काळ लोटला. त्या वेळी व्यवस्थापनाची सर्व यंत्रणा स्थित करून नियंत्यानी प्रत्येकाला
कार्याची रीत आणि जवाबदारी कटाक्षानी पाळण्याची ताकीद दिली होती; बुद्धिजीवी मानव निर्मितीची संकल्पनाही घोषित केली. पण, त्या बुद्धीचा विकास घडताना प्रबळ होणार्‍या मानवाला नियंत्रित राखण्याची जवाबदारी पण ग्रहमंडळावर सोपवली. शंकाग्रस्त ग्रहांना स्पष्ट केल कि प्रत्येक जिवाचा प्रवास ग्रह मंडळाला सोपविलेल्या नियोजित आलेखानुसारच व्हावा या हेतूनी प्रत्येक ग्रहाचे अधिकार कसोशीनी पाळण्याचे निर्देश दिले. प्रत्येक जिवाच्या आलेखाच सर्वांनी निरंतर सूक्ष्म निरिक्षण करून आपआपल्या अधिकार-मर्यादेत समन्वय ठेऊन बुद्धीचा विकास घडू द्यावा. बुद्धि या धारदार शस्त्राचा गैर वापर टाळला गेला पाहिजे. - कुचराई अजिबात नको.
विषेश लक्ष ठेवण्यासाठी, शुक्र,गुरू, आणि,बृहस्पति अशा तीन ग्रहांची उपसमिती नेमून इतर सर्व ग्रहांनी समितीच्या मार्गदर्शानुसार कार्य कराव अस ठरविण्यात आल. एकूण समन्वय साद्गण्याचे व्य्वस्थापन त्रुटिविरहित व्हावं म्हणून.चंद्राची विषेश निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात पुढाकार घेतला तो शुक्रानी. .
शतकानुशतके लोटली. मानवानी, निसर्गाचा उत्तरोत्तर सखोल अभ्यास करून दैनिक समस्या तर सोडवल्याच पण प्रकृतिवर मात देत नैसर्गिक व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचाही चंग बांधला. चंद्रावर, मंगळावर झेप घेतली. ग्रहमंडळानी सुद्धा कॉतुक केल आणि उदरात.लपविलेल्या खजिन्याची कधि झलक पण दाखवली एवढ करून नियंत्याच्या योजनेच रहस्य नाहीच उलगडल. पण जिद्द प्रबळ म्हणून मानवाने संघटित आणि व्यक्तिगत प्रयत्न चालूच ठेवले. ज्ञान-पिपासू प्रयत्नांनी भूतलावर उत्क्रांतिच बीज फोफावत विज्ञान,संस्कृति,आरोग्य,शेती,व्यापार,दळणवळण अशा बाबतीत समृद्धि आली. सोबत स्पर्धा,हेवेदावे,मालकीहक्काचे,राजकारणाचे तंटे,अशा अनेक संहार-शस्त्रांची निर्मितिलाही प्रोस्ताहन मिळाले. मनोरंजनाच्या साधन-समृद्धीचे तर पेवच फुटले.
अनंत काळ लोटला--
ग्रहांच्या समितीचे व्यवहार-कार्य चोख सुरू होते तसेच बुद्धिजिविंचा विकासही झपाट्यानी होत होता.. चंद्रकलांच्या माध्यमातून सूक्ष्म निरिक्षणाचे इत्यंभूत संदेश समितिला आणि इतर सर्व ग्रहांना अव्याहत पोहोचत होते. जीवनातील सगळ्या क्षेत्रातल्या -हालचाली आणि मनोव्यापार उमटण्या आधीच त्यांचे कुंडलीनुसार विश्लेषण योग्य त्या ग्रहानी सम्मत केल्यावरच क्तियाशील होणार. त्यावर मानवाला कुरघोडी करताच येणार नव्हती..
अधुन-मधून समितीच्या दिशानिर्देशानुसार मतिगुंग बुद्धि विकासावर अंकुशट ठेवण्यासाठी पूर,वादळं, कमि-अधिक वर्षा असे
सॉम्य उपाय योजले जात होते;अति झाल तेंव्हा चक्रिवादळ,त्सुनामी, भूकंप,आवर्षण/अतिवृष्टि असे कठोर उपायही वापरले.
निसर्गरहाटी कायम ठेवताना ग्रहांनासुद्धा मनोरंजनाची बहुधा महति पटली. तरुणाईच्या नाचांच्या मोहिनीचा प्रभाव त्यांच्यावरही झाला कि काय ?
कुंडलीतले ग्रह मानवी आयुष्यावर प्रभाव करतात हे सर्वमान्य
पण तरुणाईचा त्यांच्यावर ? धन्य!

अचानक बापूराव आश्चर्यमुग्ध! आकाशात एका ओळीत जवळ आलेले शुक्र,बुध,आणि,बृहस्पति पाहून अचंबित झाले. त्या तीन ग्रहांच नर्तन क्षणात ढगाआड लुप्त झाल. देहभान विसरून बापूरावांनीपण गिरकी घेतली आणि टेकूची काठी सरकली.
कुणाला सांगू अन्‌ कायकायशा विचारात सावधपणे जिना उतरू लागले. त्याच्या मनात एकच घोळत होत--- हातर नक्कीच तरुणाईचा प्रभाव ! धन्य शतशः धन्य ही तरुणाई.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काका
पूर्वी वीस वर्षांनी पिढी बसलते असं म्हटलं जायचं. तुमच्या माझ्यात नक्कीच पिढीचं तरी अंतर असेल. हल्ली पिढी दर तीन वर्षांनी बदलत असल्याने बदलांशी जुळवून घेताना त्रेधातिरपीट उडते. विचारात खूपच अंतर पडतंपिदोन पिढींना एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद होत नाही. कितीही बदल झाले तरी काही गोष्टी मात्र बदलत नाहीत. तुमच्या नजरेतून वाचलं तर काही मुद्दे चांगले आहेत. काही गोष्टी अनुभवानेच कळतात, ज्येष्ठांकडून अनुभवाचे बोल ऐकायला मिळतात. त्यातून घेण्यासारखं काय आहे ते पहायला हवं.

या लेखाबद्दल आणि त्यामागच्या कळकळीबद्दल धन्यवाद. Happy