अपघात

Submitted by shilpa mahajan on 29 May, 2013 - 16:02

अपघात
डोळ्यावर उन्हाचा कवडसा आला तशी वीणाने डोळे किलकिले करून भिंतीवरचे घड्याळ बघितले साडेसहा . . वाजून गेलेले पहाताच तिची झोप कुठल्या कुठे पळाली . झटक्याने उठून बसून तिने कडकडून आळस दिला.. चादरीची घडी घालत ती स्वतःशी पुटपुटली ,"छे बाई , भलताच उशीर झाला आज उठायला ! “
भराभर ब्रश करता करता एकीकडे तिने चहाचे आधण चढवले. . बाल्कनी मध्ये येउन पडलेला पेपर चाळावा कि नाही याचा विचार करता करता तिने चहा गाळला. . चहाचा घोट घेता घेता हेड लाइन्स पाहिल्या आणि कपडे बदलून ती पार्कमध्ये फिरायला घाइनेच निघालि.
घरापासून पार्क पर्यंतचे जेम तेम पाच सात मिनिटांचे अंतर आज तिला खूप जास्त वाटले . पार्क मध्ये पोहोचल्यावर तिला जरा हायसे वाटले. े गाणी सेट करून तिने कानात इयरफोन लावला आणि मग ती रोजच्या सारखी एका विशिष्ट लयीत चालू लागली. मधून मधून तिच्यासारख्या रोज चकरा मारायला येणाऱ्या मुली समोर आल्या कि ती हलकेसे स्मित करून पुढे जात होती. . पाच चकरा पूर्ण झाल्या , अजून चार तरी मारायला हव्या होत्या , तेव्हाच तिचा रोजचा कोटा पूर्ण होणार होता. . आणखी एक चक्कर मारेपर्यंत गर्दी खूपच कमी झालेली तिला जाणवली ." आज उठायला आणि पर्यायाने पार्कमध्ये यायला उशीर झाला होता , त्याचाच हा परिणाम होता !
आज राहू द्याव्यात का उरलेल्या चकरा ? " तिने स्वतःलाच उद्देशून प्रश्न विचारला.
" नाही नाही ! असे करून कसे चालेल" ? अशाने मनाला रोजच काही ना काही बहाणे शोधायची सवय लागेल ! कशाला हवी आहे गर्दी ? माझ्यासारख्या दोन चार दूर वर का होईना , दिसताहेत ना ? झाल तर मग !"
स्वतः च्या मनाशी संवाद साधत ती चकरा पूर्ण करत होती .
एका मल्टी नेशनल कंपनीत ती काम करत होती . एकदा कामाला सुरुवात केली की दहा बारा तास उठायला वेळ मिळेलच याची खात्री नसे . तिने रोज सकाळी उठून किमान पाऊण तास वेगाने पार्कमध्ये चकरा मारायचा नियम स्वतःला लावून घेतला होता . त्यामुळे तिचे शारीरिक आरोग्य व्यवस्थित होते.
स्वतःच्या शरीर सौष्ठवाचा तिला रास्त अभिमानही होता. तिच्या बरोबर काम करणाऱ्या तिच्या वयाच्या . बायका बहुधा सुटल्या तरी होत्या किंवा हडकल्या तरी होत्या. खऱ्या वयापेक्षा पाच सहा वर्षे तरी कमी . त्या गोष्टीचा उल्लेख वाटणारी ती एकटीच होती तिच्या सहकारी मित्रांच्या तोंडून कित्येकदा होत असे आणि तिला सुखद जाणीव करून देत असे.
आत्ताही चालता चालता तिला त्या आठवणीने गुदगुल्या झाल्या. तिच्य ा चेहेऱ्यावर स्मित उमटले . . आपल्याला स्वतःशी. एकदम तिला वेळेचे भान आले हसताना कुणी पाहिले तर नाही ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी तिने आजू बाजूला चोरटी नजर फिरवली. . तिच्या पुढे काही अंतरावर दोन तीन तरुण आपल्याच मस्तीत गप्पा छाटत खिदळत चालले होते. त्यांचे कुणाकडेच लक्ष नव्हते. तिने घड्याळ पाहिले. वाजत आले होत आठ े. आता मात्र घाई करायला हवी होती . घरी जाउन अंघोळ वगैरे आवरून साडे आठाची बस पकडायची तर नाश्ता सोडून द्यावा लागणार होता . ही शेवटची चक्कर संपवावी लागणारच होती कारण अर्ध्याहून जास्त अंतर तिने कापले होते . आता परत जायचे म्हटले तरी तितकाच वेळ लागला असता .
तिने चालण्याचा वेग वाढवला . आठ दहा पावले चालून झाल्यावर तिला भराभरा चालता येईनासे झाले . इतका वेळ दूर वाटणारी ती तीन मुले तिच्या अगदी पुढ्यात ठाकली होती . तिने त्यांच्याकडे एकदा पाहिले आणि ती थबकून उभी राहिली . तिला जायला वाट देतील म्हणून ! पण त्यांचा तसा काही विचार दिसेना ! तिने त्याना वळसा घालून जाण्याच्या विचाराने डावीकडे मोर्चा वळवला . पण त्यांच्यातल्या एकाने ती वाट अडवली . तिने दचकून एक पाउल मागे घेत उजवीकडून निघण्याचा प्रयत्न केला . पण दुसरया मुलाने तो हि हाणून पाडला . आता तिला धोक्याचा खरा आभास झाला . तिने मदतीसाठी मागे पुढे पाहिले . " “कुणी नाही मेडम ! तुमची हाक ऐकून येईल असे कोणीच नाही !" मदाम , मुकाट्याने माझ्यामागे चाला . " मधल्या मुलाने जीन्सच्या खिशातून चाकू काढून दाखवत तिला दरडावले .
चाकू पाहून तिचे डोळे विस्फारले . तोंडाला कोरड पडली . अंगाला थरकाप सुटला . पायातले त्राण नाहीसे होऊन ती भोवळ येउन पडणारच होती ! तेवढ्यात एकाने तिला आधार दिला. आधार कसला , तिचा दंड करकचून धरला आणि तिला फरफटत चालवले .
पार्कच्या एका कोपऱ्यात कधीकाळी वौचमन साठी बनलेली खोली आता मोडकळीला आली होती आणि वापरात नव्हती . तिथे गेल्यावर तिला जोरात ढकलले . ती जमिनीवर धडपडली . एकाने तिच्या तोंडात त्याचा घामात भिजलेला रुमाल कोंबला . एकजण दारापाशी पहारा करायला उभा राहिला . एकजण चाकू काढून तिने आवाज केला तर तिचे काम तमाम करण्याच्या तयारीत उभा राहिला , त्या रुमाल कोम्बणाऱ्या माणसाला पुढे सरकताना पाहून तिला आपल्यावर ओढवणाऱ्या प्रसंगाची कल्पना आली .
आपण एकट्या काहीच करू शकणार नाही हे तिने ओळखले . " शक्यतो असला प्रसंग टाळण्या चा प्रयत्न करा , पण ते शक्यच नसेल तर तो एन्जोय करा !" केव्हातरी कुठे तरी वाचलेले तिला आठवले . तिने हात जोडून त्यांच्याकडे केविलवाणे पणाने पाहिले .
कसे काय कोण जाणे पण ती विरोध करणार नाही एवढे तिच्या देहबोली वरून त्यांच्या लक्षात आले असावे . त्यांनी देखील तिचे जास्त हाल न करता त्यांचे ईप्सित उरकले . त्यानंतर मात्र त्याना काय वाटले कोण जाणे, पण चाकू वाला तिच्या दिशेने पुढे सरकू लागला . कदाचित ती त्यांची ओळख पटवू शकेल याची कल्पना आली असावी . तिने हात जोडले . " मी कुणाला काही सांगणार नाही . मला जाऊ द्या ! तुमची इच्छा तर पूर्ण झाली ना ? मला कशाला मारता ? मी तर आधीच मेलेली आहे ! मेलेलीला मारून तुम्हाला काय मिळेल ?
" मेलेली ? म्हणजे काय ?" गरज नसतानाही न राहवून एकाने विचारले .
" माझ्या पतीकडून मला गिफ्ट मध्ये एड्स मिळालेला आहे. मी तर त्यामुळे आधीच मेलेली आहे . फक्त शरीराने कधी जाते ,आज कि उद्या एवढाच प्रश्न आहे ! फक्त माझा काही दोष नसताना मला एकटीला हि शिक्षा कशाला असा विचार मनात यायचा आणि दुक्ख वाटायचे . आता तुमच्या मुळे ते दुक्ख संपले . !"
" म्हणजे ?"
" म्हणजे असे कि तुमचा सर्वांचा माझ्याशी संबंध आलाय ना ! आता माझा एड्स तुम्हाला पण गिफ्ट मध्ये मिळणारच! तुमची सर्वांची कंपनी मरताना मिळेल या विचाराने मला खूप बरे वाटते आहे.
तरीसुद्धा मला मारणारच असाल तर मारा ! एड्स बरोबर तुरुंगवास देखील मिळेल ! कारण माझा नवरा तक्रार करणारच !"
एवढे बोलून ती क्षणभर प्रतिक्रिया पहात उभी राहिली . सर्वांचे चेहेरे एकदम पांढरे फटफटीत पडले होते . माना खाली झुकल्या होत्या . क्षण भराच्या आनंदाची खूप मोठी किंमत चुकवल्याचा पस्तावा त्यांच्या चेहेऱ्यावर साफ दिसत होता !
वीणा त्या लोकाना तसेच सोडून बाहेर आली . तिने कपडे नीट केले. केसांवरून हात फिरवला . तिने घराकडे मोर्चा वळवला . आज कित्येक वर्षांनी तिला आपले गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन झाले आहे याचा मनापासून आनंद झाला … "सॉरी विकास ! तुझ्या निष्कलंक शीलाला आज मी डाग लावला , तो देखील खोटा ! पण मी तरी काय करणार ? शारीरिक शिक्षा तर मी त्याना देऊ शकत नव्हते , पण त्याना तशीच सोडूही शकत नव्हते !” मनातल्या मनात वीणा विकासची , आपल्या पतीची क्षमा मागत होती . “ एड्स ची धास्ती आता त्याना जन्म भर छळत राहील ! कोणतीही व्याधी झाली तरी एड्स मुळे असेल या कल्पनेने उपचाराच्या वेळी उघड होइल म्हणून डॉक्टर कडे जायला हि घाबरतील !मरा लेको ! तुम्हाला अशीच शिक्षा हवी !आता बघाल का बाईकडे वाकड्या नजरेने ? माझ काय बिघडलं ? काहीच नाही ! आत गर्भाशय नव्हताच ! त्यामुळे मी सपशेल वाचले ! झाला तो फक्त एक अपघात ! मनावरून पुसायला थोडा वेळ लागेल इतकेच ! तिने मान झटकली . पाऊण तास वाया गेलां होता ! जाऊ दे ! एवि तेवी पहिली बस गेलीच आहे ! आता घरी जाउन स्वच्छ अंघोळ करावी, झकास नाश्ता करावा आणि मग च कामावर जावं झालं ! नवरयाला उशिराचे काय कारण सांगायचे याचा विचार करत ती संथ गतीने घराकडे निघाली,
---------------------------------------------------------------0-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------0------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिनला सांगुन ही कथा माबोवरुन काढुन टाका. इथले वाचक इतके उथळ नक्कीच नाहीत की कोणी काहीही लिहाव आणि इथल्या वाचकांनी ते एन्ज्यॉय कराव. स्वप्नांच्या पलिकडले नंतर इतकं वाईट वाचायला मिळेल अस नव्हत वाटल. Sad

स्वप्नांच्या पलिकडले तुमची कथा नाही हे मला माहित आहे. पण जी मुलगी आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांची सुंदर कथा इथे प्रकाशित करते, ती मुलगी इतक उथळ लिहित असेल अस वाटलं नाही

माझ्या प्रतिसादाने तुम्ही दुखावला गेला असणार हे समजुन मी आधिच तुमची क्षमा मागते. परंतु परत हे अस लिहु नका, हि विनंती.

..

बलात्कार म्हणजे एका अपघाताशिवाय जास्त काहीनाही हे सांगण्याचा वाईट प्रयत्न इतकंच म्हणता येइल..

अवघड आहे..
बलात्कार हा फक्त शरिरावर नसतो.
शरिराच्या जखमा ह्या तात्पुरत्या असतात पन जो mental trauma असतो तो खूप अवघड आणि खोल असतो.
लेखीकेला काय सांगायचे आहे हे काही कळल नाही बुवा...

Pages