अजून माजले नव्हते

Submitted by यःकश्चित on 27 May, 2013 - 02:33

अजून माजले नव्हते
===============================

शरदाचे चांदणे रात्री सोनियाच्या दिनी दिसते,
हातातल्या घड्याळाचे बारा अजून वाजले नव्हते

गॅस गहू नि गुळ सारे किती महागले होते
भुकेलेल्या मिळे न काही अजून भाजले नव्हते

पाण्यासाठी दौरे झाले आश्वासनेही बहु मिळती
तहानलेल्या पाणी कुणीही अजून पाजले नव्हते

कामासाठी खोदून रस्ता कामही झाले नव्हते
खड्ड्याचे या खोदक मात्र अजून लाजले नव्हते

काहींची मुळी खोड सुटेना खुर्चीस चिकटूनी बसणे
बुड त्यांचे काही केल्या अजून खाजले नव्हते

शांतीचा संदेश देई शांतीदूत वृक्षाखाली
अज्ञानी या दंगलखोरा अजून समजले नव्हते

कफनी टाकून काही व्यक्ती उपोषणी बैसले होते
लेऊन नुसती खादी कुणीही अजून गाजले नव्हते

त्या काहींनी रविचन्द्रांचा बोध जरासा घ्यावा
भ्रमून कोटी वर्षानुवर्षे ते अजून माजले नव्हते

-यःकश्चित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

....