माझ्या वडिलांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला मिळाला आहे. त्यांना १५ वर्षांपासून मधुमेह आहे. १.५ वर्षांपुर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता (डॊ. सांगण्यानुसार तो कमी तीव्रतेचा होता). पुण्यातला दोन डॊ. नी बायपासच करा असे सांगितले आहे, पण आम्हाला शस्त्रक्रियेनंतर त्यांना काही अडचणी येऊ शकतात का? एंजेओप्लास्टी करून फ़रक पडेल का? असे प्रश्न पडले आहेत.
वय - ५९
ब्लॊकेजेस - ८५%, ८५%, ९५% असे आहेत. डॊ. (कार्डियालॊजिस्ट) म्हणतात की जर ह्रद्य चालू असताना शस्त्रक्रिया केली तर अधिक चांहले, पण सर्जन म्हणतात की त्यानी फ़ार फ़रक पडत नाही. नेटवर मिळालेल्या माहितीनुसार ह्रद्य चालू असताना शस्त्रक्रिया केली तर मधुमेह व पक्षाघात झालेल्या व्यक्तींना अधिक फ़ायदेशीर आहे.
आयुर्वेदिक चिकित्सेने फ़रक पडू शकतो का?
सध्या साखर थोडी जास्त आहे, पण एन्शुलीन चालू केले आहे. तरी कोणाला याबाबतीत काही माहिती असेल तर इथे द्यावी.
बायपास सर्जरी
Submitted by ChaitanyaKulkarni on 26 May, 2013 - 06:21
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा