कन्फेशन

Submitted by तनवीर सिद्दीकी on 24 May, 2013 - 08:35

मला माहितीये की
'हुक्की' वेळेवर, एखाद्या मानसिकता तासाला
यमकांची धिंडवडे, निर्ढावलेली वृत्ते
आणि रेंगाळणाऱ्या भावना घेवून
वितभर कागदात पाचही इंद्रिये ओतली की
सहज होते कविता

मला हे पण माहितीये की
माझ्यात ''लोक काय म्हणतील वाचल्यावर ?''
उमजून लिहिण्याची अंधश्रद्धा पण नाहीये

पण मी लिहित आहे ते हा ''काळ'' बदलायला

जोपर्यंत तो बदलत नाही
तोपर्यंत माझ्या जुन्या कविता फक्त
लांबलचक होत जातील -
जात आहेत ही

(अधून मधून दैव आणि कर्म भांडण करतात या मुद्दयावर
असं ऐकलंय)

मला त्याचं काय ?

कसं आहे
मुळात मी 'नवीन' लिहिणारा माणूस नाहीये !!

तनवीर सिद्दीकी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा तन्वीरजी तोडलंत

नेहमीसारखेच हटके लिखाण
मलाही वाटत आलय की कवी म्हणून आधी आपण स्वतःतलं माणूस अन् त्याच्यातल्या कवितेला पक्कं ओळखायला हवय
मीही प्रयत्न करतोच
तुमचे प्रयत्नही योग्य दिशेने चालले आहेत हे जाणवते आहे

आवर्जून वाचावं असं आणि खूप वेगळं लिहिता तुम्ही आणि तेही अगदी आतून ... तेही सातत्यानं.....मला खूप आवडतं हे

खूप खूप शुभेच्छा

~वैवकु Happy

______________________________

(अधून मधून दैव आणि कर्म भांडण करतात या मुद्दयावर असं ऐकलंय)<<<सहजच माझा एक शेर आठवला

माझ्या गझला अन् माझ्यात बखेडा आहे
विठ्ठल नक्की कोणापायी वेडा आहे

...........................सहजच !............................
धन्स Happy