Submitted by रसप on 22 May, 2013 - 03:23
अबोलीच्या फुलांचे
तुझ्या-माझ्या मनांचे
घरांच्या अंगणांचे
कुणी ऐकायचे ?
छतांच्या झुंबरांशी
कड्यांच्या बंधनांशी
जवळच्या अंतरांशी
किती भांडायचे ?
स्मृतींच्या पाउलांना
पसरत्या सावल्यांना
तरल कातर छटांना
कसे वाचायचे ?
तुझे येणे न होते
तुझे जाणे न होते
तुझे असणे न होते
कधी सांगायचे?
इथे सारा पसारा
अनावर कोंडमारा
छुप्या पाऊसधारा
कसे टाळायचे ?
तरीही हाक द्यावी
उरी आशा रुजावी
नजर ओली थिजावी
कुणी समजायचे ?
....रसप....
२२ मी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post_22.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवड्ली
आवड्ली
मस्तचै..
मस्तचै..
वा रे जितू !! अप्रतीम
वा रे जितू !!
अप्रतीम लय
प्रत्येक कडवे एकेका शेरासारखी मजा देतेय
अख्खी कविता ज्जाम आवडेश
धन्स या कवितेसाठी
अजून काय बोलू ?
हॅट्स ऑफ् !!!!!
_/\_
स्मृतींच्या पाउलांना पसरत्या
स्मृतींच्या पाउलांना
पसरत्या सावल्यांना
तरल कातर छटांना
कसे वाचायचे ?
हं....चांगले प्रश्नोपनिषद..