ज्योतिष शास्त्रा संबंधी समज - गैरसमज

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 19 May, 2013 - 11:37

आज काल वरील दोन्ही विषयाबाबतीत योग्य - समजापेक्षा गैरसमज जास्त फोफावला व बोकाळलेला आहे. ह्याला कोण जबाबदार असेल तर त्या म्हणजे व्यक्ति आहेत. स्वत: जातकच. (पत्रिका दाखविणारा) ह्याचे मुळ कारण आहे स्वत:चा स्वत:वरचा आत्मविश्वास कमी असणे. असा विषय घेण्याचे कारण म्हणजे आज प्रत्येकाला मी सर्वांच्या पुढे गेले पाहिजे हाच अटट्हास असतो. त्या पायी तो आपल्या क्षमतेपेक्षा इतका धावतो की, त्यांची दमछाक होते हे त्यास कळत नाही. पण हीच खरी गोष्ट त्यास कळत नाही. दमछाक होण्याचे खरे कारण्‍ा आहे, ज्योतिष शास्त्रा बाबतचे अर्धवट ज्ञान. अशा अर्धवट ज्ञान असणार्‍या जातकासाठी काही महत्वाच्या माहिती वजा सूचना.
१) खरे तर ज्योतिष म्हणजे काय? ज्योतिष कशाशी खातात व पितात सामान्य जनतेस हेच माहिती नाही. म्हणून पहिले त्याचा अर्थ समजुन घेणे अत्यावश्यक आहे. ज्योति व ईष ह्या दोन शब्दांपासून ज्योतिष हे वाक्य निर्माण झाले आहे. ज्योती म्हणजे प्रकाश व ईष म्हणजे ईश्वरी संकेत. ज्योतिष म्हणजे हे एखाद्या अडचणीचे निदान करणारी पध्दत आहे (उदा- सोनोग्राफी वा एक्स रे वा सिटी स्कॅन हे जे काही आहे ते जसेच्या तसेच दाखविते तसेच ज्योतिष शास्त्र ही ज्या अडचणी आहेत तेच दाखविते पण त्यात काही बदल करीत नाही, कारण ज्योतिष शास्त्रही जातकाच्या आयुष्यात काही बदल करीत नाहीत)

२) जसे डॉक्टर काही अडचण असल्यास जसे काही उपाय सुचवितो तसेच ज्योतिषी सुध्दा तसेच उपाय सुचवित असतो. ज्योतिष्यात सुध्दा तीन (३) तर्‍हेचे उपचार आहेत.
दैवी आराधना वा उपासना, धार्मिक विधी वगैरे,
जप व तप क) रत्न-खडे व मंत्र (रत्न-खडे व यंत्र ह्याचा असर खुपच हळु प्रमाणात होत असतो. टिव्हीवरुन वा वर्तमानपत्राद्वारे ह्यातूनच खरी फसवणूक हल्ली जास्त प्रमाणात होत असते. हीच फसवणूक सामान्य माणसांच्या लक्षातच येत नाही. )

३) ह्या जगात दोनच जण भाग्य बदलू शकतात ते आहेत देव व सच्चा गुरू. आज काल टिव्हीवर वा वर्तमानपत्रात १००% भाग्य बदलून देण्याचे जे काही दावे केले जातात. ते दावे जवळ-जवळ खोटे आहेत, अशा व्यक्ति दोन-दोन दिवस ह्या शहरात तर उद्या दोन-दोन दिवस त्या शहरात असे गावो गावभटकत रहातात. ज्यांचा नीट ठाव ठिकाणा नीट माहित नाही. त्यांना योग्य ज्योतिषाचे सखोल ज्ञान आहे की नाही, ह्याची पुसटशीही कल्पना न घेता त्यांचे वर किती भरवसा ठेवावा ह्याचा ही विचार व्हावा. ज्यांचे दुकान एका ठिकाणी धड नीट चालत नाही तेच लोक गावो-गाव भटकत लोकांना फसवत असतात. कधी एखाद्याने अशा लोकांना प्रश्न करावा की, आपल्या भाग्यात दारोदार भटकण्याचा का बरे योग आहे? कारण फसवणुक झाल्यानंतर ओरडण्यात काहीच अर्थ नाही. पाणी वा सोने हे आपल्या जवळ कधीही येत नाही. उलट पक्षी आपणांस त्यांच्या जवळ जावे लागते.

४) नियम हा आहे की बाजारात काही खरेदी करतांना आपण आपल्या बुध्दीचा वापर करून काही खरेदी करत असतो, ज्यामुळे आपली कोणी फसवणूक करू नये हीच त्यामागची आपली भूमिका, पण धार्मिक वा ज्योतिषाच्या बाबतीत आपण बुध्दीचा वापर न करता ती कोठे तरी गहाण टाकुनच आपण त्याची पायरी चढत असतो असा आमचा जवळ-जवळ अनुभवच आहे.

५) तसेच प्रत्येक ब्राम्हणांस वा प्रत्येक ज्योतिष पहाणार्‍यास ज्योतिष समजते हा ही एक गैर-समजच आहे. उदा- जर आपणांस आयुष्यात १०० जण पत्रिका पाहाणारे भेटले तर त्यात ६० जणांना जुजबी माहिती असते. ३० जणांना ठीक माहिती असते. तर ११ जणांस चांगलीच माहिती असते. (आमच्या मते ६० म्हणजे कंपाउंडर, ३० जण एम.बी.बी.एस आणि १० म्हणजे एम.डी किंवा एम.एस) पितळ व सोने जरी रंगाने पिवळे दिसत असले तरी फक्त पारखीच फक्त पितळ व सोने ह्यातील फरक नीट समजु शकतो ह्यात काही शंकाच नाही.

६) ज्यांना आम्ही कंपाउंडर असे संबोधतो तेच लोक फक्त साडेसाती, लग्न जमवितांना पत्रिकेतील मंगळ, नाडी, गुण, वर्ग ४,८,१२ ह्या गुरूबलाचा आदी खुळचट न चालणार्‍या नियमांचा वापर करून सामान्य जनतेची फसवणुक करीत असतांना सामान्य जनता फसवणुक होऊनही शांत मुकाट कशी बसते हेच आमच्यासारख्याच्या समोर प्रश्न आहे. कारण नियम असा आहे की, डॉक्टरचे चुकीचे उपचार हे पहिल्यांदा रोग्याचाच जीव घेत असतो. हाही ह्या जगाचा पहिला नियम किंवा अनुभवही आहे.

७) ह्या जगात १००% तंतोतंत भविष्य कोणीही वर्तवु शकत नाही, हाच पहिला नियम आहे. जसे डौक्टर रोग्याचे जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. तसेच खरा अभ्यास असलेला ज्योतिषी सुध्दा आपला तर्क, अनुभव व दैवी उपासनेच्या आधारे जातकाच्या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ-जवळ जाण्याचा प्रयत्नच करीत असतो. पत्रिका पहाते वेळी

मुख्यत्वे दोनच गोष्टी पाहिल्या जातात.
एखादी घटना होणार आहे की नाही हे प्रथम पाहिले जाते.
दुसरी गोष्ट पाहतात ती म्हणजे जर ती घटना जर घडणार असेल तर कधी व कोणत्या वेळी तसेच कोणत्या पध्दतीने घडणार हे समजते. श्री.स्वामी विवेकानंदाच्या मते अती-आर्थिक संकट समयी तसेच ८०% प्रयत्न करून जर अपयश प्राप्त होत असेल तरच अशा दोनच प्रसंगी खरे तर असतात .

*****आधारित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक ज्योतिषी म्हणून, बर्‍याचश्या विधान्नान्शी असहमत, कारण त्यातुन गैरसमजच अधिक वाढताहेत.
१) अनुमोदन
२) अनुमोदन, मी देखिल खडे/रत्ने वगैरे सुचवित नाही, मात्र जातकाचा अतिआग्रहच असेल, वा त्यामुळेच त्याचेतील इश्वरीतत्व वाढीस लागणार असेल, तर अपवादप्रसंगी सुचवितो, पण मुख्य भर जातकाने स्वतः काधी आराधना करावी असेच सुचवितो.
३) बव्हंशी अनुमोदन, पण....
>>>> ह्या जगात दोनच जण भाग्य बदलू शकतात ते आहेत देव व सच्चा गुरू. <<<< इथे असहमती.
देव चराचरात आहे, तसाच तो व्यक्तिमधेही आहे. तो जागृत होण्यास काय कारण घडेल हे सान्गता येत नाही. जसे व्यक्तिमधे आसूरी शक्ति जाग्रुत होण्यास निमित्तमात्र पुरते, तसेच दैविक शक्ति जागृत होण्यासही येच निसर्गातील/चराचरातील दैविअस्तित्व कारणीभूत होऊ शकते. कुंडलीमधे तसा योग, किन्वा गुरूबल उत्कृष्ट असेल्, तर व्यक्ति भान्गेतील तुलसी प्रमाणे, वा ध्रुवबाळाप्रमाणे, अत्यन्त प्रतिकूल आसूरी संस्कारामधेही तग धरुन रहाते. त्याचबरोबर, हल्लीचे काळी तर "सच्चा" "शिक्षकही" मिळणे दूरापास्त तिथे "गुरू " काय मिळणार? तसेच केवळ एकच एक गुरू असे काही असते का? तर नाही. मात्र जातकाचे कुंडलीत चराचरातील अस्तित्वातिल सर्व शक्तितुन त्यान्ना गुरु मानुन काही एक ज्ञान घेण्याची क्षमता असेल, तर गुरुंच्या संख्येला बंधन नाही. मात्र सांप्रत काळी गुरू वगैरे मानणे हेच मागासले पणाचे लक्षण मानले जात असल्याने हा प्रश्नच निकाली निघतो. असो. असहमत अशासाठि की केवळ देव व गुरु भाग्य बदलत नाहीत, मूळात देव व गुरु मिळणे, मिळाल्यास ओळखता येणे, ओळखल्यास त्यान्चे प्रति आदर भाव असणे, आदर असेल, तर अन तरच त्यान्चे कडून ज्ञान ग्रहण होणे इत्यादी अनेकानेक बाबी अंतर्भूत असताना, व देव व गुरु चराचरात व्यापलेले असताना, भाग्य ते बदलतात की व्यक्ति स्वतःच्या कर्माने त्यान्चेप्रति जाऊन त्यान्चे मार्गदर्शन करुन घेते, तसा योग तिच्या कुन्डलित आहे वा नाही हे तपासावे लागतेच लागते. यादृष्टीने मात्र जातक स्वतःच जबाबदार असतो.
४) पूर्णतः असहमत.
>>> नियम हा आहे की बाजारात काही खरेदी करतांना आपण आपल्या बुध्दीचा वापर करून काही खरेदी करत असतो, <<< हे गृहितकच चूकीचे आहे. असेच जर असते, तर ज्योतिषाव्यतिरिक्तच्या जगातील बाकी सर्व क्षेत्रात कुणीच फसवले जात नाहीये असे दिसून आले असते, आहे का तसे?
>>>> पण धार्मिक वा ज्योतिषाच्या बाबतीत आपण बुध्दीचा वापर न करता ती कोठे तरी गहाण टाकुनच आपण त्याची पायरी चढत असतो असा आमचा जवळ-जवळ अनुभवच आहे.<<<<
याबाबतही असहमत. निदान मला तरी असा अनुभव नाही. उलट जातक दोनतिन ठिकाणी विचारणा करुन "सेकण्ड ओपिनियन" वगैरे घेऊनच तसेच सान्गितलेल्या पूर्वायुष्य / व भविष्याच्या बाबि यांचा अनुभव घेऊनच विश्वास ठेवायचा वा नाही हे ठरवितात. पूर्वीपेक्षाही हल्ली जातक जास्त चोखंदळ असतात असा निदान माझा तरी अनुभव आहे.
तसेच, या परिच्छेदात अप्रत्यक्षरित्या ज्योतिषी "फसवायलाच" बसलेले असतात व लोक स्वतःहून बुद्धि न वापरता फसतात असा जो सूर दिसतो, त्याचेशी मी पूर्णतः असहमत आहे.
५) बंव्हशी सहमत. टक्केवारीमधे फरक असू शकेल, पण सहमत. मात्र माझे दृष्टीने यात पुन्हा अजुन एक संदर्भ येतो, तो जातकाचे कुंडलीप्रमाणे, "त्यास" कोण भेटणार आहे वा त्यास उपरती होऊन तो नेमका कुठे जाणार, हे देखिल त्याचे नशिबच ठरवत असते असे नाही तुम्हास वाटत?
६) पूर्णतः असहमत
>>>>> ज्यांना आम्ही कंपाउंडर असे संबोधतो तेच लोक फक्त साडेसाती, लग्न जमवितांना पत्रिकेतील मंगळ, नाडी, गुण, वर्ग ४,८,१२ ह्या गुरूबलाचा आदी खुळचट न चालणार्‍या नियमांचा वापर करून सामान्य जनतेची फसवणुक करीत असतांना <<<<<
हे वाक्य वाचल्यावर, तुम्ही ज्योतिषाचे समर्थक आहात की छुपे विरोधक असा संदेह उपस्थित होतो. या कल्पनान्ना खरे तर सिद्धान्ताना खुळचट म्हणणे हे केवळ अन केवळ अन्निसवाल्यान्नाच शक्य आहे. पण याबाबत म्हणजे एकनाड/मंगळदोष/गुरुबल याबाबत अधिक काही बोलावयास्/सान्गावयास जाणे म्हणजे पुन्हा "वैज्ञानिक दृष्ट्या" सिद्ध करण्याची जबाबदारी जेव्हा की कोणत्याही शास्त्रशुद्ध पद्धतीने असंख्य जातकान्चा डाटा बेस तयार करुन मूळचे ज्योतिषशास्त्रीय सिद्धान्त पुन्हा एकदा कसोटीवर उतरवुन बघण्याची काडीचीही सुविधा नसताना, व ज्योतिषास केवळ आरोपीच्या पिन्जर्‍यात उभे केल्यावर यावर अधिक बोलता येणे संयुक्तिक नाही.
७) बंव्हशी सहमत.
>>>>> ह्या जगात १००% तंतोतंत भविष्य कोणीही वर्तवु शकत नाही, हाच पहिला नियम आहे. <<<<
मात्र या वाक्यात सुधारणा अपेक्षित, कारण तंतोतंत भविष्याची माझ्याच अनुभवातील जळजळीत उदाहरणे आहेत.
तेव्हा सर्वान्चे १००% तंतोतंत भविष्य एखादी व्यक्ति सर्वकाळ वर्तवू शकत नाही, किंबहूना, सृष्टीनियमातील तो अधिक्षेप ठरतो, ते होणे अपेक्षितच नाही. मात्र जातकाचे भविष्याचे दृष्टिने सावधगिरी म्हणून घटनेच्या जवळपास जाणारे ८०% ते ९०% पर्यन्तचे भविष्य कथन होऊ शकते. अर्थात असे होण्यास ज्योतिषाचा पराकोटीचा अभ्यास, याच बरोबर त्याची स्वतःची "साधनाही" तितकीच आवश्यक असते, उगाच दोनचार पुस्तके वाचून ज्योतिषी होता येत नाही हे देखिल तितकेच खरे. म्हणून वरील ५ क्रमांकाच्या टक्केवारीच्या मुद्यास मी अनुमोदन दिले होते.
असो.
रात्रच नव्हे तर दिवसही वैर्‍याचा असल्याने व हे वैरी ज्योतिषशास्त्र व ब्राह्मण यान्चेवर चिखलफेक करित असल्याने वरील दीर्घ पोस्ट लिहीली असे.

उदा- जर आपणांस आयुष्यात १०० जण पत्रिका पाहाणारे भेटले तर त्यात ६० जणांना जुजबी माहिती असते. ३० जणांना ठीक माहिती असते. तर ११ जणांस चांगलीच माहिती असते.

'चांगलीच' माहिती असणार्‍यांमधे हा जास्तीचा एक माणूस कसा घुसला, हे जाणून घेण्याचे योग माझ्या पत्रिकेत आहेत काय?

तो १ जण लिंबुभाउ आहे.............ज्ञानेश तुम्ही हे कसे विसरलात ???? Uhoh ...:खोखो:
.
.

http://www.maayboli.com/node/41758 इथे आम्ही वर्तवले आहेच भाकित
जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!

<<रात्रच नव्हे तर दिवसही वैर्‍याचा असल्याने व हे वैरी ज्योतिषशास्त्र व ब्राह्मण यान्चेवर चिखलफेक करित असल्याने वरील दीर्घ पोस्ट लिहीली असे.>>
अहो ही चिखलफेक खूप जुनी आहे जवळपास दीडहजार वर्षांपुर्वी
भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.

>>>>> 'चांगलीच' माहिती असणार्‍यांमधे हा जास्तीचा एक माणूस कसा घुसला, हे जाणून घेण्याचे योग माझ्या पत्रिकेत आहेत काय? >>>>> तो १ जण लिंबुभाउ आहे.............ज्ञानेश तुम्ही हे कसे विसरलात ???? <<<<< Lol Lol Lol अचूक निरिक्षण अन हजरजवाब

>>>>>.भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत. <<<<<<
या वेणीसंहार नाटकात न घाबरणार्‍या दुर्योधनाची पुढील गती काय झाली हे दिले आहे की नाही माहित नाही, पण नन्तरचा त्याचा अन एकन्दरीत कौरवान्चा संहारही काकतालिय न्यायाने फळास आला की काय? असो. याच न्यायाने, गीते मधे दिलेला कर्मफलाच्या सिद्धान्तासही "काकतालिय" न्यायच लावायला हवा, नै का? Wink असो

>>कर्मफलाच्या सिद्धान्तासही "काकतालिय" न्यायच लावायला हवा, नै का?<<
कर्मफलाच माहित नाही पण जन्मफलाबाबत मात्र काकतालिय न्याय लावायला पाहिजे. पहा ना माणसाच्या जन्माबाबत स्त्री बीज फलन करण्यासाठी असंख्य स्पर्मस पैकी कुणाला तरी योगायोगाने संधी मिळते व गर्भ धारणा होते. Happy

>>>> पहा ना माणसाच्या जन्माबाबत स्त्री बीज फलन करण्यासाठी असंख्य स्पर्मस पैकी कुणाला तरी योगायोगाने संधी मिळते व गर्भ धारणा होते <<<<
मग्ग क्काय? तिथेही रिझर्वेशन्स आणायचा विचार आहे की क्काय? Proud

जोक्स अपार्ट, स्पर्म म्हणजे जीवात्मा मानला जात नाही. जीवात्मा अर्थात अध्यात्म ओरडुन ओरडून सान्गते तो आत्मा हा स्वतंत्र विषय आहे, व कोणत्या आत्म्यास , कोणत्या स्पर्ममुळे तो स्पर्म कोणत्या गर्भाशयात रुजू घातलेल्या "जीवा"मधे "शिवा"चे स्थान मिळेल Happy , हे पुन्हा पूर्वजन्मकर्मफलच ठरवते असा निदान हिन्दूधर्मशास्त्राचा तरी विश्वास आहे.
तसे नस्ते तर आईबापही कोण हवेत, कोणत्या लखपती/करोडपती घरात जन्मास यावे वगैरे देखिल आधीच ठरवता आले अस्ते नै का? Wink

प्रत्येकालाच आपले भले व्हावे असे वाटत असते आणि त्यासाठी सुरुवातीला "श्री" लिहिण्यापासून ,ज्योतिषाकडून सल्ला घेणे ते अगदी अघोरी उपाय करणे येथपर्यंत जाणारे लोक आहेत .काम नाही झाल्यास ते यातील कशालाच दूषण देत नाहित . ज्योतिषी लोकांनी फार वाईट वाटून घेण्याची गरज नाही . ज्योतिष ,जादुटोणा आणि वैद्यकी विद्या मात्र कधिकधि तरी उलटतात त्याचा त्यांना त्रास होतो .स्वत:चयाच कुटुंबातील व्यक्ति अशी काही ग्रहदशा(अथवा व्याधि)घेऊन येते की त्याचा मानसिक त्रास होत राहातो .मग त्यांना वाटत राहाते हे ज्योतिष १०० टक्के खोटे ठरो .

if god cant change the destiny, a man cant recall what he has done in past life then what is the aim for a punishment for the cause he cant remember.
i am also a suferer from such things in my life but till date i have not got any person who can tell me by reading horoscope the resons, remedies.
i got so depressed that i have become now a days a person having no emotoins,
what it may be called as smashan vairyagya

@मधुकर .ज्योतिषातील कुयोग नेहमीच अचूक ठरतात ही एक विशेष दुर्देवी गोष्ट आहे .या जगात देव ,पूर्वकर्म आणि आत्मा या काल्पनिक गोष्टी आहेत .दु:ख हे प्रत्येक जिवाला आहे त्यातून कोणीही सुटलेलं नाही .एका मनुष्याने दुसऱ्याचं दु:ख हलकं करण्यासाठी झटलं पाहिजे .हेच अडीच हजार वर्षांपूर्वी एका महात्म्याने पिंपळाच्या झाडाखाली बसून शोधलं आणि सारनाथला सर्वांना सांगितलं .एकना एक दिवस तुम्हाला तुमची ग्रहदशा विशद करणारा भेटेल पण त्याचा उपयोग काय ? मी ज्यावेळी माझ्याकडचे पन्नास फोटो दुसऱ्याला दाखवायला जातो तेव्हा तो म्हणतो अगोदर माझे पाचशे पाहा !

mr. srd you are absolutly correct i have suffered too much from my 1972 came to the conclusion that this is written and i have to face it.
but as a human being i fill very sorry for this and unfortunately their is no one to whom i can share this.
so my curiosity is now is that why and what next so i am in search of a bhavishvetta.
but i got only proffessionals i am redy to pay but the person must be real one.

<< but i got only proffessionals i am redy to pay but the person must be real one. >>
खरा ज्योतिषी कोणता? हे कसे ठरवणार? लोक सोपा निकष लावतात. ज्याचे भविष्य आपल्याला पटले/ काही अंशी का होईना खरे झाले की तो खरा ज्योतिषी. ज्याचे तसे झाले नाही तो खोटा ज्योतिषी. एखाद्याच्या बाबतीत खरे झालेले दुसर्‍याच्या बाबतीत खोटे ठरु शकते. ज्योतिषा पेक्षा आपल्याला आपले मनोधैर्य उंचावणार्‍या हितचिंतकाची / समुपदेशकाची गरज आहे.

Mr.madhukar it is quite understandable the hardships you have been suffering and those ,i suppose,are not by your fault . a person is helpless at such discomforts . it seems that the fourth and or seventh house in your horoscope is severely afflicted .

मराठित अन शुद्ध देवनागरीत लिवा रे भो! Happy
एसार्डी, तुम्ही त्यान्ना अडीचहजार वर्षापूर्वीसारखेच पिम्पळाच्या झाडाखाली बसायचा सल्ला का देत नाहीत? कोणी दुसरा सल्लागार्/थोतान्डज्योतिषी भेटण्याची वाट बघणे तरी टळेल.

मी तरी माझ्याकडे येणार्‍या जातकान्ना उपाय म्हणून पिम्पळ/वडाच्या प्रदक्षिणा सान्गतो Happy

चांगले योग असलेल्या कुंडल्या घेऊन जातक आले की त्यांना जोतिष सांगणे हे सोपे ,आनंददायी आणि दोघांनाही सुखावह असते पण इतरांना 'तुझे काही खरे नाही ,वाटोळे होणार' हे कसे सांगणार ?मला येथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे तो असा -जर का जातकाचे संपूर्ण आयुष्य (जोतिष शास्त्रानुसार) त्याच्याच ग्रहदशेनीच ठरणार आहे तर लग्नासाठी कुंडलिमेलनचा खटाटोप कशाला करतात ?

>>>> पण इतरांना 'तुझे काही खरे नाही ,वाटोळे होणार' हे कसे सांगणार ? <<<<<
होय, हे सान्गणे अवघड असतेच असते, अन सु:स्पष्ट सान्गणे अपेक्षितही नसते, कारण भविष्य सान्गण्यामागिल मूळ कार्यकारणभाव जातकाची जिवितेच्छा वाढवणे हा असतो, न की त्याला निराश करणे. सबब पट्टीचा ज्योतिषी, तीच वाटोळे होऊ शकणारी घटना जरा वेगळ्या शब्दात आडमार्गाने सान्गतो, व जातकाकडून अपेक्षित आराधना करवुन घेतो जेणेकरुन त्यास त्या घटनेस सामोरे जाण्याचे बळ मिळेल. मात्र दरवेळेस असे होतेच असे नाही.
माझ्याकडे एक वीसेक वर्षाचा जवळच्या परिचयाचा मुलगा आला होता. त्याने आधीही अनेकान्ना हात्/कुन्डली वगैरे दाखविले होते. शेवटी अत्यन्त खात्रीने सल्ला मिळेल म्हणुन माझ्याकडे आला, हात बघितल्यावर छातीत चर्र झाले होते. मी काहीतरी थातुरमातुर सान्गुन, व अमुक कर तमुक कर वगैरे सान्गु पहात असताना त्याने स्पष्ट विचारले की जीवाला काय धोका आहे/गन्डान्तर आहे ते सान्गा. हातावरील रेषा सुस्पष्टपणे दाखवित होत्या की जीवाला अमुक वर्षी/कालावधीत धोका आहे. आकस्मिक घात/अपघात संभवतात. त्याने स्पष्टपणे विचारल्यावर मला सान्गणे भाग होते की अमुक रेषेच्या विशिष्टरित्या असण्यामुळे अमुक होऊ शकते. यावर त्याने उपाय काय असे विचारल्यावर त्याला त्याच्या हयात आईवडिलान्नी काही पुजापाठ/हवनादी करणे भाग आहे असे सान्गितले होते, तो उत्तरला की वडीलान्चा अजिबात विश्वास नाही. त्यान्चेकडून होणार नाही, तर मग काय करू? सबब त्याला महामृत्युंजय मन्त्राचा जप करायला सान्गितला होता. त्याने कितपत केला माहित नाही. ही घटना घडल्यावर लगेचच लिम्बीला सान्गितले होते की त्या मुलाचे असे असे आहे, आईवडिलान्नी लक्ष घातले पाहिजे अन्यथा कठीण आहे.
पुढे तो बेंगलोरला एरोनॉटिक्स इन्जिनिअरिन्ग शिकायला गेला, शेवटच्या वर्षाचि परिक्षा देऊन, मित्राच्या संगतीने, बाईक वरुन परत यायला निघाला, मागे बसला होता, रात्रीचे प्रवासात ट्रकने मागुन धडक दिल्याने हा जागच्याजागी मृत्यु पावला, मित्र वाचला. हा धक्का मला असह्य होता.

>>>>>> मला येथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे तो असा -जर का जातकाचे संपूर्ण आयुष्य (जोतिष शास्त्रानुसार) त्याच्याच ग्रहदशेनीच ठरणार आहे तर लग्नासाठी कुंडलिमेलनचा खटाटोप कशाला करतात ? <<<<<<
वरील सत्य घटनेला अनुसरूनच सान्गु पहातो, की कुंडलिमेलनाकरता वा अजुन कशाकरताही, मूळात जातक योग्य सल्लागार ज्योतिषाकडे जाईलच की नाही, गेलाच तर सल्ला मानेलच की नाही वगैरे अनेक बाबी देखिल पूर्वनिर्दिष्टच असतात. याच बरोबर असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरील असे न करता कर्म करत रहाणे हा देखिल हिन्दू धर्माचा मूलमन्त्र असल्याने व कर्म करण्यास विविध मार्ग/प्रकार जरतरच्या स्वरुपात उपलब्ध असल्याने व ग्रहदशा जरतर मधिल कोणा एका पर्यायाची निवड करण्याचे स्वातन्त्र्य जातकास जरुर देत असल्याने त्यातिल नेमका कुठला प्रकार अन्गिकारावा याचे मार्गदर्शनाकरता पुन्हा ज्योतिष/ग्रहदशा वगैरेचाच आधार घ्यावा लागतो असे माझे मत. जरतर चे स्वरुप पुण्यकारक/पापकारक कर्म अशा स्वरुपात असू शकते वा कित्येकदा मिश्र स्वरुपातही असू शकते. त्याचबरोबर व्यक्तिची तसेच त्याचे पूर्वजान्ची, हयात पालकान्ची पूर्वपुण्याई देखिल विधीलिखित ठरवत असते, वेळेस बदल घडवुन आणू शकते.
पण व्यक्तिगतरित्या, वरील धक्कादायक सत्यघटनेत सान्गितल्याप्रमाणे जेव्हा पूर्वसूचना देऊनही घटना घडूनच जाते, तेव्हा व्यक्तिगत हताशतेतून/दुर्बलतेमुळे असे म्हणावे लागते की हे सर्व विधीलिखित आहे, व हे असे घडणार हे आधीच निश्चित होते, आपण काय इश्वरी इच्छेच्याद्वारे चालविल्या जाण्यार्‍या कठपुतळी बाहुल्या वगैरे वगैरे. मात्र हे तितकेसे खरे नाही. भविष्य बदलता येते, त्यासाठी आवश्यक दिनचर्या/वागणूक याद्वारे पुण्यसंचय करुन नावडत्या भविष्याचे स्वरुपाची तीव्रता तर नक्कीच कमी करता येते.
असो.
कुंडलीमेलना विषयी नन्तर कधीतरी.

खरं आहे limbutimbu .कोणताही कुयोग हा जोडयोग असतो असं म्हणतात .१आई वडिलांकडे संपत्ती असते आणि मुलाच्या कुंडलीत सुखयोग असतो .२आईवडिलांना दु:ख आणि मुलाच्या कुंडलीत अपमृत्यु .आणखी एक प्रश्न -मुलाचा जन्म चांगल्या ग्रहमानावर (रवी लग्नात ,लाभात ,दशमात अथवा भाग्यात येईल असा)घडवण्यासाठी सिझेरिअन करवण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे .पण ओपरेशन थिअटर रिकामं नसलं की उशीर होऊन रवि बसतो व्ययात अथवा अष्टमात .मग होते चिडचिड .

>>>> मुलाचा जन्म चांगल्या ग्रहमानावर <<<<
हे मूदामहून करायला जाऊ नये असे माझे स्पःष्ट मत आहे.
मात्र, आजच अथवा एखाद्या दिवशी डॉक्टरने आधीच सूचविल्याप्रमाणे त्यान्चे मतानुसार सिझेरियन होणारच आहे असे असेल, तर त्या दिवसापुरते लग्न/राहूकाल इत्यादी बघुन वेळ ठरवायला हरकत नाही. कित्येक डॉक्टर स्वतःहूनच हा काळ तपासून घेतात.
पण या ठरविण्याचा "अतिरेक" करू नये, जसे की ज्योतिष्याच्या सल्ल्याने डॉक्टरने सिझेरियनची वेळ, खास करुन "दिवस्/तारीख" बदलणे! (सहसा डॉक्टर यास संमती देत नाहीतच). तो मूर्खपणाच ठरतो असे कालान्तराने सिद्ध होते. वैद्यकशास्तानुसार शारिरिक धोके याबाबतचे डॉक्टरचे मतच अंतिम असले पाहिजे.
सिझेरियनचा दिवस ठरवणे वगैरे उपद्व्याप करु नयेत, निसर्गाच्या व इश्वरी शक्तिंच्या कार्यक्रमात ढवळाढवळ करु नये हेच हितावह असते. स्वतः डॉक्टर देखिल (धन्दा खोलुन बसलेले अपवाद वगळता) शक्यतो नैसर्गिक प्रसुतीचाच आग्रह धरतात, तसा प्रयत्न करतात, व शेवटी अशक्य झाल्यासच ऐनवेळेस सिझेरियन ठरवतात. आधीचे सिझेरियन असल्यास त्याचीच शक्यता वाढते तरीही डॉक्टर शेवटपर्यन्त नैसर्गिक प्रसुतीचीच वाट बघतात, व आईचे/बाळाचे जीवाला धोका होतो आहे असे दिसल्यास मात्र सिझेरियन तयारित असतात/तसे करतात.

{पण व्यक्तिगतरित्या, वरील धक्कादायक सत्यघटनेत सान्गितल्याप्रमाणे जेव्हा पूर्वसूचना देऊनही घटना घडूनच जाते, तेव्हा व्यक्तिगत हताशतेतून/दुर्बलतेमुळे असे म्हणावे लागते की हे सर्व विधीलिखित आहे, व हे असे घडणार हे आधीच निश्चित होते, आपण काय इश्वरी इच्छेच्याद्वारे चालविल्या जाण्यार्‍या कठपुतळी बाहुल्या वगैरे वगैरे. मात्र हे तितकेसे खरे नाही. भविष्य बदलता येते, त्यासाठी आवश्यक दिनचर्या/वागणूक याद्वारे पुण्यसंचय करुन नावडत्या भविष्याचे स्वरुपाची तीव्रता तर नक्कीच कमी करता }

तुम्ही हे इतक छान सांगीतले आहे आणि १००% बरोबर आहे अस मला वाटते.माझी आई आम्हा भावंडाना एक वाक्य नेहमी सांगायची इथे शेयर करावे असे मनापासुन वाटते

"भाळी सुदामजीच्या विधीलिखीताने लिहले भीक मागावे
विधात्याने खोडुन लिह्ले भीक न मागावे"

त्यामुळे आपण चांगले कर्म करत रहावे बाकी सगळे विधात्यावर सोडावे.

कृपा, अगदी बरोबर. धन्यवाद.
"व्यक्तिगत दुर्बलता" हा शब्दप्रयोग करण्याचे कारण की आजही तो घटनाक्रम मला धक्कादायक वाटतो, व समोर काय घडणार आहे हे समजत असूनही, ते बदलविण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही/तेव्हा नव्हते, या दुर्बलतेची जाणिव होत रहाते.
त्या गेलेल्या व्यक्तिबद्दल, तिला निरनिराळ्या लोकान्कडुन गंडान्तराचे/जीवाला असलेल्या धोक्याबद्दलचे समजण्याचा "योग" येऊनही काहीही उपाय करण्याचे जमले नाही/राहून गेले/तितकी इच्छाशक्ति जागृत झाली नाही हे तिचे नशिब.
अन याकरताच, थोर संतमहात्मे जसे की गजाननमहाराज, श्री स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज इत्यादिक महापुरुषान्चे सामर्थ्य वंदनीय मानले गेले आहे की आजही त्यांचे कडे गेलेला याचक कधीही विन्मुख परतत नाही.

लिंबूशेठ,

तुम्ही आता "विधाता-२" असा चित्रपट काढा(च). भरपूर मटेरियल आहे.. मुळ 'विधाता' चित्रपटातील नायक देखिल आता येरवडा मध्ये आहे या कर्मधर्म संयोगाचाही चित्रपटात आवश्यक तसा वापर करता येईल तुम्हाला. माबो माध्यम प्रायोजक म्हणून आहेच आणि तुम्हाला पटकथा, चित्रकथा अगदी नट नट्या देखिल ईथेच माबो वर मिळतील..
(चित्रपटात संगीत हवे असेल तर मला संधी देऊ शकता..)
'झक्की' स्पाँसर करू शकतील- असेही त्यांना नेहेमीच काहितरी विधायक कामे करायची कळकळ असते- विधात्या ईतके विधायक काम दुसरे काय बरे असू शकेल..?

तेव्हा, लिंबू आप आगे बढो हम तुम्हारे पिछे है...........

.

1 cant type marathi so trying to express myself in tutifuti english
2. i am not in search of a jyotish who will tell me the bhavishya i like
3. actualy i am not interested in bhavishya only i want to know that why this happened, any remedi to avoid any future problems
4. i have conttacted many persons but they firstly talk about star in my kundali their position,etc which is beyond capacity to umerrstany a lay person, and sugeest to perform some remedies
5. so i am in search of a person who can told in black and white i have suffered too much so now in a position to heare truth what ever it may be.
6.if any body from all of you can suggest it

मधुकर ,तुमची जी काही दयनीय अवस्था झाली आहे आणि ज्याकाही प्रसंगातून झाली आहे त्याची फक्त कारण मिमांसा सांगणारा जोतिषी तुम्हाला हवा आहे म्हणजे पुढे असे प्रसंग टाळता येतील असे तुमचे मत आहे .बरोबर? प्रथम तुम्ही व्यावहारिक प्रामाणिकपणे चिकित्सा करा की यागोष्टींत मी चुकलो आहे का ?उदा: आर्थीक मामल्यात किंवा ऑफिसमध्ये कागदपत्र नीट न वाचता सह्या ठोकल्या आहेत का ? अशा ठिकाणी तुम्ही सुधारणा करू शकता . पण विनाकारण तुमच्यावर आळ येत असतील तर काय करणार ?

mr. srd thanks
i have not made any mistake, i am a law abiding ,non corupt govt servant my dept is proud of me thogh i am at very lower post my word is very cosiderable in the dept.
i have no problem at service place. nobody can raise a finger against me i have no enemy..
i am talking about up and downs in my personal life.

नमस्कार,
वरिल मधुकर ह्यान्च्या आणि लिम्बुटिम्बु ह्यान्च्या हि पोस्ट वाचुन विचारावेसे वाट्ते कि even though काहि चुका झाल्या असतिल, जसे थोडेफार arrogantly behaviour झाले असेल, त्यात हि नमते घेउन हि परिस्थितित काहि फरक पडत नसल्यामुळे, तर आणि आता चुकिचि क्शमा मागुन हि समोरचा माणुस आपल्याशि stubburn रहात असेल, मि म्हणतो तेच खर, असा वागत असेल, त्यात हि कुन्डलीत थोडा period खराब आहे, म्हणुन मन्त्र जाप करुन हि त्याच्या मनातिल आपल्या बद्दलच्या भावना हळुवार करता येत नसतील तर.....काय??? प्रेम आणि परस्पर विश्वास भरपुर असुन हि कुठलि तरि अद्रुश्य शक्ती दोघानाहि एकमेकापासुन दुर ठेवत असेल तर काय करता येइल,