मार्गदर्शन हवे आहे!!!!!!

Submitted by हर्ट on 19 May, 2013 - 11:20

नमस्कार.

मी इथे पुण्यात एक घर निवडले आहे. घराची जी खरी किम्मत आहे त्या किमतीच्या फक्त ६० टक्के किम्मत पेपरवर दाखवली जाईल आणि फक्त तेवढीच रक्कम चेकनी घराचे मालक स्विकारणार आहेत. बाकीची उरलेली रक्कम मला त्यांना रोकड द्यावी लागणार आहे. असे केले की कर वाचतो म्हणून घराचे मालक असे करीत आहेत. घर घेणे आणि ती घरे अशी विकणे हेच काम मालकांचे आहे. घर हे दाजी काका गाडगीळांनी बांधलेले आहे. घर अगदी नवनवीन.. सुंदर आहे पण घर विकत देण्याची ही पद्धत मला भावली नाही. कारण इतकी मोठी रक्कम एकतर रोकड द्यावी आणि तिचा उल्लेख कुठेच नसावा ह्यामुळे मी हा व्यवहार करु की करु नये अशा चिंतेत पडलो आहे.

अजून एक मुद्दा की मी जेवढ्याचे घर दाखवणार आहे तेवढ्याच रकमेच्या ८० टक्के मला गृहकर्ज मिळणार आहे.

तुमच्या मार्गदर्शनाची मला त्वरीत गरज आहे कारण मी वेळात वेळ काढून जेमतेम दिवसांच्या सुटीवर परदेशातून पुण्यात आलो आहे.

धन्यवाद जनहो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेऊ नये आणि काळा पैसा बनवण्यात मदत करु नये. अनेक चांगली घरं पुर्ण व्हाइट पैशात मिळतात.

अनुमोदन. तुम्ही बाहेरचे जग पाहिलेले आहात. ह्या गोष्टींना प्रोत्साहन देउ नये. अर्थात तुम्ही नाही घेतले तर काळा पैसा देउन घ्यायला अनेकजण रांग लाउन उभे असतील. बिल्डरचे काही बिघडत नाही पण तुम्हाला आवडलेले घर हातचे जाईल. बिल्डरशी बोलुन पहा.
कदाचित तुमची ट्रीप फुकट जाईल पण पुण्यात १००% व्हाईट घेउन घर देणारे (मोजकेच) बांधकाम व्यावसायिक आहेत.

कारण इतकी मोठी रक्कम एकतर रोकड द्यावी आणि तिचा उल्लेख कुठेच नसावा ह्यामुळे मी हा व्यवहार करु की करु नये अशा चिंतेत पडलो आहे>>> ह्यालाच ब्लॅ़ मनी किंवा काळा पैसा असे म्हणतात बी.
दाजीकाका गाडगीळ कंपनीने बांधलेले घर आहे. तर.
पण मालक इन्व्हेस्टर आहे.

पुण्यात जनरलीच फार कमी बिल्डर ब्लॅक मध्ये पैसे मागतात. त्यामुळे तुला पुर्ण व्हाइट व्यवहार देखील करता येइल.

द्यायचे की नाही द्यायचे पसन्द अपनी अपनी.
मी मात्र अशा बिल्डरकडे व्यवहार केला नाही.

नको घेऊस बी! एका मित्रानेही याच कारणास्तव घर घेण्याची प्रक्रिया लांबवली होती. अलिकडेच त्याने पुण्यात मनासारखे घर रीसेलमध्ये घेतले.

जर पुण्यात काळ्या पैशाचा व्यवहार न करता पांढऱ्या पैशात घर मिळत असेल तर जरूर तेच घ्यावे, आपले कष्टाने कमावलेले पैसे काळ्या व्यवहारात देवू नये. लोनसाठीपण तुम्हाला white moneyचे घर मिळत असेल तर जास्त चांगले, तुम्हाला लवकरात लवकर चांगले मनासारखे घर black money न देता मिळूदे, शुभेच्छा.