आई....

Submitted by आनंद पेंढारकर on 17 May, 2013 - 13:03

'मातृ देवो भव'
'स्वामी तिन्ही जगांचा'
वगैरे सुभाषितं पाठ होत असतानाच
'ते' आले सातासमुद्रापलिकडून
आणि तू त्यांच्या
मम्मी, मम्मा, मॉमच्या तालावर पावलं टाकत
दूर दूर जात राहिलीस, त्याच्यापासून
झालीस इन्स्पेक्टर, पायलट, मॉडेल वगैरे खूप काही
'आई' पणाचा बळी देऊन.......

आताशा जेव्हा वाटत असेल त्याला
तुझ्या मांडीवर डोकं टेकवून शांत झोपावं
तुझ्या वेणीच्या टोकाशी चाळा करत
तेव्हा तुझ्या बॉयकट केलेल्या केसांपर्यंत
नसतील पोहोचत त्याचे इवलेसे हात........
वाट्त असेल तुझ्या अवतीभवती बागडावं
तू स्वयंपाक करताना
तेव्हा तू ऑफिसमधून येताना आणलेलं भाजीचं पार्सल
रिकामं करत असशील भांडयात........
शाळेच्या गेटमधून आत शिरताना वाट्त असेल
पाणावल्या डोळ्यांनी मागे पहात
हात हलवावा तुझ्या दिशेनं
तेव्हा दिसत असेल काकांची रिक्षा वळून जाताना

हळूहळू वाटायला लागतील
पाळणाघरातल्या काकूच तुझ्यापेक्षा जवळच्या
तोच तुझ्यातल्या 'आई' चा पराजय असेल
आईवरची सुभाषितं पाठ करणं सोडून देईल तो हळूहळू
मम्मी, मम्मा, मॉम होऊन भोवती वावरणार्‍या तुला
वृध्दाश्रमात पाठवली उदया त्यानं
बायकोच्या सांगण्यावरून
तर देव बहुधा माफ करेलच त्याला
तूही कर.......
तेच समज प्रायश्चित्त
तुझ्या 'आई' पण विसरण्याचं....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

:|

व्हॉट नॉन्सेन्स !!
' आई मम्मी होतेय ' नावाची एक आली होती कविता , त्याच कॅटॅगरीतल अजुन एक कै च्या कै लिखाण !

"आई" कधीच बदलत नाही!
असो!
कविता आवडली नाहीच... पण विचारांचही विशेष वाटलं....

कठीण आहे...
नाही आवडली कविता...प्रत्येक शब्दाबद्दल राग.
किती अपेक्षेने आले होते, की आईबद्दल काही छानसं वाचायला मिळेल म्हणून...पण निराशाच झाली...असो . करीयरीस्टीक आई ही ''आई''पण हरवलेली असते हे कसं काय ठरवलंत तुम्ही मि. पेंढारकर?? विल यू प्लीज एक्स्प्लेन????

वा आनंदराव तुम्हाला हवा तो आशय बरोब्बर पकडलात चिमटीत

इथल्या काही स्त्रीयाना अर्थातच विषय आवडणार नाही हे उघड आहेच !!
विषय निवडलात बाकी चांगला !!

अभिनंदन !!

वरील सर्व विरोधकांचा कडाडून विरोध करीत आहोत !!!!

करीयरीस्टीक आई ही ''आई''पण हरवलेली असते हे कसं काय ठरवलंत तुम्ही मि. पेंढारकर?>>>>>> Lol

<<<,मातृत्त्व मेलेले असणे हरवलेले असणे व मातृत्त्वास मुकलेले असणे यातील फरक पेंढारकराना हातळता आलेला नाही हे खरे !!!

असो अनेक दिवसांनी टोकू कवितेच्या प्रांतात दिसतेय

एवढा राग येण्याचं मला वाटतं काही कारण नसावं. ज्या स्त्रिया करीयर सांभाळून 'आई' पण कायम ठेवतात त्यांच्याबद्दल नाहीच आहे ही कविता.

तरीपण एवढया प्रतिक्रिया आल्या म्हणजे कविता परीणामकारक झालीय आणि वाचणार्‍यांना भिडलीय एवढं नक्की !

आणि शेवटी मी पाळणाघरातल्या मुलांची जी घुसमट पाहिलीय त्यातून तयार झालेलं हे माझं मत आहे. प्रत्येकाचं वेगळं असायला काहीच हरकत नाही.

असो
पेंढारकर मी तुमच्यासोबत आहे

मला तुमच्या लेखनातली ५० -६०% भाग सहमतीस योग्य वाटला
विषयामागची तळमळ पोचली

बाकी या बाय़का बघा जराकुठं कुणी त्यांच्या विरोधात बोलतय म्हटलं की कशा एकत्र येतात आपण पुरुष असं करत नाही ना म्हणून फावतं यांचं !!

असो
पेंढारकर मी तुमच्यासोबत आहे

वैभवा मी रोमात असतेच रे कविता प्रांतात. आज इथे प्रतिसाद देणे टाळू शकले नाही एवढेच.
मातृत्त्व मेलेले असणे हरवलेले असणे व मातृत्त्वास मुकलेले असणे यातील फरक पेंढारकराना हातळता आलेला नाही हे खरे !!!>>>>>> तेच म्हणायचे आहे ना मला...
बाकी या बाय़का बघा जराकुठं कुणी त्यांच्या विरोधात बोलतय म्हटलं की कशा एकत्र येतात आपण पुरुष असं करत नाही ना म्हणून फावतं यांचं !!>>>>>>> अन तुम्हाला कुणी अडवलय म्हणे????

बाकी स्त्री आई असते म्हणून तिलाच या कवितेचा राग येइल असे काही नाही ना, पुरूष वर्गालाही येऊ शकेल, अर्थात जर त्यांच्याकडे आपली बाळं इतरांच्या हाती सोपवून कामाला जाणार्‍या आईची मानसिकता समजून घेण्याची क्षमता असेल तरच!
आनंद पेंढारकरांच्या बाबतीत सगळा उजेडच आहे...इतर कुणाला कळणेही फारसे सोपे नाही, असो. शेवटी जावे त्यांच्या वंशा....

ए मामी गप ना आता स्वतला किती भारी समजाय्चा ते !!!
पेंढारकराना येवढं घालून पाडून बोलायची गरज नैये काय समजलीस काय मामे !!!

अरे वा, डायरेक्ट दमदाटी! ती ही कोणा तिसर्‍याच कडून! का बुवा? तुम्ही तुमची मतं मांडावीत आणि आम्हाला नाही पटली तरी आम्ही निषेध नोंदवू नये काय?

पेंढारकरांवर वैयक्तिक हल्ला कोणीही केलेला नाहीये. विरोध आहे तो कवितेत नोंदवलेल्या अति-पारंपारिक विचारांना. आई, पत्नी, मुलगी, सून असल्या भुमिकांना एकाच साच्यात बसवून त्यांनी त्या तशाच पारंपारिक पद्धतीनं पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणं आजच्या काळाला अनुसरून आहे का? तिनं एक स्त्री म्हणून आपलं आभाळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ती 'आई'पणाच्या व्याख्येत बसत नाही असा टाहो फोडण्याची मानसिकता पाहून चिडचिड होईल नाहीतर काय!

समजलं तर ठीक आहे, नाहीतर सोडून द्या. आणि उत्तरं द्यायची असतील तर सभ्य शब्दात दिली तरच पुढचे मुद्दे मांडण्यात येतील नाहीतर सपशेल दुर्लक्ष केलं जाईल.

दुर्लक्ष कर नै तर काही क॑र जा !

तुम्हा बायकाना फक्त सहानुभूती हवी
कौतुके हवीत

कुणी जरा नाराजी दाखवली तर काय चुकलं

तसेही पेंढारकरांचे मत ५०-६० % पटण्यासारखे व जरासे चुकीच्या पध्धतीने हाताळले गेलेय असे मी म्हटलेच

तुम्ही बायका उगाच्च कालवा जास्त करताय

कै च्या कै

नोकरी करुन मुलांचे व्यवस्थित पालणपोषण करण्यार्या स्रिया पाहण्यात आहेत
बाँबकट केला म्हणजे आईपण कमी होत असे काही आहे का

टिपीकल इंडियन मेंटॅलिटी
बाबा दिवसभर बाहेर असला तर ते बरोबर, पण आई घराबाहेर पडली की यांच्या पोटात शुळ.
मुलं काय फक्त आईची असतात काय?
इथले सर्व बाबेलोक सांगु शकतील की ते दिवसभर काम करत असले तरी त्यांचे पिल्लं त्यांना भरपुर जीव लावत असतील. मुलांसाठी आई-बाबा सर्वस्व...
काही झालं तरी आई ती आईच. Happy
असो बाळबोध कविता. तुम्हाला शुभेच्छा Happy

आनंदराव कुठे गायबले ब्वॉ !!!

आनंदराव एक फुकटचा सल्ला देवू का : तुम्ही जे लिहिताय त्याच्याशी ठाम असणे व ती बाब सर्व ताकदीनिशी डिफेंड करता येणे/ समोरच्यास पटवून देता येणे हे साहित्यिकासाठी अत्यावश्यक आहे
म्हणून् जेही लिहाल ते १० वेळ विचार करून लिहावे

असे शेपूट घालून पलायन केल्यासारखे वागू नये ............
( आय हॅव ऑब्सर्वड् ~गझल विभागात की तुम्ही तुम्हाला आलेल्या प्रतिसादावर भाष्य करणे म्हणजे मूर्खांच्या नादी लागल्यागत आविर्भाव असतो तुमचा ! तुम्ही सहसा कोणास अंगाला लावून घेत नाहीत ~असे म्हणण्याची पद्धत असते गैरसमज नसावा :)~हे चुकीचे आहे )

यापुढे जरा लक्षात असूद्यात !!!

बाकी माझा चांगला विरंगुळा झाला आहे...इतरही काहीजणांचा झाला असावा Proud
हे म शे पो Happy