मला मदत करा

Submitted by सकु on 17 May, 2013 - 00:56

नमस्कार,
मी सारिका, माझा नन्देचा मुल्गा १८ वर्शाचा आहे. त्याला आई- वदिल नाहित . ते लहान्पनिच गेले . त्यामुले तो आम्च्यकदेच राह्तो. pan atiladane to bighadla , aani khota bolne, chorya karne ase prakar ghadu lagle. to 10th fail aahe. to ekathikani nokrila lagla tar aata tyane tithun 2.5 lakh rs chorle aani baar madhe udhalle. tyacha tras aamhala hoto . police aani tya mansane aamchyakadun te paise vasul kele. tyala sudharvnyasathi kahi madat milu shakel ka. kahi sevabhavi sanstha madat kartil ka

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

tyala sudharvnyasathi kahi madat milu shakel ka. kahi sevabhavi sanstha madat kartil ka

कठिण आहे, आपण मदत त्यालाच करु शकतो ज्याला स्वतःला मदत हवीय. इथे मुलाला आपण चुक करतोय हेच माहित नाही तर त्याला मदत कोण काय करु शकणार? हे काही व्यसन नाही ज्यापासुन त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतील.

त्याला पाठिशी घालणे बंद केलेत तर फरक पडेल. कोणीच सोडवायला नाही म्हटल्यावर तो असले धंदे एकतर बंद तरी करेल किंवा एकदा आत तरी जाईल. जोपर्यंत त्याला संभाळून घेणारे आहेत तोपर्यंत तो मनमानी करत राहणार. अतिलाडाने बिघडलाय म्हणताय तर आता तरी लाड बंद करा. त्याच्या हितासाठी मनावर दगड ठेऊन निर्णय घ्या.

आईवडील नाहीत म्हणजे त्यामुलाकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं होतं. की तुमच्याकडे येण्या अगोदरपासून तो बिघडलेला होता?
एखाद्या बाल सुधारगृहात चौकशी करून त्याला तिथे घाला. त्याच्याशी मन मोकळे पणाने बोलून तो जे करतोय ते योग्य नाही हे ठसवण्याचा प्रयत्न करा. तो तसा वागला तर फक्त त्याचंच नुकसान होईल हे हि पटवून द्या.

एखाद्या बाल सुधारगृहात चौकशी करून त्याला तिथे घाला.

१८ पुर्ण झालीत गं त्या मुलाला.

आईवडील नसल्याने मुलाचे जास्तीचे लाड झाले, त्याने तो बिघडला. त्याचा त्रास घराला होतोय. पण आता त्याला वळणावर आणण्यासाठी कठोर भुमिका घेतली तर नातेवाईक आणि इतर लोक्स टीका करणार. सकु यांच्यापुढे गहन प्रश्न आहे. त्यांनी नातेवाईक आणि इतर लोकांचा विचार न करता फक्त मुलाचा विचार केला तर दोघांनाही फायदा होईल, नाहीतर दोधांनाही आयुष्यभर त्रास. Sad Sad लोक तर बोलत राहणारच.

Thanks,

aamche sagle prayatna karun zhhalet. Tyachyashi bolun pan zhaale, marun pan zhaale. pan to aata kodga zhaalay tyachamule tyachyawar kaslach parinam hot nahi. Mhanun mhatle shikat nahi tar kamit kami nokri tari karel. pan tithe tyane ha gondal ghatla. Mhanun jasta bhiti watte , actually to hya level la jail he pan aamhala unexpected hote. aaata tyal kuthe jobla lavayla pan bhiti watte. tyamule kay karave hach prashna padlay.

सॉरी टू से, पण काही जणं जन्मजात गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू शकतात.

माणसाने परीस्थितीमुळे गुन्हा केला तर समजू शकते. जेव्हा त्याला त्याच्या गुन्ह्यांचा पश्चात्ताप होईल तेव्हाच तो सुधारणेच्या दिशेने पाऊल टाकू शकेल.

hmmm te hi kharach aahe , pan aata ha 2.5 lakhs chha eivdha motha loss zhalay ki aamhi saglech shock madhe aahot. aani saglyachyasamor motha prashnachinha aahe, ki aata kay? . kahitari tar kelech pahije, nahitar to ajun motha gunha karel. Navra mhanto ki tyala aapan baher kuthe tari job la lau mhanje out of mumbai. Pan mala he palwat watte. Baher rahun tar konachach laksh nasel tyachyawar to ajun bitherel, samjat nahi kay karayche. ithe thewayla bhiti watte ki hyane ajun kay problem kela mhanje.

tyala sudharvnyasathi kahi madat milu shakel ka. kahi sevabhavi sanstha madat kartil ka>>>

सकु, तुम्ही त्या मुलाला काऊन्सेलरला दाखवू शकता.

तुम्ही मुंबईत राहता असे तुमच्या प्रोफाईलमधे लिहिलेले आहे.
अंधेरीला डॉ. हरीश शेट्टी आहेत आणि ठाण्यात डॉ. आनंद नाडकर्णी आहेत.

councellingcha upay yogya wattoy, pan nakki kay kartat te lok . aaapan jase samjavto tasech sangat astil na ? actually mala idea nahi hya procedurechi mhanun vichartey. Thanks

आता तो लहान नाही त्याच्याशी संबंध ठेवू नका त्याला आश्रय पण देऊ नका
दुनियादारी बघितली कि येईल जागेवर

संबंध ठेऊ नका म्हणजे काय करायचं? त्याला घराबाहेर काढायचं का? तो सारिका यांच्या नणंदेचा मुलगा आहे .त्याचे आईवडील लहानपणीच वारले आहेत आणि लहानपणापासून तो त्यांच्या घरीच राहत आहे असे त्यांनी लिहिले आहे ना ?

एकतर तो सज्ञान आहे,त्याने २.५ लाख चोरले आणि बार मध्ये उडवले, मग पोलिसांनी तुमच्या कडुन का वसुल केले? त्याला का नाही धरलं? (गडबङ जरुर आहे)

police aani tya mansane aamchyakadun te paise vasul kele.>>>>

त्या माणसाने वसूल केले असं लिहिलंय.
वैभव, तुझ्या वाचण्यात गडबड जरूर आहे Proud

त्या माणसाने वसूल केले असं लिहिलंय.>>>>>>> मंजे अगं तेच मी म्हणतोय, ते पैसे यांनी यांच्यासाठी वापरले नाहीत, बरं त्यातल यांना काही माहीती नाही, मग ते यांनी दिले का?

माझ्या मते नोकरीच्या ठिकाणी याने चोरी केल्यावर तिथल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केलीच असेल. पोलिसांनी त्या गोष्टीवरून त्याला पकडले ही असेल पण या लोकांनी ( मुलाच्या मामाने ) त्याने चोरलेले पैसे ज्या ठिकाणी तो काम करत होता त्यांना दिले असतील त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे मिळाल्याने त्यांनी कम्प्लेंट मागे घेतली असेल . आत्ता यांच्या पुढे प्रश्न याच काय करायचं.? म्हणून सारिका त्याला मानसोपचार तज्ञाला जरूर दाखवा

२.५ लाख चोरण्याची हिंमत होणे आणी ते बार मध्ये उडवणे सामान्य गोष्ट नाही, म्हणजे त्याची मानसिक स्थिती किती दणकट आहे हे समजेल, मन वळविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरतील, शिक्षेनेच सुधारु शकतो

२.५ लाख चोरण्याची हिंमत होणे आणी ते बार मध्ये उडवणे सामान्य गोष्ट नाही, म्हणजे त्याची मानसिक स्थिती किती दणकट आहे हे समजेल, मन वळविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरतील, शिक्षेनेच सुधारु शकतो>>>>>>>
ho pan ti shiksha kay asavi ? gharatun baher kadhnyachahi prakar karun baghitla, don ,tin divas mitrankade rahun parat yeto, mag parat aathavdabhar changla vagel, mag parat ye re mazhya maglya. sambandh tar todu shakat nahi..

aani ho te 2.5 lakh , mag aamhi madhyastshi ghalun 1.2 lakh var mamla niptavla, karan tya mansane mazya sasryanach dharun nele policestation madhe.

tyamule gharatun haklun dile aani hyane parat kay mothe kand kele mhanje? te crime diary pahun nako nako tya shanka yetat manat.
hya saglya pratisadatun ekch goshta lakshat yete ki tyala sudharna karayche upay samplet phakta ek councelling tevdhe rahilay, baguya te pan karun

aani ho te 2.5 lakh , mag aamhi madhyastshi ghalun 1.2 lakh var mamla niptavla, karan tya mansane mazya sasryanach dharun nele policestation madhe>>>>>>>>>>>>>>>>>> हे तुम्ही अगोदर सांगितले नव्ह्ते

because that is not important, tyane chori keli, ti pan 2.5 lakhachi aani te paise baar madhe udawale . aani tyacha bhurdand aamhala basla he important aahe. aani mazha prashna asa hota ki tyala sudharnyasathi aamhi kay karu shakto. karan yevdhi mothi chori ha aamhala pan shockch hota aani aata seriously vichar karnyachi vel aali hoti, aataparyant aamhi thik aaahe ,lahan aahe , sudhrel , job la lagla mhanje sudherel ase vatat hote. pan ghadle niralech.

त्याच्या मित्रांवर हि लक्ष ठेवाव लागेल . त्याचे मित्र कसे आहेत?. त्याला बार मध्ये जाण्याचा व्यसन लागल आहे का ? तुम्ही त्याला महिन्याला खर्चायला किती पैसे देता ? बार मध्ये जाण्याच व्यसन लागल कि पैसे पुरत नाहीत आणि पैसे चोरायची दुर्बुद्धी सुचते.
पियु परी बरोबर आहे . सकु देवनागरी लिपीत लिहिणार का ? म्हणजे मग वाचायला त्रास होत नाही

त्याला कुणाची संगत आहे ते बघा बरं. असले प्रकार संगतीनेच होतात.
त्याला स्वतःहून काही उमज पडेल तरंच, आणि त्यासाठी त्याच्या मनावर प्रभाव पाडेल अशी एखादी व्यक्ती तूम्हाला सापडायला हवी.
त्याला एखादी आत्ये / मावस बहीण आहे का ? कदाचित तिच्या समजावण्याने काही फरक पडेल.
वर सुचवलेले डॉक्टर्स नक्कीच मदत करतील. त्याला त्यांच्याकडे थेट नेण्याआधी तूम्ही बोललात त्यांच्याशी तर जास्त चांगले. त्यांनी तूम्हाला विचारलेल्या प्रश्नातूनच तूम्हाला दिशा मिळेल. त्यामूळे त्वरेने त्यांची भेट घ्या.

>>ani ho te 2.5 lakh , mag aamhi madhyastshi ghalun 1.2 lakh var mamla niptavla, karan tya mansane mazya sasryanach dharun nele policestation madhe>>
तुमच्या सासर्‍यांनी काही गुन्हा केला नाहीये मग त्यांना कसे धरुन नेले? हे बेकायदेशीर नाही का? तुम्ही त्या वेळी मध्यस्ती न करता ठाम रहायला हवे होते. सासरे सिनीयर सिटीझन, त्यांनी काही गुन्हा केला नाहीये अशा परीस्थीत पोलीस त्यांना अटक करु शकत नाहीत. मुलाच्या बाबतीत त्याला जेवढा पाठीशी घालाल तेवढा तुम्हाला त्रास होणार. १८ वर्षांचा मुलगा चोरी करुन पैसे बार मधे उधळत असेल तर त्याला त्याचे परीणाम भोगू द्यायचे. पोलीसांनी केस केली असती. तुम्ही समुपदेशनचा प्रयत्न करुन बघू शकता. पण त्याला स्वतःला सुधारायचे असेल तरच त्याचा उपयोग होईल. त्याने गुन्हे करायचे, तुम्ही सगळे निस्तरायचे हे असेच सुरु ठेवलेत तर तो सुधारणे कठीण आहे. अजून एक म्हणजे तुमच्या स्वतःच्या आर्थीक सुरक्षिततेसाठी ' त्याच्या कुठल्याही आर्थीक व्यवहाराना तुम्ही जबाबदार नाही' अशी वकिलामार्फत नोटीस देता येइल.

marathit lihilyane ajun tras hoil wachayala . joke a part , प्रयत्न करते. खरे तर माझ्या सासुने खुप लाड केलेत. त्याची संगतच खराब आहे. डॉ आनंद नाडकर्णी ना फोन केला होता , पन ते august मधे available आहेत. त्यानि डॉ अन्घा वझे यान्चि appointment दिलि आहे ति पन १० जुनचि.

मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर युवा गुन्हेगारांच्या पुनर्वसनाबद्दल माहिती आहे.
http://mumbaipolice.maharashtra.gov.in/initiatives_rehabilitation.asp

समुपदेशनाच्या जोडीला जर या मुलाला पैसे कमावायचा योग्य मार्ग व कौशल्य मिळाले तर तेही चांगलेच होईल.

त्यात त्यांनी कोणकोणत्या सेवाभावी संस्थांच्या मदतीने गुन्हेगार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचे पुनर्वसन केले आहे त्यांची यादी आहे (त्यांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण इ.) :

त्यात युवा परिवर्तन नामक संस्थेचा पत्ता मिळाला.

Yuwa Privartan : http://www.yuvaparivartan.org/whatwedo/index.php (यांची मुंबईतही केंद्रे आहेत)

पोलिस स्टेशन्स तर्फे युवा गुन्हेगारांची अशा एनजीओजना पुनर्वसनासाठी शिफारस केली जाते. त्या ठिकाणी त्यांना अर्थार्जनास योग्य असे प्रशिक्षण मिळते. युवा परिवर्तनच्या खेरवाडी येथील केंद्रात असे प्रशिक्षण दिले जाते.

या सर्वाची तुम्हाला नीट चौकशी करायला लागेल. मी नेटवरून फक्त माहिती काढली आहे. परंतु त्या माहितीची शहानिशा करून त्यानुसार तुम्हालाच कार्यवाही करावी लागेल.

त्याला कुणाची संगत आहे ते बघा बरं. असले प्रकार संगतीनेच होतात.>> +१ तो कुठे/कोणाबरोबर जातो त्यावर लक्ष ठेवा... त्याला चांगली संगत लावा... या वयाच्या मुलांना वडिलधार्यामडंळीपेक्षा मित्रांचे बोलणे खरे वाटते... तुम्ही सर्वजण त्याला लेक्चर देवू नका.. त्याला वाचनाची/ फिरणाची आवड लावा (आता या वयात कठीण आहे.. पण जे त्याला चांगले आवडतं त्या विषयाचे वाचन... क्रिकेट, सिनेमा)
त्याचे मन रमवा, त्याला चूक काय/ चांगल काय हे नीट पटवून द्या..

खरे तर माझ्या सासुने खुप लाड केलेत. त्याची संगतच खराब आहे. >> सासू-सासर्यांचे मत काय आहे? १.२ लाख भरल्यावर त्यांना वाटतय का की काहीतरी वेगळे (जसे कौन्सेलिंग) त्या मुलाच्या भविष्यासाठी करायला हवे? नाहीतर तुम्ही एवढी कळकळ दाखवताय ते सर्व पाण्यात. आधी तो खुंटा भक्कम करा. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत त्या मुलाला आणि तुमच्या कुटुंबाला एकूणच थोडा त्रास होणार. पण त्याला तो चान्स देणे ही माणुसकी. त्याला घराबाहेर काढणे, त्याच्याशी सम्बन्ध तोडणे इ इ ह्या तुम्ही म्हणता तशा पळवाटा.
कौन्सेलिंगच्या प्रक्रियेत 'समजावून सांगणे' हा प्रकार फारसा नसतो. आधी त्याला समजून घेणे (लाड केले तरी सासूचा भावनिक आधार त्याला वाटत असेल असे नाही इ इ अनेक त्याच्या मानसिकता) आणि मग त्याला पुढील आयुष्यास सक्षम करणे अशी थोडी वेळखाऊ प्रक्रिया असते पण चांगली असते. त्यातही अप्स-डाऊन होत राहतात. पण यश मिळेल ही शुभेच्छा!!

मुलाच्या बाबतीत त्याला जेवढा पाठीशी घालाल तेवढा तुम्हाला त्रास होणार. १८ वर्षांचा मुलगा चोरी करुन पैसे बार मधे उधळत असेल तर त्याला त्याचे परीणाम भोगू द्यायचे. पोलीसांनी केस केली असती. तुम्ही समुपदेशनचा प्रयत्न करुन बघू शकता. पण त्याला स्वतःला सुधारायचे असेल तरच त्याचा उपयोग होईल. त्याने गुन्हे करायचे, तुम्ही सगळे निस्तरायचे हे असेच सुरु ठेवलेत तर तो सुधारणे कठीण आहे. अजून एक म्हणजे तुमच्या स्वतःच्या आर्थीक सुरक्षिततेसाठी ' त्याच्या कुठल्याही आर्थीक व्यवहाराना तुम्ही जबाबदार नाही' अशी वकिलामार्फत नोटीस देता येइल...................अगदी खरे आहे!
आज नकळत का होईना लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्याच्याशी या बाबतीत संबंध तोडलेले बरे!
तुम्ही त्याचे समुपदेशन वगैरे जरुर करा. पण जो एवढी मोठी चोरी करून त्याचा विनियोगही करु शकतो. तसेच
घरचे लोक हा प्रॉब्लेम सोडवतात म्हटल्यावर त्याची हिंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औषदाची गोळी कडू असली तरी देने भाग असते.