निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळ्यात मेणही असते मम्हणे. मी लॅक्मेत होती तेव्हा बीज वॅक्स हा लिप्स्टिकमधला एक घटक आहे हे फक्त वाचलेले रेसिपीत. पण खरे बीज वॅक्स कधी पाहिले नाही. तुला दिसले का गं??

जयू
भावाचं घर(हो ते मोठ्ठं बेलाचं झाड वालं, आणि संपूर्ण सभोवताली ७/८ नारळाची झाडं) आणि पलिकडे गाडगीळ(पी एन जी वाले) यांचं घर. या दोन घराच्या मधूनच पुरोहित शाळेत जावं लागतं. हो बेलाचं झाड आहे तेछोटं गेट.
असो.
आज सकाळी ६ वाजता गच्चीत चकरा मारत होते तर एक काळा मोठ्ठा पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे उडत गेला. चांगली मोठी चोच. पुढे थोडा बाक . आणि चोचीत काड्या! करकोचा/ मोठा बगळा यापैकी असावा. बर्‍यापैकी खालून उडत गेला. वाटलं.. अर्रर्र.....नेमका कॅमेरा नाही. मी चकरा चालूच ठेवल्या. पुन्हा १०/१५ मिनिटांनी तोच सीन. एक काळा मोठ्ठा पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे उडत गेला. चोचीत काड्या वगैरे.
मग वाटलं अरे मधेच खाली जाऊन कॅमेरा आणला असता तर..............
आणि असं १०/१५ मि. अंतराने ४ वेळा झालं, प्रेत्येक वेळी मला वाटलं, झाल,, हीच शेवटची फेरी असेल पक्षाची आता कशाला दिसतो तो परत!
मग हा पक्षी पूर्वेकडून परत उलटा जाताना दिसला नाही. मग पूर्वेकडे जाणारे ते ४ वेगवेगळे पक्षी असतील का?
मग म्हणजे एकदम मोठी वसाहत बांधण्याचं काम चालू असेल का कुठे?
कारण जर तो एकच पक्षी होता असं मानलं तर तर तो परत जाताना दिसला नाही. फक्त पश्चिमेकडून पूर्वेकडेच जाताना दिसला.
का काड्या घेऊन जाताना माझ्या गच्चीवरून गेला आणि परत जाताना दुसर्‍या मार्गानेच गेला म्हणून मला दिसला नाही?
उत्तर द्या.

आज दिवसभर लोडशेडींग है क्या तुम्हारे यहा???? >>>>>>>>>
नाही गं साधना........पक्ष्याच्या शेवटच्या फेरीच्या आधी तरी खाली जाऊन कॅमेरा आणण्याची बुद्धी का नाही झाली म्हणून चुटपुट. अप्रतीम व्हिडिओ मिळाला असता.

सुप्रभात. Happy
पूछो क्यूं???????????????????????????????????????????>>>>>>>>>>>आअग, बघ तेच विचारायला आले होते. Happy

कॅमेरा आणण्याची बुद्धी का नाही झाली म्हणून चुटपुट. >>>>>>>>>>.अग, हो ना. माझंही असं खूप वेळा होतं नेमका हातात कॅमेरा नसताना छानसा पक्षी, किंवा दृष्य दिसतं. आणि कॅमेरा आणेपर्यंत ......:अरेरे:

सुप्रभात शोभा.........मध्यंतरी गायबली होतीस. ओक्के पण सांग ना तो एकच पक्षी असेल की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ४ वेगवेगळे पक्षी असतील? स. ६ पासून हाच प्रश्न आहे डोक्यात.

ओक्के पण सांग ना तो एकच पक्षी असेल की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ४ वेगवेगळे पक्षी असतील? .>>>>>>>>>>>>>.मानुषी, मला ना, शेवटच्या बेंच वरच्या मुलीला सरांनी प्रश्न विचारावा तसं वाटलं Wink
कदाचित एकच असेल. तो परत जाताना दुसर्‍या वाटेने गेला असेल. किंवा तिकडे वसाहत उभारत असतील तर सगळे कामगार सामान वहात असतील. नक्की काय ते तज्ञच सांगू शकती. Happy (कळलं आता 'शेवटच्या बेंच वरच्या मुलीला' , का म्हटलं ते. :डोमा:)

तिकडे वसाहत उभारत असतील तर सगळे कामगार सामान वहात असतील.>>>>>>>>>> गुड अन्सर!(शेवटच्या बेंचवरच्या मुली)(डोळा मारलेली बाहुली)

अर्र मानुषी.. हे वाचल्यावर आम्हा सर्वांनाही चुटपुट लावलीस की गं..
आता एक करत जा न्हेमी... गच्चीत्,बागेत वगैरे जाताना कॅमेर्‍याचा पाऊच गळ्यात लटकवून मगच जात जा हाकानाका... Happy

>>>>>> गच्चीत्,बागेत वगैरे जाताना कॅमेर्‍याचा पाऊच गळ्यात लटकवून >>>>
खरं म्हणजे बहुतेक तसंच करते. पण लेकीचा फोन आला होता. मग एक दीड तासाची निश्चिंती! म्हणून मी आपली बोलता बोलता गच्चीत चकरा मारते. आणि हॅन्डस फ्री आहे पण वापरत नाही. ती एक चूकच! असो उद्या सर्व आयुधानिशी नेम धरून बसणार! पाहू............

गच्चीत्,बागेत वगैरे जाताना कॅमेर्‍याचा पाऊच गळ्यात लटकवून मगच जात जा हाकानाका... स्मित>>>>>>>>>.हां हे बरोबर. Happy

गच्चीत्,बागेत वगैरे जाताना >>>>>>>>>>मला वाटल ही आणखी कुठे कुठे सांगते. Wink

वर्षू आणि शोभे ......आज मीच भेटले का तुम्हाला? गरिबाची चेष्टा करताय ते!(:डोमा:)
आणि हो हाडाचा फोटोग्राफर कुठेही (वगैरे ठिकाणी) कॅमेरा घेऊन जाऊ शकतो(फिदी)!

वाह.. मध... द्रोण करुन प्यावासा वाटतोय... आणि किती ते काम जागूताई.. धन्य... Happy

शांकलीताई (उर्फ एन्सायक्लोपिडिया) थँक्स.. मी शोधलं गूगलवर. मला ती पानं आठवली. आणि एका चित्रात त्याच्या बियांचा आकारही दिसला. बहुतेक त्याही बघितल्या मी खाली पडलेल्या.. मस्तच.. Happy

मानुषी, काळा पक्षी आणि थोडी लांब चोच म्हणजे कॉर्मोरंट (पाणकावळा) असेल बहुतेक. गुगलुन बघ उडतानाचं चित्र.

मानुषी,
पक्ष्यांना असा अंदाज आला कि यावर्षी पाऊस भरपूर पडणार आहे किंवा लवकर पडणार आहे तर त्यांचे दुसरे घरटे बांधायची किंवा लवकर घरटे बांधायची घाई असते. काहीही असले तरी शुभसंकेत आहे.

चिमुरी,
कलाबाशचे फळ हिरवेगार, गोलाकार आणि साधारण १० इंच व्यासाचे असते. वास वगैरे येत नाही आणि फळातला गर मानवासाठी किंवा प्राण्यापक्ष्यांसाठी पण खाद्य नसतो.
पुण्याला संभाजी पार्कात झाड आहे. मुंबईला राणीच्या बागेत आहे. फोटो इथेच असणार.

साधना,
पोळ्यातूनच मेण काढतात ( तसे ते पेट्रोलियमचेही बायप्रॉड्क्टही आहे. त्याच्या मेणबत्या करतात.) बी वॅक्स मऊसर असते. हे मेण खेडेगावात सर्रास कुंकवाच्या जागी लावतात आणि मग त्यावर कोरडे कुंकू लावतात. छोट्या चपट्या डबीत, आठवडी बाजारात विकायला असते.
मला वाटतं काही सौंदर्यप्रसाधनातही वापरतात. मला वाटतं पायावरचे केस वगैरे काढण्यासाठीपण वापरतात.

साधना अग ते पोळच पुर्ण मेण असत. त्यात मध असते. हा पोळाही आम्ही लहानपणी चघळायचो मस्त वाटत. नंतर चिंगमसारखा टाकून द्यायचा.

ह्या फोटोत बघ दाबल्याने मेण एकत्र झाले आहे कुठे कुठे.

मानुषी तो धनेश तर नव्हता ना?

दिनेशदा, एक फळ आहे, साधारण शहाळ्याएव्हडं.. कवच कठीण आहे पण प्लेन आहे, खडबडीत नाही. रंग हिरवा अन काही ठिकाणी चॉकलेटी होत गेलाय (वाळल्यामुळे असेल).. देठाच्या विरुद्ध बाजुला प्लस साइन होइल अश्या खाचा आहेत (आवळ्याला असतात तश्या पण इतक्या खोलगट नाहीत फळाच्या मानाने, पण बघितल्यावर लगेच जाणवतात), अन फळ न कापता साधारण कवठासारखा वास येतोय..

फोटो काढता येणार नाहिये त्याचा.. फळ कुठुन मिळाले याबद्दल काहिच माहिती नाही.. एव्हड्या माहितीवरुन काही सांगता येइल का?

जागू धनेश म्हणजे हॉर्नबिल का?
पण त्याची चोच इतकी जाड नव्हती. पण असूही शकतो. आमच्या भागात धनेश फारसे दिसत नाहीत.
म्हणजे जिप्सी ना? >>>>>>> शोभे आज सगळ्यांना चिडवण्याचा मूड दिसतो! बघ हं जिप्सी(गुर्जी).........मी नाही ......!

काहीही असले तरी शुभसंकेत आहे.>>>>>>> vaa dineshda ...khup chaan vaaTala vaachoon!

साधना टाकून दिल ग

हो मानुषी धनेश म्हणजेच हॉर्नबील.

ही आमच्या सोनचाफ्याला किड लागली आहे भली मोठ्ठी. पाण्याच्या जोरदार फवार्‍याने एकदा उडवली होती. परत आली. आता औषध आणले आहे. संध्याकाळी फवारते.

ह्म्म्म.. म्हटले काय केलन बाईने देव जाणे. आधीच कोंड्याचा मांडा करण्यात पटाईत. त्यात हातात काहीतरी वेगळे मिळाल्यावर कल्पनाशक्ती मिल्खासिंग होईल. Happy

आधीच कोंड्याचा मांडा करण्यात पटाईत. त्यात हातात काहीतरी वेगळे मिळाल्यावर कल्पनाशक्ती मिल्खासिंग होईल. >>>>>>>>>>>.साधना+१०००
अर्रे टाकलंस का ते पोळं? मला ही अपेक्षा नव्हती हं जागू तुझ्याकडून. त्याचं काहीतरी रीसायक्लिंग करशीलसं वाटलं!:डोमा:

पण साधना पुढच्यावेळी नक्कीच करेन काहीतरी Lol त्या दिवशी पनवेल वरून थकून घरी आले होते आणि तो प्रताप हातात पडला म्हणून नुसतेच मध काढले.

आजच्या लोकसत्ता मध्ये अंजना देवस्थळे यांचा हा छान लेख आला आहे.
http://www.loksatta.com/chaturang-news/story-of-remembering-childhood-sp...

आणि हो.....जोक अपार्ट. एकदा असंच कोकणातल्या रस्त्यावर काही लोक पोळं विकायला बसले होते. पलिकडे बादलीत कसलंसं द्रावण होतं. तर नंतर लक्षात आलं की ते त्या द्रावणात रिकामं पोळं बुडवून मध म्हणून विकत होते.
हे गुळाचं पाणी/काकवीचं दाट असं काहीतरी असावं.

बोलो तो चुटपुट क्यु? आज दिवसभर लोडशेडींग है क्या तुम्हारे यहा????
साधना,
हमारे इधर भी भी, लेकिन तुम्हारे से 'चार' गुना ज्यादा है, अब बोलो हम कितना चुटपुट करे ? Lol

सुदुपार !
छान गप्पा आणि फोटो !

जागु,
मधाचे सगळे (दुर्मिळ) फोटो झक्कास !
पोळ पाहिलेत पण ते काढुन त्यातुन मध काढायची संधी मिळाली नाही (कि तस धाडस केलं नाही ? :हाहा:)

बोलो तो चुटपुट क्यु? आज दिवसभर लोडशेडींग है क्या तुम्हारे यहा????
साधना,
हमारे इधर भी है, लेकिन तुम्हारे से 'चार' गुना ज्यादा है, अब बोलो हम कितना चुटपुट करे ? Lol

Pages