निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहितो का आयडिया बुरा नही है.
आता इथे बर्फाचा कारखाना अन रम चे दुकान शोधणे आले..
उसाच्या रसात आले घ्यावे की नको? Wink

जागू, या शेकरुंचे माहेर भीमाशंकर मानतात पण तिथे त्या आता क्वचितच दिसतात. मी पण तिथे
नाही तर गोव्याला बघितल्या. या खारी आपले बहुतेक जीवन झाडावरच व्यतीत करतात. क्वचितच जमिनीवर उतरतात.

इब्लिस, आले नकोच.
रमच्या जागी फेणी एकदम मस्त लागेल असा अंदाज आहे. तुम्ही चाखून पहा अन मला सांगा कशी लागते चव ते Happy
माझ्याकडे मोठ्या मुश्किलीने आणलेली एक फेणीची बाटली आहे. ती आप्पम सारख्या पदार्थांसाठी राखीव असते. उगाच कॉकटेलमधे मिसळून वाया घालवणे अलाऊड नाही Wink

Pudina v fulora? Dineshda??? He mala navinach.
now a days access net from mobile. Şo few comments from my side.
Saw all photos, they are gr8.
jipsy waiting for new threads. Btw a born photographer has not yet uploaded a best photo clicked by him Wink y şo????

वा, जागू मस्त फोटो आहे शेकरूचा. महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी शेकरूच आहे ना?

जो एस, कुंडीतलं अननस फारच मस्त दिसतंय.

I have not been able get Tadi to the US. Pheni works just as well. I suppose in a pinch rum or tequila would work too, but I have never tried.

काल एका हिंदी चॅनेलवर जुनी गाणी बघत होतो. त्यात "बहारो मेरा जीवन भी संवारो" हे आखरी खत चित्रपटातील ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट गाण दाखवलं. त्यातील ती सगळी फुले जर्दाळुची (Apricots) आहेत का? मी Apricots Flowers सर्च केल्यावर थोडीफार तशीच फुलं दिसत होती. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट गाणं असल्याने व्हिडीयोत तितकीशी क्लियर दिसली नाही.
ऑफिसमध्ये युट्युब बॅन असल्याने गाण्याची लिंक नाही देऊ शकत. Sad

नाही, ते गणेशवेलीचे फुल नाही. गणेशवेलीचे फुल असे येत नाही. शोध मध्ये गणेशवेल टाकुन शोधल्यास फुलांचा फोटो मिळेल. निगवर आणि माबोवर इतरत्रही फोटो आहेत भरपुर.

गणेशवेल आणि चित्तरंजनची फुले जवळजवळ सारखीच दिसतात, पानात मात्र फरक आहे. (इती दिनेश. मी ज्याला गणेशवेल म्हणते त्याला ते चित्तरंजन म्हणतात Happy Happy माझ्या गणेशवेलीची पाने सुईसारखी आहेत, त्यांच्या चित्तरंजनची पाने सुईसारखी आहेत Happy )

१ ल्याच पानावर नितीन नी टाकलेल्या फोटोतल्या फुलाला आम्ही गणेश वेलीचे फुल म्हणतो. त्याच फोटोत उजव्या बाजुला त्याचे पानही दिसते आहे.

१ ल्याच पानावर नितीन नी टाकलेल्या फोटोतल्या फुलाला आम्ही गणेश वेलीचे फुल म्हणतो. त्याच फोटोत उजव्या बाजुला त्याचे पानही दिसते आहे.>>>>>>>>>>>> + १. Happy
मला, मी डकवलेल्या फोटोतल फुल नीट दिसत नव्हत, असं वाटलं. Happy

स्निग्धा हे खास तुझ्यासाठी Happy
Copy of DSCN6147.jpg

मला सांगा ही भाजी कशाची आहे? पूर्वी आमच्या सोसायटी रहाणार्‍या काकांनी काल ही आनून दिली. मेथी पण वाटत नाही आणि घोळू पण वाटत नाही. आता तुम्हीच सांगा. Happy
DSCN6142.jpg

आणि ही पाने.
DSCN6143.jpg

त्यातील ती सगळी फुले जर्दाळुची (Apricots) आहेत का? मी Apricots Flowers सर्च केल्यावर थोडीफार तशीच फुलं दिसत होती. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट गाणं असल्याने व्हिडीयोत तितकीशी क्लियर दिसली नाही.

>>> जिप्सी, माझ्यामते ते गाणं सफरचंदाच्या बागेतलं आहे. apple orchards असा सर्च देऊन बघ. आणि एका सुंदर गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

रस्तारूंदीच्या कामात माझ्या घरासमोची बरीच झाडे तोडली जात आहेत. आजच गुलमोहराचे झाड तोडले गेले.

आज ११-१२ वर्षे तो होता. मे च्या शेवटच्या आठवड्यात मस्त फुलायचा. घरात प्रवेश केला की उंबरठ्यात

उभे राहिल्यावर डोळे निवायचे. इतके ते झाड जवळ होते. पण आज पाहिले तर एकदम रिकामी जागा!

हो मामी, ती सफरचंदाचीच झाडे आहेत आणि ती इंद्राणी मुखर्जीच आहे.. ( आणि गाणारी लताच आहे. )

गणोबा,
झाड माहीत नाही कसले आहे ते, पण ज्या अर्थी पिकलेली एवढी फळे झाडावर आहेत त्या अर्थी खाण्याजोगी नसावीत.

साधना, गणेशवेलीची फुले लाल तर चित्तरंजनची गुलबक्षी रंगाची. गणेशवेलीची गोलसर तर चित्तरंजनची पंचकोनी... ( असे माझे मत आहे Happy )

परवा अशीच गवतावरची फुलपाखरे टिपत होतो. घरी येऊन फोटो नीट बघितल्यावर त्यापैकी एकाच्या अंगावरच नव्हे तर पंखांच्या कडेलाही केस दिसताहेत. दिवसा उडत होता म्हणजे पतंग नव्हता पण असे केसाळ फुलपाखरू भारतात बघितल्याचे आठवत नाही.

नमस्कार,

४-५ दिवसांनी आले. फारच घडामोडी झालेल्या दिसतात.

दिनेशदा.... माहीतीचा माहाजाल!!!

जिप्सी, अभिनंदन!

kaLlaavee2_0.jpg

दिनेशदा ,
आजच्या फोटोत असणार्‍या पिवळ्या फुलांच्या रंगाची पण उलट्या u आकाराची फुले येणारे व पिंपळाच्या पाना-

सारखी पाने असणार्‍या झाडाचे नाव माहित आहे का हो? पाने रूंद व शेंडीविना असतात. मागे श्रीकांत

इंगळहळीकरांच्या लेखात नाव वाचले होते. पण आठवत नाही.कांचन तर नव्हे ना! आपट्याची पाने व कांचनाची

पाने यांत साम्य असते, असे वाचल्याचे आठवतेय. चू.भू.द्या.घ्या.

दा, फुलपाखरू सुंदर!! तुमचा कॅमेरा आणि नजर भारीये!

मधुरा, ग्लोरी लिलीही खूप सुंदर आलीये.

गणोबा, त्या फळांची रचना खूपशी कॉफीच्या फळांच्या रचनेशी मिळती जुळती आहे. पण नक्की नाही माहिती ती फळं कसली आहेत ती.

दिनेश, तो गोरखचिंचेचा फोटो मस्तय. मला खूप आवडले ते फ्रेमिंग. मी डालो करून घेणार आहे तो. Happy

साधना, शोभा, मी पण त्या सुई सारख्या पानाच्या वेलीलाच गणेशवेल म्हणतो.

Pages