एल.बी.टी.

Submitted by देवनिनाद on 15 May, 2013 - 03:53

सामान्य - ओ, काका ... ५ रुपयाचा मसाला (आलं कोथंबीर वगैरे) द्या ना.

दुकानदार - ५ रुपयाचा नाही १० रुपयाचा मिळेल

सामान्य - १० रुपयाचा नको हो .. सगळे गावी गेले आहेत. मी आणि भाऊच आहोत घरी. ५ रुपयाचाच द्या.

दुकानदार - सांगितलं ना .. मसाला ५ रु. नाही १० रुपयाचा मिळेल

सामान्य - बरं .. द्या (काकांनी मसाला दिला). हे घ्या १० रुपये .. .. आणि ५ रुपये परत द्या.

दुकानदार - अरे परत तेच .. सांगितलं ना. १० रुपयाचा मसाला मिळेल

सामान्य - हो, तूम्ही १० रुपये घेतलेत पण मसाला ५ रुपयाला देता तेवढाच दिलात.

दुकानदार - अरे, पेपर / टी.वी. पाहात नाही का ? LBT विरोधात सगळं बंद आहे, मुश्कीलीनं माल आलाय आज. सरकार आणि व्यापारी दोघाचंही भांडणं चालूच आहे.

सामान्य - दोघांचं भांडणं, म्हटल्यावर तिसर्‍याचा लाभ होतो अशी म्हण आहे ना.

दुकानदार - हो.

सामान्य - मग सरकार आणि व्यापारी तुम्हा दोघांच्या भांडणात .. तसे आम्ही तिसरे ... मग आमचा लाभ का होत नाहीए.

दुकानदार - कारण तूम्ही सामान्य आहात म्हणून. .. एल्.बी.टी असो किंवा नसो ... सामान्य म्हटल्यावर तुम्हाला लॉस होतच राहणार.

सामान्य - असं तोंडावर बोलताना तूम्हाला काहीच वाटत नाही का ?

दुकानदार - आधी वाटायचं .. पण आता नाही.

सामान्य - म्हणजे ?

दुकानदार - आधी मी ही सामान्य होतो .. पण एल.बी.टी. चा फटका व्यापार्‍यांपेक्षा सामान्यांना जास्त बसणार .. म्हणून हा धंदा टाकून मी आजपासून व्यापारी झालोय.

सामान्य - काय सांगताय ग्रेट ? द्या .. अजून ५० रुपयांचा मसाला द्या.

दुकानदार - अजून मसाला ... तो ही ५०/- रुपयाचा. पण थोड्याच वेळापुर्वी म्हणालात की घरी तूम्ही दोघचं आहात.

सामान्य - हो .. घरी दोघचं आहेत ..

दुकानदार - मग एवढा मसाला ?

सामान्य - आजूबाजूला बरेच आहेत की, ५०/- रुपयाचा हा मसाला शेजार्‍यांना विकून ह्याचे मी ८०-९० रुपये करेन म्हणतो ? ...म्हणजे मला ही एल.बी.टी चा लॉस होणार नाही ? काय ?

दुकानदार - हम्म्म्म्म्म्म्म्म ... अगदी LBT बोललात.

सामान्य - म्हणजे ?

दुकानदार - L.B.T. .. म्हणजे अगदी लाखाचं बोललात तूम्ही.

सामान्य - तर काय .... नोकरीत राब राब राबण्यापेक्षा .. हे असं झटपट व्यापारी झालेलं काय वाईट .. आज एल्.बी.टी आलयं .. उद्या एसबीबीटी येईल ..

दुकानदार - एसबीबीटी ? म्हणजे ..

सामान्य - सामान्यांना बोलती बंद टॅक्स .. असा ही हा टॅक्स चालूच आहे .. पण आता तो कंपलसरी करतील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै भारी Happy
देवनिनाद इस बॅक.....
>>>>
+१
मी माबो जॉईन केल्यापासुन बहुदा पहिल्यांदाच!

होय, मित्रांनो. अगदी वर्षभराच्या कालावधीनंतर मायबोलीवर लिखाण करतो आहे. कारण मध्यंतरीच्या काळात काही चॅनलसाठी विनोदी कार्यक्रमाचे लिखाण करत होतो. न्युज चॅनलचा जॉब म्हटल्यावर वेगळी धावपळ आहेत. पण मायबोलीवर लॉगीन करताच मा.बो. चे बदलते स्वरुप .. नव नवीन सभासद बरेच बदल दिसले. झटपट का होईना मा.बो. वर पोस्ट करायला वेळ मिळाला, मलाच खूप बरं वाटलं

प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार

सस्नेह !
देवनिनाद