होम लोन प्रोटेक्शन प्लान की टर्म प्लान?

Submitted by यक्ष on 15 May, 2013 - 03:20

होम लोन घेतांन्ना कुठला होम लोन प्रोटेक्शन प्लान योग्य?
की सरळ टर्म प्लान घ्यावा?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दृष्टिने होम लोन असो वा नसो टर्म प्लान असायलाच हवा.

आता एक उदाहरण ..

लोन प्रोटेक्शन नसताना.

तुमच्या कडे १ करोडचा टर्म प्लान आहे.
तुम्ही ५० लाखाचे घर घेतले आणि ४० लाख उरलेले असताना तुमचा मृत्यू झाला. ( मुळात टर्म प्लान वा लाईफ इन्शुरंस हा मृत्यू नंतर कामाला येतो तेंव्हा मी जरी इथे तुमचा मृत्यू झाला असे म्हणत आहे ते केवळ उदाहरणा दाखल त्यामुळे वाईट वाटून घेऊ नये)

मग १ करोड - ४० लाख बँकेचे = ६० लाख तुमच्या घरच्यांना. म्हणजे तुमचा मूळ हेतू साध्य होत नाही.

लोन प्रोटेक्शन असताना.
तेच सर्व ..
पण प्रोटेक्शन मुळे ४० लाख बँकेला आपोआप मिळतील व १ करोड तुमच्या घरच्याना.

आता होम लोन प्रोटेक्शन हे खूप स्वस्त नाही, त्यात तुमचे ७०,००० ते २ लाख ही जाऊ शकतात. (वरचे) हे खरे पण मग तुलना प्रिमियम १ लाख = परतावा ४० लाख अशी करा. शिवाय बरेच जण आजकाल केवळ ५-१० वर्षात होम लोन रि पे करतात, तर मुळ प्रिमियम मधून देखील रि पे नंतर बचत होईल.

तुम्हाला किती कोट दिला आहे?

आणि जर कुठलाही टर्म नसेल तर टर्म काढून घ्या.

टर्म इन्श्युरन्स तर हवाच.
आणि हाउसिंग लोन ला ही प्रोटेक्शन हवे.. पण होम लोन प्रोटेक्शन बर्‍यापैकी महाग पडते आणि त्यात परत मृत्युनंतर फक्त राहिलेल्या EMI वर सूट मिळते..
तेव्हा त्यापेक्षा जर होम लोन च्या रकमेइतका अजुन एक टर्म प्लॅन घेणे जास्त सोयीचे आहे

म्हणजे बघा..
तुमचा साधा टर्म प्लॅन - १ करोड
तुमचे हाउसिंग लोन - ५० लाख
तर मग १ करोडच्या टर्म प्लॅन बरोबरच ...५० लाखाचा एक दुसरा टर्म प्लॅन काढा..

म्हणजे समजा अकाली मृत्यु झालाच तर घरच्याना १ करोड रेग्युलर टर्म प्लॅन प्रमाणे मिळतील..
आणि दुसर्‍या पॉलिसी मधुन ५० लाख मिळतील त्यावेळी ५० लाखापैकी समजा २० लाख कर्ज फेडुन झाले असेल तर मग २ र्‍या रकमेमधुन ५०-२० = ३० लाखाचे कर्ज फेडुन टाकतील आणि वरचे २० लाख घरच्याना जास्तीचे मिळतील..

तसेच होम लोन प्रोटेक्शन पेक्षा टर्म इन्श्युरन्स चा हप्ता कमी पडतो..म्हणजे ते थोडे स्वस्तही पडेल..