हाऊसिंग-लोनसाठी कुठली बॅक चांगली आहे?

Submitted by हर्ट on 13 May, 2013 - 06:34

माझे काही प्रश्न आहेतः
१) घरासाठी जर लोन घ्यायचे असेल तर कुठली बॅक आजमितिस चांगली आहे?
२) लोन मिळायला किती दिवस लागताद?
३) कुठली कागदपत्र द्यावी लागतात?
४) एन आर आय म्हणून लोन घेणे कितपत योग्य/फायदेशीर आहे?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी यादी बरोबर आहे.

साधारणतः त्या त्या भागातले बिल्डर आपापले प्रोजेक्ट्स आजूबाजूच्या बँकांमध्येच वर्गीकृत करतात. त्यामुळे त्या बिल्डर अथवा प्रकल्पाची बँकेने आधीच माहिती काढलेली असते. व ते प्रोजेक्ट अ‍ॅप्रूव्ह केलेले असते. बांधकाम चालू असलेले घर घेताना पुण्यातलीच बँक बघा.

मी कधी लोनवर रीसेल घर घेतले नाही त्यामुळे बँक ह्याबाबतीत नक्की कशी वागेल (?) ते सांगू शकत नाही.

मी माझ्या घराकरता "आय सी आयसी आय" कडूनच लोन घेतले. माझ्या बहिणीने "डीएचएफएल" कडून . कसलाही प्रोब्लेम नाही. फटाफट मंजूर झाल. न्याशनलाइज बेन्केत मात्र चिक्कार कागदपत्र अशी तशी खूप कटकटी वाटल्या म्हणून या दोन बँकांकडून झटपट मिळाल म्हणून घेतलं . कसलाच त्रास नाही. आयसीआयसीआय चे प्रिपेमेंट ला अजिबात पेनल्टी बसली नाही . पाच वर्षात मी फेडून सुद्धा टाकल. सगळ्याच ब्यान्कांमध्ये कागदपत्र तशी सारखीच लागतात. फोर्म १६ /कुठे तीन महिन्याची सेलारी स्लीप/ कुठे पाच महिन्याची/ इन्कम ट्याक्स रिटर्न भरलेल्या लास्ट तीन वर्षाच्या पावत्या /बँक स्टेटमेंट -गेल्या सहा महिन्यात तुमच्या खात्यात किती पैसे आहेत ते बघायला . काही बँकांमध्ये दोन ग्यारेन्तर लागतात. आणि ग्यारेन्तर मिळायला खूप त्रास पडतो . म्हणून प्रायव्हेट बँक बर्या पडतात. कारण त्यांच्या मध्ये ग्यारेन्तर ची फारशी भानगड नसते Happy

नन्दिनी

क्षमा करा! पण आपले..

"............हप्ते भरलेले असूनसुद्धा त्यांनी दोनदा आमच्या घरी त्यांचे रीकव्हरी एजंट (म्हणजे गुंड) पाठवले होते. हप्त भरल्याची पावती दाखवूनसुद्धा ते गुंड रस्त्यात उभं राहून शिव्या देऊन गेले होते. ...." विधान खरेंच आहे का? असे होउ शकते का? ही बॅक खरंच एवढी वाईत आहे?

बींनी लिहिलेला 'बॅक टु स्क्वेअर वन' कुठे गेला? मिळालं का सिंगापुरात भाड्यावर मनाजोगतं घर?

होमलोन साठी इंटरेस्टरेट कसा ठेवावा फिक्स कि फ्लोटींग ???..>>>> ह्या बद्दल जाणकारांनी कृपया सल्ला दयावा.

LIC HOUSING Finance ची "गृहलक्ष्मी " अशी स्कीम आहे . त्यामध्ये पहिली ३ वर्ष rate of interest १०% राहणार आणि मग floating rate apply होणार. ही Teasing Scheme असावी का ?

ही स्कीम घ्यावी का ?

अरे ह्या स्कीम विषयी कोणालाच माहित नाही का? आणि fixed rate ठेवला तर तो २ ० वर्ष कायम राहील . फ्लोटिंग rate साधारण किती कमी जास्त होतो? ज्यांनी होम लोन घेतलय त्यांनी please सांगा

आद्या,

फ्लोटिंग रेट हा मार्केटवर अवलंबून असतो आणि ज्याप्रमाणे चढउतार होतात त्यानुसार फ्लोटिंग रेट बदलतात.

माझ्या माहितीनुसार तरी ते वाढतातच. माझा स्वतःचा अनुभव आहे.

- पिंगू

मी एचडीएफसी मधून नव्या घरासाठी लोन घेतलय.... खूप चांगला अनुभव आला!
त्यांचे एजंट्स, ऑफिसर्स, इन्श्युरन्स एजंट्स सगळ्यांनीच खूप छान सर्विस दिली Happy

Co-operative Bank कडून हाउसिंग लोन घ्यावे काय? कुठल्या Co-operative Bank चांगल्या आहेत ?

होम लोन च्या बाबत मी आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि सिटीबँक या तीन बँकांचा अनुभव घेतला आहे.

सिटीबँक चा अनुभव सुरवातीच्या काळातच अतिशय खराब आल्याने (अनेक हिडन चार्जेस शिवाय ज्या पद्धतीने ते ग्राहक आणि त्यांच्या शंका/तक्रारी हाताळत होते ते पाहून) मी ते अकाऊन्ट लगेच बंद करून लोन अन्य बँकेत वर्ग केले. त्यामुळे सिटीबँक? नावच नको.

आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी मध्ये मागची खूप वर्षे होम लोन चा प्रदीर्घ अनुभव आहे:

आयसीआयसीआय अत्यंत ढिसाळ कारभार आहे (बँक आणि होम लोन दोन्हीचा तोच अनुभव). इएमआय कमी करणे किंवा अन्य तत्सम गोष्टींसाठी ते सहकार्य करत नाहीत. आयसीआयसीआय च्या बहुतांश शाखांमध्ये नेहमी गर्दी असते. परिणामी वेटिंग टाईम प्रचंड आहे. फ्लेक्सी रेट च्या बाबत अत्यंत बकवास अनुभव म्हणजे रिजर्व बँकेने बेस रेट कमी केला तरी यांचा इएमआय बदलत नाही. वाढवला तर मत्र तत्परतेने वाढवतात. याबाबत विचारले असता सांगितले गेले कि "तुम्हाला बेस रेट कमी झालाय याची माहिती मिळताच तुम्ही चौकशी केलीत तरच इएमआय कमी करून मिळतो"! इतक्या भिकारी दर्जाची बँक आहे हि. आयसीआयसीआयचा बँकिंग चा अनुभव पण फार वेगळा नाही. ग्राहकांना अजिबात सहकार्य न करणारी बँक असे मला म्हणावे वाटते. त्यामुळे आयसीआयसीआय? BIG NO.

एचडीएफसी चा होम लोन आणि बँकिंग चा अनुभव चांगला आहे. शिस्तबद्धपणा आणि पारदर्शकता आहे. होम लोन बाबत ते अत्यंत चांगले सहकार्य करतात. विशेषकरून इएमआय मध्ये बदल करायचा असेल किंवा लोन आधीच बंद करायचे असल्यास विनासायास काम होते. पुण्यातल्या शिवाजीनगरच्या होम लोनच्या मुख्य शाखेत त्यांची कामकाजाची आणि ग्राहकांना हाताळण्याची पद्धती खूपच चांगली आहे. एचडीएफसीचा पर्सनल बँकिंगचा अनुभव पण चांगला आहे.

धाग्याचा विषय फक्त होम लोन असला तरी जाता जाता उल्लेख करावा वाटतो, क्रेडीट कार्ड सुविधा एचएसबीसी ची चांगली वाटते. विशेषतः रिवार्ड पोइंट्सला अतिशय चांगली किंमत ते देतात. हेच एचडीएफसी च्या क्रेडीट कार्ड बाबत मात्र रिवार्ड पोइंट्सचा चांगला अनुभव नाही.

कितीही त्रास झाला तरी SBI कडून गृहकर्ज घ्यावं. पूर्ण प्रोजेक्ट ची मागच्या सात जन्माची पत्रिका मिळाल्याशिवाय कर्ज मिळत नाही. नो चान्स त्या प्रॉपर्टी चं काही लफडं असेल/होईल.

मग त्या करता SBI approved site असली की झालं. कुठल्याही बँकेकडून कर्ज घ्या.

SBI ला पर्याय नाही.

एचडीएफसी ची पद्धत चांगली आहे पण लोन खूप अपुरं मिळतं. शिवाय चार्जेस बरेच आहेत त्यांचेही. एसबीआयचे कर्ज ख-या अर्थाने स्वस्त पडतं. प्रोसेसिंग फीज व इतर चार्जेस धरूनही हे कुठल्याही इतर बँकेपेक्षा स्वस्त आहे. शिवाय आपल्या ब्रँचमधून मिळते. फक्त एकदाच सह्या करायला डिव्हीजनल ऑफीसला जावे लागते ( टिळक रोड / वाकडेवाडी / पिंपरी चिंचवड).

मला घरासाठी इतर कुठल्याही बँकेपेक्षा जास्त कर्ज मिळालेच. शिवाय तीन वर्षांनी दर वाढल्यावर घराच्या किंमतीवर (शिल्लक कर्ज वका करून) पुन्हा एव्हढे कर्ज मिळाले की मला एक प्रॉपर्टी घेता आली.
त्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तर मला त्याचे वाईट वाटणार नाही.

Pages