"ति"ची गझल

Submitted by आकाश बिरारी on 12 May, 2013 - 17:24

.

तिची लग्ननौका तरे आजही
जरी काळजाला चरे आजही

शरीरे जरी एक झाली तरी
मनांच्या मधे अंतरे आजही

तिचे प्रश्न होते बरोबर कसे
तिला सांगती उत्तरे आजही

पती, बाप, मुलगा ठरवतो तसे
मनीचे तिच्या ना ठरे आजही

तिची पोतसर कैद बनली जणू
तिला खुणवती उंबरे आजही

कधी चारचौघात ना घेतला
तिला तो उखाणा स्मरे आजही

--- आकाश बिरारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरीरे जरी एक झाली तरी
मनांच्या मधे अंतरे आजही

तिची पोतसर कैद बनली जणू
तिला खुणवती उंबरे आजही

कधी चारचौघात ना घेतला
तिला तो उखाणा स्मरे आजही

<<<

मस्त

शरीरे , पती बाप भाऊ ,पोतसर, उखाणा हे जाम आवडले

बाकीचेही छानच

गझल मस्तच

_______________________

खूप दिवसांनी ??????
Happy

सर्व रसिक वाचकांचे आभार.

@ वैवकु : मी फार लिखाण करत नसल्याने क्वचितच पोस्ट केले जाते. पण तरीही मायबोली वर मूक वाचक म्हणून रोज एखादी चक्कर असतेच.