Submitted by सुप्रिया जाधव. on 12 May, 2013 - 05:14
संसार आठवांचा हा विस्कटून देते
माझ्यातल्या तुझ्याशी मी काडिमोड घेते
नाजूक भावनांची उडवू नकोस खिल्ली
सांगून का कुणावर ही वेळ सांग येते ?
नशिबा तुझ्या यशाची मिरवू नकोस शेखी
काळापुढे न झाले कोणी कधीच जेते !
थबकून जीवनाचा आलेख काढताना
चढती कमान त्याची मी दामटून नेते
प्रेतामधे अजुनही आत्मा जिवंत आहे
या कल्पनेत हल्ली थोडे जगून घेते
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतल्यातील दुसरी ओळ भन्नाट....
मतल्यातील दुसरी ओळ भन्नाट.... सानी मिसर्यातील ''हा'' अनावश्यक.
शेवटच्या शेरात अजुनही ऐवजी,''अजूनी'' सुद्धा वापरता येईल.
बाकी या गझलेत तितकासा मजा नाही आला.
कैलासरावांशी 'हा' बाबत सहमत
कैलासरावांशी 'हा' बाबत सहमत आहे, पण मला गझल आवडली.
नाजूक भावनांची उडवू नकोस
नाजूक भावनांची उडवू नकोस खिल्ली<<<< मला हा मिसरा सर्वाधिक आवडला
प्रेतामधे अजुनही आत्मा जिवंत आहे
या कल्पनेत हल्ली थोडे जगून घेते <<<< मला हा शेर सर्वाधिक आवडला
काळापुढे न झाले कोणी कधीच जेते !<<<<
<<<< फेस्बुक वर अशी नव्हती ही ओळ . ...जशी होती त्यात एक बदल सुचवावासा वाटत होता पण सकाळी तुमच्याशी झालेल्या संभाषणानंतर मी विचार बदलला .
पण आता पुन्हा विचार बदलून मी मनातल्या मनात बदललेली ओळ धाडस करून इथे देत आहे
>>>लक्षात ठेव कोणी काळापुढे न जेते <<<<<
असो
सगळ्यांचे आभार !
सगळ्यांचे आभार !
आवडली...काही मिसरे छान
आवडली...काही मिसरे छान
चांगली गझल. आवडली.
चांगली गझल. आवडली.
थबकून जीवनाचा आलेख
थबकून जीवनाचा आलेख काढताना
चढती कमान त्याची मी दामटून नेते
अतिशय सुंदर शेर आहे, सुप्रियाजी.
धन्स मंडळी ! धन्यवाद समीरजी
धन्स मंडळी !
धन्यवाद समीरजी !
नाजूक भावनांची उडवू नकोस
नाजूक भावनांची उडवू नकोस खिल्ली
सांगून का कुणावर ही वेळ सांग येते ?
थबकून जीवनाचा आलेख काढताना
चढती कमान त्याची मी दामटून नेते
वा वा, सुंदर.
संसार आठवांचा हा विस्कटून
संसार आठवांचा हा विस्कटून देते
माझ्यातल्या तुझ्याशी मी काडिमोड घेते
नाजूक भावनांची उडवू नकोस खिल्ली
सांगून का कुणावर ही वेळ सांग येते ?
नशिबा तुझ्या यशाची मिरवू नकोस शेखी
काळापुढे न झाले कोणी कधीच जेते !
>>> व्वा
सुप्रियाजी , शेर छान झाले
सुप्रियाजी ,
शेर छान झाले आहेत. शेवटचा विशेष आवडला.
आकाश
प्रसाद लिमयंशी सहमत. मलाही ते
प्रसाद लिमयंशी सहमत. मलाही ते २ शेर फार आवडले!
एकंदरीत छान गझल. आनंदकंदात
एकंदरीत छान गझल.
आनंदकंदात बरीचशी आक्रमकता असते असे एक निरीक्षण.
सांगीतलेल्या आशयाला दु:खाच्या तीव्रतेने व्यापले असते तर अजून मजा आली असती हे मात्र नक्की! वै. म. गै. न.
शुभेच्छा.