मराठमोळी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 May, 2013 - 07:03

साधी भोळी मराठमोळी
रेखीव चेहरा काळी सावळी
कुंकूम रेखा उंच कपाळी
खाली गोंदण हिरव शेवाळी
गळ्यात एकच पोथ काळी
किंचित विटकी जांभळी चोळी
जुनेर लुगडे जोड लावली
जुळी जोडवी उघड्या पावली
कुठे लाल हिरवी पिवळी
कंकण होती हाती भरली
आणिक होती तेजाळलेली
चंद्रभागा निर्मळ डोळी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेच अभिप्रेत होते.<<<

काय नेमके ..कवितेस वर्णन म्हट्ले गेले आहे ते ?

कवितेचे केवळ् वर्णनात्मक असणे माझ्या ऐकीव माहितीनुसार चांगले समजले जात नाही

<<<कवितेचे केवळ् वर्णनात्मक असणे माझ्या ऐकीव माहितीनुसार>>>>>असे काही मी कधी वाचले नाही ,पण मला वाटते आपल्याला चित्रात काव्य दिसते .रुपात काव्य दिसते .मग कवितेत चित्र का दिसू नये ?

कवितेत चित्र दिसलेच व आवडलेच
पण नुसते चित्रच दिसावे तर नुसते चित्रच काढावे कवितेतून अजून काहीतरी देखील अपेक्षित असते असे मला वाटत आले आहे

Happy