फ्राईड चिकन विथ चिज सॉस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 May, 2013 - 15:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन अर्धा किलो (स्वच्छ धुवून)
बटर (अमुल बटर नाही चहात बुडवून खायचे :हाहा:) ५-६
२ अंड्यातील पांढरा भाग
चिली फ्लेक्स १ चमचा किंवा आवडीनुसर कमी अधिक
मिक्स हरब्स १ चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार
कॉर्नफ्लावर २ ते ३ चमचे
मिठ चवीनुसार
साखर १ चमचा

सॉस साठी
चिज (फोटॉतील पॅकमधील पाव भाग)
१ वाटी दूध
पिझ्झा टॉपिंग २ चमचे

क्रमवार पाककृती: 

ही पाककृती मी केलेली नसुन माझ्या पुतण्याने अभिषेक म्हात्रे याने केलेली आहे. वरील प्रमाण मी अंदाजे दिला आहे कारण तोही अंदाजे टाकतो त्यामुळे त्याला विचारले की हे किती टाकलेस की आय एम द शेफ एवढेच उत्तर देऊन पुढे कामाला लागतो Lol आमच्या घरातील तो तरूण शेफ आहे. सध्या बारावीत आहे. पण रिकामपणात ही शेफगीरी चालू असते. पिझ्झा, नुडल्स, पास्ता, बर्गर, चिकनचे प्रकार स्वतः करतो व आम्हालाही खायला घालतो. Happy

तर पाककृती कडे वळूया. मी फक्त फोटो काढले आहेत.

* चिली फ्लेक्स, मिस्क हरब्स, मिठ, साखर एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. व ते एका बाऊल मध्ये काढून त्यात कॉर्नफ्लॉवर मिक्स करा.

* बटराचा मिक्सरमध्ये रवा करा व एका डिश मध्ये काढून घ्या.

* कढईत तेल गरम करत ठेवा व तोपर्यंत आधी चिकन नंतर चिली फ्लेक्स व हरब्स चे मिश्रण त्यानंतर अंड्याचे पांढरे आणि शेवटी बटराचा रवा असे रचून ठेवा म्हणजे तळताना सोपे पडते

* आता चिकनचा प्रत्येक पिस प्रथम चिली फ्लेक्स-मिक्स हरब्स- कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात घोळवून तो अंड्याच्या पांढर्‍या भागात बुडवायचा.

त्यातून बुडवून झाला की बटराच्या रव्यामधून घोळवून घ्यायचा.

* आधी असे सगळे किंवा एका वेळी तळता येतील एवढे पिस करून घ्यायचे.

कढईत तेल चांगले तापले की मध्यम आचेवर हे तुकडे तळून काढायचे. साधारण १०-१२ मिनीटे ठेवायचे.

हे आहे तय्यार फ्राईड चिकन.

आता सॉसची रेसिपी पाहू.

दुध एका भांड्यात गॅसवर गरम करा. त्यात चीजचे तुकडे घाला व मधून मधून ढवळा

* थोड्या वेळात चीज विरघळेल चमच्याने ते एकजीव करा व त्यात पिझ्झा टॉपींग घालून थोडावेळ ढवळा.

* वाटल्यास सॉसवर सजावटीसाठी थोडी कोथिंबीर चिरून टाका.

हे आहे तय्यार फ्राईड चिकन विथ चिज सॉस.

वाढणी/प्रमाण: 
तसे सांगणे कठीण आहे पण मनसोक्त खायचे असेल तर २ ते ३ जणांसाठी.
अधिक टिपा: 

वरील herbs मला निट टाईपता आला नाही. टाईपायला गेल्यावर हर्ब्स असे होते.

प्रमाण कमीजास्त करू शकता आवडीनुसार.

माहितीचा स्रोत: 
अभिषेक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, फ्राईड गोष्टी तब्येतीला चांगल्या नसतात, म्हणून अमेरिकेत के एफ सी चा खप कमी झाला. म्हणून ते भारतात गेले. ज्या देशाची तंदूरी जगप्रसिद्ध आहे तेथले लोक, अमेरिकेतून आले म्हणून क एफ सी च काय, काय वाट्टेल ते खातात! अगदी जास्त पैसे देऊन!!

छान आहे रेसिपी Happy भाच्याला शाबासकी दे Happy तुमच्या घरी सगळेच मास्टर शेफ्स दिसताय्त Happy

मध्यंतरी फेबूवर एक पीजे फिरत होता....

गुजराथ्याने दुकान उघडले.. नाव ठेवले KFC - Khakaraa Faafadaa Chivado (खाकरा फाफडा चिवडो - काहि ठिकाणी चकली पण वाचलय) Lol

लाजो , के एफ सी.... Rofl

जागुले.. मस्त रेसिपी है... घरच्याघरी के एफ सी .. ग्रेट आयडिया.. अभिषेक ला धन्स!!!

ते चीज सॉस पण टेस्टी दिसतंय..

भारतात मिक्स्ड हर्ब्ज मिळू लागलेत??? सो रिलिव्ड.. आता इथून कॅरी करायला नको.. Happy

छान आहे रेसिपी Happy भाच्याला शाबासकी दे Happy तुमच्या घरी सगळेच मास्टर शेफ्स दिसताय्त Happy >>>
>>> लाजो +१

मस्त प्रकार आहे.
अभिषेक शाकाहारी काही करतो कि नाही ? Happy

आणि शीर्षकात KFC स्टाईल असा बदल करणार का ? नाहीतर कॉपीराईटचा प्रश्न येईल !

शुम्पी, अंशा, नितीन, प्रसिक धन्यवाद.
झक्की म्हणून आपण घरीच करून खाउ Happy
लाजो भारी जोक Lol

वर्षू ताई खरच तो सॉस छान लागत होता.

हेलबॉय आता घरी प्रेशर फ्रायर नाही हो.

दिनेशदा अभिषेक जे करतो ते नॉनव्हेजच करतो. फक्त चिकनचे प्रकार. कधीकधी व्हेज फ्राईडराईस करतो. ते पण घरात गुरूवार वगैरे पाळतो म्हणून.

अविगा पारेखच्या दुकानात मिळेल Happy

गुजराथ्याने दुकान उघडले.. नाव ठेवले KFC - Khakaraa Faafadaa Chivado (खाकरा फाफडा चिवडो - काहि ठिकाणी चकली पण वाचलय >>>> Biggrin हे धम्माल आहे, लाजो.

जागुष्टे, मस्तय रेसिपी. डॅनीला पण आवडली असेल ना? Wink

मामी डॅनी अशा वेळी घरात चकराच मारत असतो व वाट पाहत असतो कधी एकदाचे हे जेवतात म्हणजे मला हाडं मिळतील.

मस्त! आणि करायला सोप्पी (वाटतिये तरी)
फक्त...
>> बटर (अमुल बटर नाही चहात बुडवून खायचे हाहा) ५-६
हे काय?? (मी चहा पीत नसल्याने माहित नसेल Happy )

सॅम,
हे ->
छोटे बनपाव, डायरेक्ट रेडीमेड टोस्ट सारखे कडक मिळतात, खारट चवीचे असतात. ब्रेडक्रंब्ज करायला सोपे म्हणून वापरलेले दिसताहेत.

किशोर, सॅम, जयवी धन्यवाद.

इब्लिस धन्स बटर दाखवल्याबद्दल.

मस्त रेसिपि. मी घास-फुसवालि त्यामुळे मला तर नाहि खाता येणार.
हे बटर सुरति बटर/सुरति जिरा बटर म्हणुन जे मिळते तेच का?

अरे वा ! हे छान आहे Happy इथे आता सुट्ट्या सुरु होतील शाळांच्या. मुलांना नवीन खाऊ Happy
करुन पाहीन नक्की.

अनुष्का मावेबद्दल रात्री सांगते.

जाई, श्रद्धा, वर्षुताई, समिता, अगो, येळेकर, प्रिंसेस धन्यवाद.
हो प्रिया काहीवेळा जिरा बटरही म्हणतात.

Pages