माझी गझल निराळी

Submitted by अभय आर्वीकर on 6 May, 2013 - 12:18

माझी गझल निराळी

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्‍यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी

चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी

लयीत नाही कुणीही, बेसूर सत्ताधारी
अर्थशिस्त शिकवी त्यांना लिहिते वृत्त कपाळी

पोशिंद्याच्या रक्षणाचा ’अभय’ घेतो ’मक्ता’
ओतप्रोत भरतो आहे शेरास्त्रांनी हाळी

                                            - गंगाधर मुटे
-----------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी >>> हे शेर छान वाटले.

----------------------------------------------------------------------------------------
नव्हे च्या किती मात्रा होतात? >>
'नव्हे' हा शब्द उच्चारताना ’न’वर जोर दिला जात नाही.
त्यामुळे लगा अशा ३ मात्रा होतात.

वैदर्भिय उच्चारानुसार मी ४ धरल्या आहेत >>> हे ठीक वाटत नाही.
त्यापेक्षा 'नाही'/’नोहे’ वापरता येईल का हा विचार व्हावा.

शब्दांची गुळली >>> गुळली चा अर्थ लक्षात आला नाही. हादेखील विदर्भातला शब्द आहे का ?

लिहिले आहे ते चांगले आहे थेट व समजायला सोप्पे आहे
पण निदान मला तरी लयीत वचता येत नाही आहे
मी मोजले नाही पण काही जागी मात्रांची गडबड झाली असावी अशी मनात केवळ एक शंका आली

पण मला ही 'रचना' आवडलीच हे वेगळे सांगणे न लगे Happy

बाप रे अजुन एक नवा आयडी?<<<<

Lol
अहो गझलुमिया भूत पाहिल्यगत काय करताय
अहो आपले गंगाधर मुटे सर आहेत ते !!! देवसर नव्हे

Lol

अरे सॉरी हं, मी , माझी गझल, माझं वृत्त, माझं अमुक, माझं तमुक ( म्हणजे शायराचं ) सारखं सारखं वाचनात आलं म्हणून घोळ झाला. मुटे सर माफ करा हो

<<<< अहो आपले गंगाधर मुटे सर आहेत ते !!! देवसर नव्हे >>>

अहो, आपले गंगाधर मुटे, वेडसर आहेत ते !!! देवसर नव्हे

असे वाचले मी. Lol Rofl

Rofl ..................
मुटेसर तुम्ही पण् ना अगदी .......:हाहा: ...... आहात बघा

<<< माझी गझल, माझं वृत्त, माझं अमुक, माझं तमुक ( म्हणजे शायराचं ) सारखं सारखं वाचनात आलं म्हणून घोळ झाला. >>>

गझलुमिया,
जी काही थोरवी वर्णीली आहे, ती गझलेची थोरवी आहे. माझी नाही.

(नुसता गझल हा शब्द वापरणे अशक्य आणि परिणामकारक नसल्याने "माझी गझल" हा शब्द योजावा लागला.)