या भांडायला.....

Submitted by मी मधुरा on 4 May, 2013 - 05:08

स्ट्रेस रिलीज करण्याचा मार्ग.....
खरतर अत्यंत मस्त मार्ग....
भांडणे...
खटकत त्या गोष्टींवर..

मग चला, वाद घालूया...
या धाग्यावर.....कुठल्याही विषयावर....मनसोक्त!

{ सूचना:
१. या धाग्यावरची भांडणे हि व्यक्तिगतरित्या घेऊ नयेत.
२. हा फक्त मन मोकळ करण्याचा मार्ग असून कोणाचा अपमान करण्याचा हेतू नसल्याने शिव्यांचा वापर करू नये.
३. येथील भांडणे लटकी समजली जावीत.
(गामा_पैलवान यांनी सुचवल्या प्रमाणे.....) }

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपमान कसा होतो याचा अनुभव कोणाला हवा असेल तर पुण्यात जावे.....विशेषतः तुळशीबागेत......(अनुभवाचे बोल.....)

अपमान कसा होतो याचा अनुभव कोणाला हवा असेल तर पुण्यात जावे.....विशेषतः तुळशीबागेत......(अनुभवाचे बोल.....)>>>> अनुभव शेअर करा.

भांडायला नाही आले पण एक उत्सुकता तुळशीबागेत तुमचा कुठे अपमान झाला? आणि तुमच्या एका अनुभवावरुन पुण्याचे, तुळशीबागेतले लोक, भांडकुदळ असा कसा काय तुम्ही जनरलाईज्ड अर्थ काढलात??? Happy

पुण्याच्या लोकांनी इतरांच्या केलेल्या अपमानाचे बरेच किस्से आहेत. त्यापैकी एखाद्याचा अनुभव आला असेल मधुराला..... मधुरा आता तु सांगच ग.....

मधुरा, अग इथे असे नळ सुरु करुन बंद पडलेत बरेच. चल आपण मालिंकांवर बोलू. उगी उगी भांडायला काय जमेलस वाटत नाही Lol

वैभव तुम्ही आयडी मध्ये तुमच्या नावा बरोबर तुमचा पासवर्ड पण लिहिला आहे का १२३४५ Wink

लाल भोपळ्याची भाजी, बर्‍याच दिवसांनी खाल्ली आज. काय क्लास लागते!
तृप्त झालो. भोप़ळा हा एक चविष्ठ प्रकार आहे. लाल काय दुधी काय. भाजी विदर्भी स्टाइल असेल तर उत्तमच.

भाजी संपवून टाकली, नाहीतर फोटो डकवला असता.

या धाग्यात नि इतर धाग्यात फरक काय?
मुद्दाम हा धागा काढण्याची गरज नव्हती. हेच कुठे दुसरीकडे लिहीले असते तरी चालले असते.
मायबोलीवर कुठल्याहि धाग्यात काहीहि लिहिणे, त्यावरून भांडणे, अपमान होतच असतात.

पण काही नवीन धागा दिसला की तिथे जाऊन लिहायचे अशी सवय असणार्‍या माझ्यासारख्यांची सोय झाली
धन्यवाद.

श्या कोणी भांडत नाही इथं.
शुभेच्छा देताहेत उलट.

धाग्याचं शिर्षक, शांततेने नांदा, शांततेचे आव्हान असे काही बदलून बघा, भांडणं होतील कदाचित.

भल्या पहाटे उठून थंडीतून जाऊन दिवाळी पहाट नावाच्या कार्यक्रमात गाणी ऐकणा-या आणि त्याच बरोबर बाहेर फटाके फोडणा-या सर्व लहान थोर नागरिकांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !