काळजाची खुळी आस तू

Submitted by अभय आर्वीकर on 3 May, 2013 - 03:53

काळजाची खुळी आस तू

भास तू, ध्यास तू, श्वास तू
काळजाची खुळी आस तू

आर्त तृष्णा सुरांचीच मी.....
सूर देण्यास आलास तू!

आसवांना दिसू दे जरा
की निघालास जाण्यास तू

फार होतेय लडिवाळणे
खूप घेतोस रे त्रास तू

गुंतता मी गळाला तुझ्या
प्राक्तनाला मिळालास तू

दागिने अन्य काही नको
श्लेष, दृष्टांत, अनुप्रास तू

ओढ डोळ्यास का लागते
का मला वाटतो खास तू

कोण आहेस तू सांगना
धावते बोल प्राणास तू

चूक माझी अशी कोणती
"अभय" घेतोस वनवास तू

                        - गंगाधर मुटे
-------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राक्तनाला मिळालास तू<<<<अतीशय आवडली ही ओळ

अनेक मिसरे जास्त आवडले पण अनेक शेर कमी आवडले
क्षमस्व

अरविंदराव, हे वीरलक्ष्मी वृत्त आहे काय?
मला आवडले हे वृत्त.
या वृत्तातील बहुधा ही माझी पहिलीच गझल.

आसवांना दिसू दे जरा
की निघालास जाण्यास तू<< वा

लडिवाळणेही छान! प्राक्तनाला मिळालास तू - ही ओळही चांगली आहे. अनुप्रास या शब्दात नु वर प्रा चा भार येतो असे माझे मत आहे.

शुभेच्छा!

गुंतता मी गळाला तुझ्या

कुणितरी या ओळीला पर्यायी ओळ सुचवावी. आवडेल. Happy

अरविंदजी, वृत्ताचे नांव माहीत नव्हते. नोंदवल्याबद्दल आभारी आहे. Happy

(अवांतर - लहान वृत्तात लिहिणे, लिहिलेले पुरेसे अर्थवाही असणे आणि पुन्हा सुलभही असणे हे तसे जिकीरीचे ठरते. हे सर्व या गझलेत जवळपास निभावले गेलेले आहे हे सुखद)

या वृतातील माझी ही पहिलीच गझल आहे. लिहायची म्हणून लिहिली. फारस्या गांभिर्याने लिहिली नाही.
शिवाय या गजलेशी माझे कुठलेही भावनीक नाते जुळलेले नाही. म्हणून या गझलेची मोडतोड/डागडुजी करायला हरकत नाही.

म्हणून

मी ही गझल पर्यायी शेरांच्या/ओळींच्या पर्यायाच्या प्रयोगासाठी "पांढरा उंदीर" म्हणून तुमच्या सामोर ठेवत आहे.

शेर/ओळ पर्याय सुचवावा. मात्र मला आवडलेल्या ओळींचा मी माझ्या मूळ गझलेत समावेश करीन आणि त्यावर माझा पूर्ण अधिकार असेल.

सुचवा तर मग.

(प्रा. देवपूरकर सरांना देखील आग्रहाचे निमंत्रण.)

सामुहिक प्रयत्नातून एखादी चांगली दर्जेदार गझल निर्माण होऊ शकते काय, हे बघुयात. Happy

>>>मी ही गझल पर्यायी शेरांच्या/ओळींच्या पर्यायाच्या प्रयोगासाठी "पांढरा उंदीर" म्हणून तुमच्या सामोर ठेवत आहे.

शेर/ओळ पर्याय सुचवावा. मात्र मला आवडलेल्या ओळींचा मी माझ्या मूळ गझलेत समावेश करीन आणि त्यावर माझा पूर्ण अधिकार असेल.

सुचवा तर मग.

(प्रा. देवपूरकर सरांना देखील आग्रहाचे निमंत्रण.)

सामुहिक प्रयत्नातून एखादी चांगली दर्जेदार गझल निर्माण होऊ शकते काय, हे बघुयात<<<

ही भूमिकासुद्धा गझलकाराने / कलाकाराने कधीही घेऊ नये अशी आहे.

<<<< ही भूमिकासुद्धा गझलकाराने / कलाकाराने कधीही घेऊ नये अशी आहे. >>>

नेमके यात काय चुकले? सांगा. मी स्वतःत बदल करेन.

(तशी ही माझी भुमिका नाहीच. हा केवळ सहजपणे मांडलेला प्रकार आहे,हे मांडताना माझी शब्दरचना चुकली असावी. शक्य आहे. पण यात माझा कुठलाच विशिष्ट हेतू नाहीये.)

नेमके यात काय चुकले? सांगा. मी स्वतःत बदल करेन.

(तशी ही माझी भुमिका नाहीच. हा केवळ सहजपणे मांडलेला प्रकार आहे)<<<

१. लिहायची म्हणून गझल लिहिणे

२. फारश्या गांभीर्याने न लिहिणे

३. गझलेशी भावनिक नाते न जुळणे

४. त्यामुळे गझलेची मोडतोड अथवा डागडुजी करायला हरकत नसणे

५. म्हणून अशी गझल इतरांच्या मतप्रदर्शनासाठी व पर्याय सुचवणीसाठी रस्त्यात उभी करणे

६. त्यात पुन्हा स्वतःच्या आवडीनिवडी सांगणे व अधिकार सांगणे

यातील कोणतीच भूमिका कलाकारासाठी योग्य नाही. शिवाय, हे सर्व कलाकाराने स्वतःच लिहिणे हेही योग्य नाही.

१ ते ६ सर्वच मुद्दे मान्य आहेत.

माझी वरील पोस्ट अनौपचारिकपणे किंवा प्रयोगात्मक स्वरुपाची होती.

अशी पोस्ट मी आजवर लिहिली नसावी. यापुढेही तशी गरज पडण्याची शक्यता नाही. तरीही काळजी घेईल. Happy

'आसवांना दिसू दे' आणि 'दागिने' हे शेर विशेष वाटले.

परंतु,
"लिहायची म्हणून लिहिली. फारस्या गांभिर्याने लिहिली नाही......... "पांढरा उंदीर" म्हणून तुमच्या सामोर ठेवत आहे." >>> हे तितकेसे आवडले नाही.
(अर्थात, तुमची मर्जी !)

छान. Happy

छान गझल.
>>गुंतता मी गळाला तुझ्या
प्राक्तनाला मिळालास तू
हेही ठीकच आहे की !

रच्याकने,१ ते ६ अगदी मान्य.ते भावनिक नात्याचं कलम फक्त स्ट्रिक्ट करू नका.. वेळ लागतो हो नव्या सवयी लावून घ्यायला Happy

भारतीजी,

<<< गुंतता मी गळाला तुझ्या >>

गळ ह्याचा अर्थ मासे पकडण्याचा आकडा असा तर आहेच, पण

गळ घालणे हाही अर्थ प्रचलित आहे.

आदरणीय मुटे सर,
आपल्या विनंतीस मान देऊन व आपला पूर्ण आदर ठेवून आपली गझल आम्हाला खालीलप्रमाणे लिहावी वाटली! काही ठिकाणी काफिये बदलावे लागले, काही ठिकाणी खयाल बदलावे लागले! निव्वळ चिंतनासाठी व आस्वादासाठी आपणास आपलीच गझल नवीन चेह-यात सस्नेह अर्पण करत आहोत!
सदर गझल आपली व फक्त आपली आहे! आमचा त्यावर अधिकार नाही!
आवडल्यास/ना आवडल्यास जरूर कळवावे
**********कर्दनकाळ(प्रा.सतीश देवपूरकर)

गझल
वृत्त: वीरलक्ष्मी
लगावली: गालगा/गालगा/गालगा

भास तू, ध्यास तू, श्वास तू!
एक वेडी खुळी आस तू!!

वेळ गेला किती, अन् कसा?
जायलाही निघालास तू!

लाड करतोस माझे किती!
खूप घेतोस रे त्रास तू!!

आर्त तृष्णा सुरांचीच मी.....
सूर देण्यास आलास तू!

रोज येतेस स्वप्नामधे!
आजही फक्त आभास तू!!

भेट होईल केव्हा तरी....
अंतरातील विश्वास तू!

जीर्ण हा देहही स्पंदतो!
लावले वेड प्राणास तू!!

वानप्रस्थाश्रमी माझिया;
वाटते एक मधुमास तू!

**************कर्दनकाळ ( प्रा.सतीश देवपूरकर)
*************************************************

प्रा. देवपूरकर सर,

आर्त तृष्णा सुरांचीच मी.....
सूर देण्यास आलास तू!

हा शेर मुळ गझलेत समाविष्ट करित आहे.
आलास ऐवजी यावास तू
असे अधिक बरे राहिल असे वाटत आहे.
*****
काळजाची खुळी आस तू
ऐवजी
काळजाला खुळी आस तू
किंवा
अंतराला खुळी आस तू
किंवा
अंतराची खुळी आस तू

असे करावे काय, असाही घनघोर विचार करित आहे.

स्वतंत्र रचना म्हणून पर्यायी व तीतील जवळ जवळ सर्वच शेर आवडलेत छानच झालेत

मुटेसरांनी मागीतल्यावरच पर्यायी देण्यात आली हे अधिक आवडले Happy

बेसीकली वरील मूळ गझलेतील एका शेरातील पहिल्या ओळी बद्दल पर्याय सुचवण्याची डिमांड करण्यात आली होती
त्यासाठी मीही हात धुवून घेत आहे ...
असे....

लावला मी लळा , की, तुझा,,,,
प्राक्तनाला मिळालास तू ???

Happy

लावला मी लळा , की, तुझा,,,,
प्राक्तनाला मिळालास तू ???

चांगला शेर. Happy