ट्रेन
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
2
ट्रेनच्या आत माणसामाणसांमधे शक्य तेवढ अंतर राखाव
ट्रेनच्या काचेतून दुरवर पसरलेल जग डोळ्यात साठवून घ्याव!
ट्रेनच्या आत ओझरत्या स्पर्शालाही चटकन सॉरी म्हणाव
ट्रेनच्या काचेतून बाहेर कोसळणार्या पावसात चिंब भिजून याव!
ट्रेनच्या आत 'कथा-कादंबरीच्या' प्रवासाने हृदय जड व्हाव
ट्रेनच्या काचेतून दिसणारी पडझड पाहून आपल्यापुरत सावरुन जाव
ट्रेनच्या आत मधाळशा दाक्षिणात्य डोळ्यात एकटक बघतच रहाव
ट्रेनच्या काचेतून 'नाहीच कुणी अपुले रे.. ' म्हणत डिसग्रेसफुल वाटाव!
ट्रेनच्या आत मिळेल तिथे पाठ टेकवून झोपून जाव.. मनाने हलक व्हाव
ट्रेनच्या काचेतून जगाचे अस्वस्थ व्यवहार बघून अस्वस्थ व्हाव!
बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
व्वा ! व्वा! ट्रेनचे आतले /
व्वा ! व्वा! ट्रेनचे आतले / बाहेरचे विश्व चपखल रेखाटले आहे.
>>ट्रेनच्या काचेतून दिसणारी
>>ट्रेनच्या काचेतून दिसणारी पडझड पाहून आपल्यापुरत सावरुन जाव
क्या बात..! छान...!
खास मुंबईकरांसाठी एक आगाऊ ओळ लिहावी वाटते:
ट्रेन च्या आत अगदी चौथ्या सीट ची सुध्दा सोबत पत्करावी
ट्रेन च्या बाहेरील गर्दीत स्वता:ची जागा कायम परखावी!