गुलमोहर तो !

Submitted by रसप on 1 May, 2013 - 00:51

कोपिष्ट ऋषी
संतापावा
याव्यात झळा
त्या डोळ्यांतुन
अन् शाप झणी
उच्चारावा -
"नजरेत असे
जी आग तुला
ती भस्म करो !"

तैसेच जणू
आकाशाने
संतापावे
ह्या धरणीवर
सविता-नयनी
फुलता ज्वाळा
कणकण धरणी
पेटून उठे
पोळून बने
केविलवाणी

प्रत्येकाची
लाही लाही
पण एक तरू
खंबीर असे
जो ज्वाळेतुन
बहरून उठे
झाडुन पाने
ओकाबोका
झाला तरिही
अंगावरती
पसरून फुले
दु:खामध्ये
आनंदभरे
निर्व्याज हसे

षड्शत्रूंशी
विजयी होउन
कोsहम जाणुन
नि:संग बने
जणु एक ऋषी
गुलमोहर तो !
निर्व्याज हसे
गुलमोहर तो..!

....रसप....
२९ एप्रिल २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय उत्तम रे
अभिनंदन जितू

कवितेच्या या अवघड अशा यमकलेस फॉर्म वर तुझी पकड दिवसेंदिवस बेमालूमपंणे अधिकच घट्ट होत जात आहे