कुणास ज्ञात तुझी आज थोरवी नाही!

Submitted by कर्दनकाळ on 30 April, 2013 - 14:23

गझल
वृत्त: कलावती
लगावली: लगालगा/ ललगागा/लगालगा/गागा
..............................................................

कुणास ज्ञात तुझी आज थोरवी नाही!
कधी उपेक्षित होणार पालवी नाही!!

हरेक शब्द तुझा दरवळे सुगंधाने.....
तुझा सुगंध, तुझा बाज मानवी नाही!

जरी अपेक्षित आहेत मागण्या काही;
जगा! हरेक तुझी आस वाजवी नाही!

तुम्हास ओळखतो, लोकहो! पुरेसा मी;
करा खुशाल टवाळी....मला नवी नाही!

हरेक धर्म शिकवतो धडेच प्रेमाचे!
विरुद्ध धर्मगुरू, पोप, मौलवी नाही!!

बराच काळ तुझी पायपीट जी चालू.....
द्रवेल देव अशी चाल नागवी नाही!

दिसावयास दिसे वेष फक्त साधूचा....
तपासल्यावर निष्ठाच साधवी नाही!

अखेरचाच अता श्वास राहिला माझा!
अजून गात कशी कोण भैरवी नाही?

दिसावयास किती ऐटबाज त्या गझला!
गझल जगेल खरोखर असा कवी नाही!!

कधी तरी उगवावा असा दिवस येथे......
कुणामधेच कशाचीच यादवी नाही!

अशी अजून न दिसली मला कुणी व्यक्ती......
जिच्यातली कुठली गोष्ट लाघवी नाही!

कथेत ऐकत आलोत राम-सीतेला!
समक्ष मात्र कुठे राम-जान्हवी नाही!!

**********************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी अजून न दिसली मला कुणी व्यक्ती......
जिच्यातली कुठली गोष्ट लाघवी नाही!<<< अरे वा?

बाकी गझल सपक Sad

धन्यवाद शिवम संक्षिप्त व सोज्वळ प्रतिसादासाठी! >>

सर, हे प्रतिसाद टाळलेत तर ? फक्त धन्यवाद ठीक आहे. ज्यांना तुम्ही टवाळ म्हणताय तेच तुम्हाला डोक्यावर घेतील. थोडा विश्वास टाका. आपण बुजूर्गा असल्याने इतकंच. लिहीत रहा काका.

अखेरचाच अता श्वास राहिला माझा!
अजून गात कशी कोण भैरवी नाही? ...सुंदर , विशेषकरून दुसरी ओळ

कुणास ज्ञात तुझी आज थोरवी नाही!
कधी उपेक्षित होणार पालवी नाही!! ... काहीच टोटल लागली नाही

हरेक शब्द तुझा दरवळे सुगंधाने.....
तुझा सुगंध, तुझा बाज मानवी नाही! ... ह्यातही काही समजले नाही

क्षमस्व

बाकी गझल सपक<<<<<<<<<<<
चटपटीत करावी! त्याचा आस्वाद घेऊ! आहे काय, नाही काय!

अशी अजून न दिसली मला कुणी व्यक्ती......
जिच्यातली कुठली गोष्ट लाघवी नाही!<<< अरे वा?

चकीत झालात? हे कोणालाही म्हणजे आपणासही लागू आहे!

साधवी......शाब्दिक अर्थ.......साधुपत्नी, पतिव्रता स्त्री!
इथे अर्थ आहे पवित्र/सात्विक/ईश्वरभक्तिपरायण/धर्मनिष्ठ.....इत्यादी

सुंदर , विशेषकरून दुसरी ओळ<<<<<<धन्यवाद गजलुमिया
कुणास ज्ञात तुझी आज थोरवी नाही!
कधी उपेक्षित होणार पालवी नाही!! ... काहीच टोटल लागली नाही

नीट टोटल करा, पहा टोटल येईल बरोबर! पालवी या प्रतिमेवर व थोरवी या शब्दावर चिंतन करा म्हणजे टोटल लागेल हाताला!

हरेक शब्द तुझा दरवळे सुगंधाने.....
तुझा सुगंध, तुझा बाज मानवी नाही! ... ह्यातही काही समजले नाही

ह्यातही सुगंध दरवळणे, सुगंध व बाज मानवी नसणे या शब्दयोजनांचे चिंतन करा म्हणजे उमगेल सगळे!

आज कुणास तुझी थोरवी ज्ञात नाही...

असं सरळ सरळ लिहीलं तर... ?

दिसावयास किती ऐटबाज त्या गझला!
गझल जगेल खरोखर असा कवी नाही!!>>>> हे मात्र अगदी खरंय.. तुम्ही जशा गझला लिहीत आहात त्यावरुन प्रत्यय येतोच आहे.

तिलकधारी आला आहे.

भ्रामक आत्मप्रौढीची झापडे लावून चालताना पडल्यामुळे मराठी गझलेला आलेले कर्दनकाळ हे एक टेंगूळ आहे.

भारंभार गझल-लेखन केल्यामुळे सोसवत नसलेल्या ताणामुळे बेफिकीर नावाचे एक कुबडही मराठी गझलेला आलेले आहे.

पोक काढून चालणारी आणि कपाळ बडवत चालणारी ही मराठी गझल तिलकधारी आता वैवकु, सुप्रिया, प्राजक्ता, सुशांत खुरसाले, रसप या ताज्यातवान्या गझलकारांच्या हाती हीलिंगसाठी सोपवत आहे.

तिलकधारी निघत आहे.

तिलकधारीला गझल का वाटते कुब्जाच कोणी?
तो स्वत:ला काय समजू लागलेला राम कोणी?

टेंगळे, कुबडे मनामध्येच त्याच्या माजलेली!
त्यामुळे दिसते पहा त्याला गझलही वाकलेली!!

तो विसरतो बाक त्याचा अन् स्वत:ची षंढ बडबड!
कोणती भलतीच नावे काय घेतो, काय गडबड?

काय येतो, काय जातो वाफ तोंडाची दवडतो!
वार करतो पाठमोरा अन् भरूही पाहतो तो!!

शीक तू बाराखडी अन् गिरव ती तू तिलकधारी!
हो प्रथम साक्षर स्वत: मग बोल काही तिलकधारी!
**************इति कर्दनकाळ

************************************************************************
कर्दनकाळ थांबले आहेत!

साध्वी.....साधवी दोन्ही चालते!
>>>

डोक्यावर पडलात बिडलात की काय ???

अहो साध्वी म्हणजे लेडीज साधू !!!
साधवी म्हणजे साधूच्या स्टाईल ची एखादी बाब (साधुत्वाने युक्त अशी बाब)

दोन्ही चालते काय चालते ? ते काय 'पांथस्त' अन् 'पांथस्थ' आहे का काय ....तुम्ही म्हणाल ते चालायला ?
भाषा हे शास्त्र आहे त्याचा अभ्यास करावा निव्वळ डिक्शनर्‍या पाठ करून आपल्याला भाषा येते असे होत नाही

स्वतःच्या समर्थनार्थ काय वाट्टेल ते सांगता तुम्ही हे कसे बरे चालेल ?

असो या गझलेत साधवी हा शब्दच योग्य आहे

मला व्यक्तिशः लाघवी हा शेर आवडला

साध्वी.....साधवी दोन्ही चालते!
>>>

डोक्यावर पडलात बिडलात की काय ???<<<<<<<<<<<

तुझी दृष्टी पण मेंदूप्रमाणे आधू झाली का रे?
साधवी......शाब्दिक अर्थ.......साधुपत्नी, पतिव्रता स्त्री!..............वाचायला विसरलास काय?
लगेच तारे तोडायला लागलास ते!

तुम्हाला या शेरात काय अपेक्षित आहे साधूपत्नी की साधुत्वावरील निष्ठा ??

इथे तुम्ही 'निष्ठा साधवी नाही' असे म्हणाला आहात !!!

साधवी शब्दाचे इतर अर्थ पाहिले नाहीस का?

साधवी......शाब्दिक अर्थ.......साधुपत्नी, पतिव्रता स्त्री!
इथे अर्थ आहे पवित्र/सात्विक/ईश्वरभक्तिपरायण/धर्मनिष्ठ.....इत्यादी
इति कर्दनकाळ