आजकाल केवढे फुशारतात काजवे!

Submitted by कर्दनकाळ on 29 April, 2013 - 13:31

आजकाल केवढे फुशारतात काजवे!
कोण सूर्य, कोण चंद्र.....बोलतात काजवे!!

वासरांमधील लंगडीच सूज्ञ गाय ते!
दबदबा पहा कसा निभावतात काजवे!!

भक्त कैक भोवती, अनेक भाट सोबती...
होउनी हुजूर ते चकाकतात काजवे!

गोडव्यांत गुंतती, स्तुतीमुळेच झिंगती!
कूपमंडूकांसमान डोलतात काजवे!

झापडांमुळेच ना समुद्र पाहिला कधी!
आपल्या तळ्यामधेच डुंबतात काजवे!!

******************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोराच्या मनात चांदणे!
आधी आपले खरे नाव जाहीर करायची हिंमत दाखवावी माणसाने! मग दुस-यांना त्यांच्या नावाने संबोधण्याचे धाडस करावे!

टीप : गझल जिथे पोचायला हवी तिथे पोचतेआहे यात भरून पावलो आम्ही!

देवी प्रसन्न आहे, पण ती लेखकाला बुलेटच्या स्पीडचे पण वरदान देईल असे वाटले नव्हते.:फिदी:

स्वाती... ऑ काय....
.
त्यांचे काजवे तळ्यात डुंबतात.. अन् मासे ॅकाशात विहार करतात..
मांजरी उंदरांच्या गळ्यात घंटा बांधतात
आणि... या ला गझल म्हणतात... Wink
.
.
Light 1 :मुंब्रा: . :कळवा: . :ठाणे: :घाटकोपर:.

त्यांचे काजवे तळ्यात डुंबतात.. अन् मासे ॅकाशात विहार करतात..
मांजरी उंदरांच्या गळ्यात घंटा बांधतात

उत्तुंग कल्पनाविलास व अचाट अन्वयार्थ! अभिनंदन!

आँ?<<<<<<<<<<<

जिंदगी आ वासुनी बघते तुझीही......
लावते तुझियाच तू प्रगतीस टाळा!

देवी प्रसन्न आहे, पण ती लेखकाला बुलेटच्या स्पीडचे पण वरदान देईल असे वाटले नव्हते<<<<<<<<<

पंख मिळाले सोनेरी पण, हाय गगन मी गमावले!
वरदानाच्या वेषामध्ये शाप मिळाला झुरण्याचा!..............इति कर्दनकाळ

ऑ केला म्हणून तीची जिंदगी आ वासून तिच्याकडेच बघायला लागली आणि तीने तीच्या प्रगतीला कुलूप लागलं ..

यूंके ये कोनसी कंपनी का ताला है?