हरेक प्लेटीत जरासा चकणा ठेवा

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

http://www.maayboli.com/node/42634 (प्रेरणा : कसौटी जिंदगीकी)

हरेक प्लेटीत जरासा चकणा ठेवा!
पीवा, पिवू द्या, पिण्यात थोडी 'शिवा'स ठेवा!! (शिवा हा पिण्यातला पार्टनर त्यामूळे शिवा वर श्लेष)

करू नये ग्लास लीक कोणी कधी कुणाचे!
कोकाकोला, लिमका, यांत माफक बॅलंस ठेवा!! (जाहीरात्बाजी)

गमावलेली असोत स्वप्ने, हॅप्पी अवरी.....
खुबीखुबीने अखंड चालू पिण्यास ठेवा! (इच्छा तेथे मार्ग)

खुशाल सामना हा वासाचा कुणी करावा!
बरोबरीने बडीशेप पानाचा मुखवास ठेवा!! (जनाची काळजी मनाची लाज)

हसो कितीही विकट वाट जरी नागमोडी;
जरा लुडकून, रोज जारी प्रवास ठेवा! (डर के आगे जीत है)

अनेक घेणेकरू पुढे जायचे घ्यायला......
पुढे जरी पोचलात, मागे गिलास ठेवा! (परोपकार)

भले किती हँगोवर आहे उतरावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेस उतारा ठेवा! (कंसीस्टन्सी)

पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या; (रोजची घेऊन)
तोन्डी लावावयास तुकडा झकास ठेवा! (स्वस्त खाओ तनमन जगाओ)

जगात कोणी कधी न राहो कुठे उपाशी!
ड्रायडेखातीर हशीखुशीने देशीच ठेवा! (त्यागाची भावना)

रस्ता तुम्हा बाराचा पुनश्च याद आला!
पुन्हा घेण्यास, गहाणही घरास ठेवा!! (फायनांशील मॅनेजमेंट)

चु भू द्या घ्या Happy

(ह्या विडंबनावर कुणी प्रतिसाद देणार नसल्याने प्रत्येक कडव्याच्या पुढे स्वतःच प्रतिसाद दिलेले आहेत कंसात)

विषय: 
प्रकार: 

भन्नाट ज्जाम भारी

त्रिवार लवून वंदन
_/\_ !!!_/\_ !!! _/\_ !!!

या हाय क्लास विडंबनाला इतके कमी प्रतिसाद ??? वाचूनही प्रतिसाद न देणार्‍यांचा णिशेद !!! णिशेद !!! णिशेद !!!